हस्तकला 'क्राफ्ट'च्या छंदातून व्यावसायिकतेची नवी क्षितिजे ओलांडणारा 'पाई लेन'

हस्तकला 'क्राफ्ट'च्या छंदातून व्यावसायिकतेची नवी क्षितिजे ओलांडणारा 'पाई लेन'

Tuesday October 18, 2016,

4 min Read

क्राफ्ट म्हणजे हस्तकौशल्याच्या सक्रीयतेतून निर्माण होणारी कलाकृती होय. साधारणत: ही क्रियाशील कला म्हणजे अनेक प्रकारच्या साहित्यापासून, तंत्रापासून आणि हत्यारांपासून निर्माण होणारे उत्पादन असते. यासाठी वापरले जाणारे साहित्य म्हणजे पेपर, कापड, रेशीम, चामडे, धातू, वायर इत्यादी असते आणि त्याचा वापर संपूर्णत: किंवा एकत्रितपणे केला जाऊ शकतो. ते ओवले जाते, चिकटवले जाते, विणले जाते, कापले जाते, रंगवले जाते, कोरले जाते, जोडले जाते इत्यादी. त्यातून घरगुती वापराच्या वस्तू तयार होतात., किंवा कपडे, पिशव्या, दागिने, फॅशनचे सामान,बॉक्स, मेणबत्या किंवा मूर्ती अशा असंख्य गोष्टी तयार होतात.

image


'पाई लेन' काय आहे?

'पाई लेन' हा क्राफ्ट ब्रान्ड आहे. दर्जेदार हस्तकला उत्पादने रास्त दरात उपलब्ध करून देणारा आणि लोकांना त्यांच्या कृतीशील कलाकारीमध्ये गुंतवून ठेवणारा. भारतातील अशी उत्पादने तयार करणा-या फारच थोड्या कंपन्यांपैकी ही एक आहे. याशिवाय ही अन्य बाजारातील अशा प्रकारची इतर उत्पादने मिळवून त्यांना हस्तकला उत्पादनात परावर्तित करुन देते. जी स्थानिक कलाकारांनी तयार केली असतात. या क्षेत्रात भारतात अशा फारच थोड्या संस्था आहेत ज्या अशा प्रकारचे काम करतात आणि ९०टक्के ज्या संस्था आहेत त्या चिनी उत्पादने आणि पाश्चिमात्य उत्पादने उपलब्ध करुन देत आहेत.

image


क्राफ्ट बाजारपेठ

हस्तकला ही लोकप्रिय कृतीशिलकला आहे, मात्र आता ती पैसा मिळवण्याचे चांगले साधन देखील झाली आहे. अनेक लोक,खासकरून महिला त्यांच्याजवऴच्या हस्तकला कौशल्यातून अशा वस्तू तयार करत आहेत आणि हस्तकला म्हणून त्या घरातूनच त्यांचा व्यवसाय करत आहेत. पालक देखील यासाठी त्यांच्या पाल्यांना परवानगी देतात त्यातून त्यांच्या मुलांना वेळेचा सदुपयोग आणि अर्थार्जनाचा पर्याय मिळतो. त्यामुळे व्हिडिओ गेम, इंटरनेट आणि दूरचित्रवाणी वर ती वेळ वाया घालवत नाहीत. ऑनलाइन बाजाराची सुविधा विकसित होत असल्याने माहिती घेणा-यांची संख्या वाढत आहे त्यातून हस्तकला व्यवसायाला नव्या नव्या संधी मिळून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

image


पाई लेन ची सुरुवात कशी झाली

टाॅन व्हॅन हायनिंगन, त्यांच्या पत्नी श्रीनंदा सेन आणि त्यांचे मित्र रितेश खेरा यांच्या डोक्यातून ही कल्पना सुचली. टाॅन डच आहेत आणि पुण्यात स्थायिक झाले आहेत. त्यांना हस्तकलेच्या लोकप्रियतेची जाणिव आहे कारण त्यांच्या आईने या कलेत पारंगतता मिळवली होती. त्या भारतीय पारंपारिक बिंदी आरेखन करून शुभेच्छा पत्र तयार करायला शिकल्या होत्या त्यातून पाई लेनची वाटचाल सुरू झाली. ज्यातून बिंदी आणि लहान स्टिकर्स चिकटवून वस्तू तयार करून परदेशात पाठविल्या जाऊ लागल्या. २००७मध्ये ही सुरुवात झाली आणि त्यानंतर इतर प्रकारच्या हस्तकला त्याला जोडण्यात आल्या. सध्या पाई लेन हजार प्रकारच्या अशा वस्तू तयार करते त्यात कागद, फोम, साच्यातील वस्तूपासून इत्यादी उत्पादने केली जातात. या वस्तू ४००पेक्षा जास्त किरकोळ विक्री केंद्रातून विकल्या जातात. पिया त्यांच्या कन्या अलिकडचे त्यांना या कामी सहकार्य करण्यासाठी सहभागी झाल्या असून त्यांनी नविन प्रकारच्या तंत्राचा वापर करुन तसेच पदार्थापासून साच्यातील उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आहे.

image


पाई लेन ने ठरविले आहे की ते भारतीय बाजारावर अधिक प्राधान्य देतील आणि हस्तकला वस्तूंचा बाजार सध्या अजूनही इथे नवाच आहे. यातून व्यापक प्रमाणात संधी मिळतात आणि काय तयार करावे तसेच कश्या प्रकारचे करायचे याची आव्हानात्मक प्रक्रिया समाधानकारकपणे पार पाडली जाते. सर्व प्रकारच्या नक्षी इथेच श्रीनंदा आणि पिया यांच्याकडून तयार होतात आणि त्या त्याच्या उत्पादनाची देखील देखभाल करतात. रितेश साहित्याची जुळणी करतात,शिवाय पॅन इंडियाच्या विक्री आणि वितरणांची जबाबदारी स्विकारतात. तर टॉन पाई लेनचा पुण्यात स्टुडिओ चालवितात जेथे सर्व मालावर आणि उत्पानांवर प्रक्रिया करून वितरीत केल्या जातात.

image


ऑरेंजक्राफ्ट

पाई लेन हस्तकला आणि शिल्पकला शिकवण्याच्या पुस्तकांची निर्मिती करतात, याशिवाय प्राथमिक माध्यमिक तसेच पूर्वप्राथमिक वर्गासाठी किटचे उत्पादनही करतात. हे २०१४मध्ये सुरु करण्यात आले. ऑरेंजक्राफ्ट या नावाने या किट आणि पुस्तके शाळांना पुरविल्या जातात. हा उपक्रम कौशल्य विकास म्हणून केला जातो, आणि हे साहित्य वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरले जाते ज्यातून वेगळ्या प्रकारचा आनंद विद्यार्थ्यांना मिळतो. यातून शाळांना वेळेचा सदुपयोग करून सहजपणे मुलांच्या प्रेरकशक्तीला चालना देण्याचा आणि त्यांच्यात कलेची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न साधता येतो. पाई लेन क्राफ्ट फाऊंडेशन स्थापन करण्याच्या प्रयत्नात असून त्यातून दिव्यांग मुलांना हस्त आणि शिल्पकला यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन ही कला त्यांच्यापर्यंत पोहोचविता येणार आहे.

image


नजिक भविष्यातील योजना

पाई लेन ने ऑनलाईन वरून सशक्त पर्याय म्हणून येण्याची तयारी सुरु केली आहे. यातील एक कल्पना आहे ‘क्राफ्ट वर्गणी!’ ज्यात पालकांना वर्गणी भरुन तयार केलेल्या कलाकृती मिळतील ज्या त्यांच्या घरात निश्चीत काळापर्यंत ठेवता येतील किंवा ठराविक काळापर्यंत ठेवता यतील. या उपक्रमात चार वयोगटाची वर्गवारी करून वेगवेगळ्या थिम नुसार कलाकृती देता येतील. पालक किती काळ वर्गणी भरायची याचा निर्णय घेतील आणि त्यांना ठराविक प्रकारचे संच प्रत्येक महिन्यात उपलब्ध करून दिले जातील याची हमी घेतली जाईल. यातून प्रत्येकवेळी मुलांसाठी नवीन क्राफ्ट कलाकृती तयार करण्याच्या जाचातून त्यांची सुटका होईल, सगळ्या साहित्याचा शोध घेणे आणि मुलांना हवे ते क्राफ्ट तयार करून देणे यातून त्यांची सुटका होईल आणि त्यांच्या मुलांनाही उत्तम प्रकारची हस्तकलाकृती तयार करून मिळेल.

image


येथे अनेक प्रकारच्या साच्यातील हस्तकला वस्तू बालकांसाठी देखील उपलब्ध आहेत, तर प्रौढांसाठी दागिने निर्मीती, टेबलटॉप, आणि शयनकक्षातील वस्तूंवर तसेच टाकाऊतून टिकाऊ कलावस्तू आणि कल्पना यातून व्यक्तिगत वापराच्या वस्तू आणि कलापूर्ण सामानावर भर देण्यात आला आहे.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा