उडपीहून पळून आलेला मुलगा उत्तरभारतातील सुप्रसिद्ध 'सागर रत्ना' ब्रँण्डचा मालक 

0

जयराम बनान खूप दूरवरून आले होते. लहानपणी घरच्या जाचाला कंटाळून. उत्तर भारतात जयराम यांच्या ब्रँण्डच्या ३० शाखा आज आहेत, त्याशिवाय उत्तर अमेरिका, कँनडा, बँकॉक आणि सिंगापूरमध्येही त्यांच्या शाखा आहेत. करकला या कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यातील लहानश्या गावातून येणा-या जयराम यांची कहाणी म्हणजे चित्रपटात शोभेल अशा कहाणीचा प्रेरणास्त्रोत आहे. डोसा हा पदार्थ लोकांमध्ये प्रसिध्द करण्यास तेच जबाबदार आहेत,ज्यांना पारंपारीक रोटीच्या आणि बटर चिकनच्या पलिकडे काही माहिती नव्हते त्यांच्यासाठी त्यांनी डोसा आणि सांबर आणले.


Source : WordPress
Source : WordPress

असेअसले तरी, जयराम यांचे बालपण काही सुखात गेले नाही. ते भय आणि असुरक्षित वातावरणात मोठे झाले. वडील केंव्हा मारझोड करतील याचा काही नेम नसे. तो एक प्रसंग घडला ज्यावेळी शिक्षा म्हणून त्यांच्या वडीलांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यावेळी जयराम शाळेत नापास झाले होते, ते केवळ १३ वर्षाचे होते. मार पडायच्या भितीने ते कायम दहशतीखाली होते, मग त्यांनी घरातून थोडे पैसे चोरले आणि पळून आले. त्यांनी मुंबईची बस पकडली, आणि गावातील एकाची मदत घेतली त्याने शहरातील एका खानावळीत त्यांना नोकरी दिली. कोणताही विचार त्यांनी ती बस पकडताना केला नव्हता की मुंबईसारख्या मोठ्या शहरात जावून ते काय करणार आहेत. जयराम यांनी पनवेलच्या खाणावऴीत भांडी घासायला सुरुवात केली. मेहनत केली तरी सुध्दा त्याचा मालक त्याला चप्पलने मारत असे. जयराम सांगतात, “ ते माझ्या कडून काम करुन घेत”. हळुहळू ते वेटर झाले, त्यांनतर व्यवस्थापक झाले. त्यानंतर अनुभवातून त्यांना समजले की ते काही छोटी मोठी काम करण्यासाठी जन्मले नाहीत.

त्यांच्या मनात मुंबईतच दाक्षिणात्य पध्दतीचे खानावळ सुरु करण्याचे विचार येत होते. पण त्यांच्या लक्षात आले की शहरात पूर्वीच तश्या प्रकारच्या खूप खानावळी  होत्या. धोका नको म्हणून त्यांनी दिल्लीत जावून हे काम करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी दिल्लीत डोसा वगैरे पदार्थ तुलनेने महाग होते. जयराम यांनी ही स्थिती बदलली. “ मला चांगल्या दर्जाचा दोसा कमी किमतीत द्यायचा होता”, ते सांगतात.

ते सन १९८६होते त्यांनी त्यांचे पहिले दुकान सुरु केले. पहिल्याच दिवशी त्यांनी ४७०रुपये कमाविले. बारीक लक्ष देवून त्यांनी ग्राहकांचे समाधान करण्यावर भर दिला. त्यासाठी मेन्यूमध्येही काही बदल केले,  त्यांच्या दुकानात लोकांची गर्दी होवू लागली. त्यानी त्याला नाव दिले ‘सागर’. त्यांनतर त्यांना फारसा वेळ लागलाच नाही त्याच्या भागात प्रत्येकाच्या तोंडी त्यांचे नाव झाले.

चार वर्षांनंतर त्यांनी उच्च वर्गाच्या भागात लोधी हॉटेल सुरु केले. त्यांनी तेथे सुध्दा तोच मेन्यू दिला. मात्र २०टक्के जास्त किमतीत. जयराम अभिमानाने सांगतात की, ते सर्वात उत्तम सांबार दिल्लीत देतात. त्यांनी नवे दुकान सुरु केले त्यात त्यांनी नावात ‘रत्ना’ समाविष्ट केले. सागर रत्ना या ब्रँण्डच्या नावाने दिल्लीभर त्यांच्या नावाची प्रत्येकाच्या तोंडी तारीफ होवू लागली.

आजही ते अत्यंत भक्तिभावाने हा व्यवसाय करतात. आणि ते स्वत: खायला बसत नाहीत. ते म्हणतात की लोकांना खावू घालण्यासाठी त्यांनी हे सुरु केले आहे. ते सकाळी ९ वाजता घरातून निघतात आणि रात्री खूप उशीरा घरी पोचतात. दिवसभर त्यांच्या शहरातील सर्व आऊटलेटच्या चकरा ते काटत असतात. स्वच्छतेला ते फार महत्वाचे स्थान देतात त्यामुळे त्याच्या किचन मध्ये एक जरी माशी दिसली तरी त्यांना ते खपत नाही. तेथे एकदा अशी वेळ आली की लोकांनी त्यांना ठराविक पध्दतीचे अन्न देतात अशी टीका टिपणी देखील केली. त्यांना ठोस प्रत्यूत्तर देताना जयराम यानी स्वागत सुरु केले जेथे ते विविध मासळी प्रकार खावू घालतात, त्यातही त्यांना प्रचंड यश मिळाले. 

जयराम बनान यांच्या या कहाणीतून हेच पहायला मिळते की, अंगभूत हुशारी, झोकून देण्याची वृत्ती आणि मेहनतीची तयारी असेल तर कुणालाही यश मिळतेच. या माणसाच्या कहाणीतून आम्हाला प्रेरणा घेता येते की श्रध्देने काम केल्याने तुम्ही जे ठरवता ते होतेच.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया