लहानमुलांना या जगाच्या पर्यावरणात त्यांचा आवाज देण्यासाठी. . .

लहानमुलांना या जगाच्या पर्यावरणात त्यांचा आवाज देण्यासाठी. . .

Tuesday February 07, 2017,

4 min Read

आजवरच्या काळातील पहिलाच २०१६चा आंतरराष्ट्रीय बालक शांती पुरस्कार युएईमधील केवळ सोळा वर्षांच्या केहकाशान बसू या तरुण पर्यावरणवादीला देण्यात आला. तिने संदेश दिला आहे की, “लहान मुलांना पर्यावरणाच्या कार्यात सहभागी करुन घ्या”.

लहान मुलांना आपल्या पर्यावरणाचे रक्षण कसे करायचे याचा निर्णय स्वत:लाच घेवू द्या, कारण वातावरणाच्या बदलांचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसला आहे, हे मत आहे २०१६च्या आंतर राष्ट्रीय बालक शांती पुरस्कार विजेतीचे. संयक्त अरब अमिरात येथील केहकाशान बसू, १६ हिला शुक्रवारी हेग येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रथमच हा पुरस्कार तरुण पर्यावरणवादी व्यक्तिला देण्यात आला आहे. २०१३ मध्ये हा पुरस्कार पाकिस्तानी शिक्षण प्रचारक मलाला युसुफजाई यांना देण्यात आला होता त्याना नंतर ‘नोबेल’ हा सर्वोच्च सन्मान देखील प्राप्त झाला होता. बसू, हिचा जन्मच जागतिक पर्यावरण दिन असलेल्या पाच जूनचा आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून तिने त्यांच्या घराच्या बगिच्यात पहिले रोप लावले, आणि त्यांनतर मागे वळून पाहिलेच नाही.


Image courtesy - The American Bazaar

Image courtesy - The American Bazaar


“ मला नेहमीच वाटते की, माझा जन्म धरती मातेच्या रक्षणासाठी झाला आहे. आणि मला पर्यावरण रक्षक बनायचे आहे”. असे तिने थॉमसन रॉयटर फाऊंडेशनच्या नेदरलँण्ड येथील मुलाखती दरम्यान सांगितले होते. बारा वर्षांचीअसताना तिने ग्रिन होप ही संस्था स्थापन केली, आज या संस्थचे हजाराहून जास्त सदस्य आहेत, आणि ते दहा देशातून सक्रिय आहेत. त्यातून लहान मुलांना पर्यावरणासंबंधित आव्हानाशी कसे लढावे याचे आणि सुरक्षित जग कसे निर्माण करता येईल याचे शिक्षण दिले जाते. ज्यावेळी पर्यावरणाच्या धोक्यांबाबत सांगण्यात येते त्यावेळी, “त्यांच्यापैकी अनेकांना धक्काच बसतो, कारण त्यांनी पूर्वी हे कधीच जाणून घेतलेले नसते” बसू म्हणते “ज्यावेळी मुलांना पर्यावरणात काय सुरु आहे हे माहिती होते, ते धरतीला वाचविण्यासाठी काय करता येईल याची विचारणा स्वत:हून करु लागतात.” तिने पुढे सांगितले.

ग्रीन होप तरुण मुलांना यासाठी प्रोत्साहन देते. जेणेकरून पृथ्वीसमोर असलेल्या पर्यावरणाच्या धोक्य़ांशी त्यांचे त्यानी स्वत:हून पुढे येवून दोन हात करावेत. मग पर्यावरण जागृतीची गाणी तयार करण्यापासून टाकाऊ वस्तूचा फेरवापर करण्यापर्यंत ते त्यांच्या संकल्पना साकारतात. संयुक्त अरब अमिराती सह भारत, ब्राझिल, इंडोनेशिया, नेपाळ आणि केनियामध्ये या समूहाने पाच हजारापेक्षा जास्त झाडेही लावली आहेत. “ झाडे लावणे हा पर्यावरण बदलच्या समस्येवरील सगळ्यात सोपा आणि अत्यंत परिणामकारक उपाय आहे,त्यातून जमिनीची धूप देखील नियंत्रित करता येते.” बसू सांगते.


image


नोबेल पुरस्कार विजेते मोहमद युनूस ज्यांनी हा पुरस्कार बसूला प्रदान केला, ते म्हणाले की, “ बसू यांचे कार्य तातडीचे आणि अत्यंत आवश्यक आहे कारण तीन दशलक्ष मुले पर्यावरणाशी संबंधित आजारांनी दरवर्षी दगावत आहेत. जसे की जंतू संसर्ग आणि दमा.” “जगण्यासाठी आरोग्यपूर्ण पर्यावरण असणे आवश्यक आहे. मुलांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी तसेच त्यांच्या अस्तित्वासाठी देखील. त्यामुळे लहान मुलांच्या हक्कांमध्ये यालाच प्राधान्य देणे आवश्यक आहे.” ते म्हणाले.

भविष्याला आकार देताना

संयुक्त राष्ट्रांच्या तरुणांसाठी आयोजित केलेल्या पर्यावरण विषयक परिसंवादात२०११मध्ये, बसूने एकूण ४५ परिषदां आणि चर्चांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला होता. मुलांकडे आता या परिषदांतून विशेष लक्ष देण्यात येते, विशेषत: त्यांच्यासाठी ठरवून दिलेल्या दिवशी तरुणांचा या कार्यातील सहभाग आणि त्यांच्या संकल्पना यांना संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विषयक परिषदेत खास लक्ष दिले जाते. मात्र तरुणांना अजूनही थेटपणाने यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग दिला जात नाही. जसे की पर्यावरणाच्या धोक्याशी संबंधीत पँरिस करारामध्ये, बसू सांगते, “मला काय हवे आहे की, तरुण आणि बालकांचा या बाबतच्या कामकाजात थेट सहभाग करुन घेतला जावा.” ती म्हणाली, “ हे कसे करता येईल, आमची मते विचारात कशी घेता येतील ज्यातून काहीतरी चांगले निर्माण करता येईल”.

किडस राईटस् फाऊंडेशन यांनी जारी केलेल्या अहवालातून, ज्यांनी या पुरस्काराचे आयोजन केले होते, संयुक्त राष्ट्रांना आवाहन केले आहे की, त्यांनी लहान मुलांचे हक्क या विषयावर परिषद घ्यावी ज्यात पर्यावरणांच्या बाबतीत मुलांचे हक्क आणि अधिकार यांचा उच्चार केला जाईल.

यासाठी जे नियम केले जातील, किंवा नियम करणारे आहेत त्यांनी हे निश्चित केले पाहिजे की, “ मुलांना भविष्य ठरविण्यासाठी त्यांचे मत मांडायची मुभा असली पाहिजे, कारण तेच आहेत की ज्यांना उद्या या महाकाय समस्यांना सामोरे जायचे आहे, कोरड्या उजाड पृथ्वीवर जगायचे आहे जर आजच काही प्रतिबंध करण्यात आला नाहीतर.” बसूने सांगितले. “ मला वाटते की, आम्ही मुले सक्षम आहोत, जलदपणे चांगले जग निर्माण करण्यात आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी देखील कारण आमचे वर्तन थेट समस्येला भिडण्याचे असते.” तिने पुढे सांगितले.

    Share on
    close