उर्दू भाषेच्या असीम प्रेमापोटी केली रेख्ता फाऊंडेशनची स्थापना

0

आजच्या आधुनिक जगात जागतिकीकरण होत असताना सर्वाधिक धोका बोली भाषांना होऊ पहात आहे, कारण व्यापाराची भाषा इंग्रजी असल्या कारणाने तिचा विस्तार होत आहे याचे दु:ख नाही, मात्र त्यामुळे इतर भाषेंची उपेक्षा होत आहे. ही गोष्ट दुर्दैवी आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन एका आयआयटी पॉलीप्लेक्स इंडस्ट्रीजचे फाऊंडर संजीव सराफ यांनी पुढाकार घेतला.

संजीव सराफ

हो ही गोष्ट अशाच एका व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे ज्यांना उर्दू भाषेची मनस्वी ओढ आहे, याच ओढीमुळे उर्दू भाषेच्या विस्तारासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहे ज्यामुळे उर्दू भाषेला एक दर्जा मिळून तो जनसामान्यांपर्यंत पोहचू शकेल. आपल्या या उद्देशाच्या पूर्तीसाठी यशस्वी उद्यमी व पॉलीप्लेक्स इंडस्ट्रीजचे संस्थापक संजीव सराफ यांनी रेख़्ता फाउंडेशनची स्थापना केली. आपण नेहमीच्या बोलीभाषेत नियमितपणे उर्दूच्या बऱ्याच शब्दांचा वापर करतो. पण भाषेतील अज्ञान व अपुरी माहिती यामुळे भाषेतील अंतर वाढत जाते. बऱ्याच वेळा उर्दू भाषेतील साहित्य हे वाचनासाठी उपलब्ध नसल्यामुळे पण आपले तिकडे दुर्लक्ष होते. याच अडचणीतून मार्ग काढण्यासाठी रेख्ता फाउंनडेशनची स्थापना झाली. एका अर्थाने रेख्ता फाउंनडेशन उर्दू साहित्याला अगदी सहजपणे भौगोलिक सीमा ओलांडून  जगभरात उर्दूच्या वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम करते आहे. २०१३ मध्ये रेख्ता फाउंनडेशनच्या स्थापनेनंतर उर्दू साहित्य, शायरी, कविता तसेच मुलांसाठी उर्दूशी संबंधित साहित्य एकत्रितकरण्याचे काम करत आहे. याशिवाय उर्दूच्या विद्वानांपासून  जे या भाषेशी नवखे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वाचनाचे साहित्य तयार करण्याच्या कामी रेख्ता फाउंनडेशने महत्वाचे योगदान दिले आहे.

रेख्ताच्या वेबसाईटवर उपस्थित असलेल्या उर्दू साहित्याचा वापर जगभरातील उर्दूचे चाहते करतात. एका अनुमानानुसार जगभरात जवळजवळ १६० देशात रेख्ताची वेबसाईट Rekhta.org उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त रेख्ता फाऊंडेशन उर्दू भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी जश्न-ए-रेख्ताच्या नावे वार्षिक उत्सवाचे आयोजन करते, ज्यात भारताबरोबरच जगभरातील उर्दूचे प्रसिद्ध कवी यांच्या पासून ते सुफी गायकां पर्यंत सगळे सहभागी होतात.


रेख्ता फाऊंडेशनचा दृष्टीकोन

‘’फाऊंडेशनचे संस्थापक संजीव सराफ यांनी युवर स्टोरीला सांगितले की, "उर्दू भाषेचे साहित्य जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून लोकांपर्यंत नि:शुल्क पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच याचा मूळ उद्देश म्हणजे त्याचा विस्तार करावयाचा आहे’’.

पुढे संजीव सांगतात की दीर्घकाळासाठी माझा प्रयत्न हा उर्दू भाषेच्या तज्ज्ञांपासून या भाषेतील निपुण विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाला उर्दूसंबंधी गरजेचे साहित्य Rekhta.org वर उपलब्ध करविण्याचा आहे. संजीव झालेल्या या चर्चेदरम्यान सांगतात की, हिंदी व उर्दूचे जन्मस्थान तसेच भाषेतील व्याकरण एकच आहे, म्हणून आमच्यासाठी उर्दूला सामान्य लोकांमधील भाषेचा दर्जा देणे नक्कीच अवघड काम नाही. संजीव सांगतात की, "हे एक प्रकारे आंत्रप्रेन्योरशिपचे काम आहे जे मला उर्दू भाषेच्या साहित्याच्या एकत्रीकरणासाठी प्रोत्साहित करते".


रेख्ताचे संस्थापक संजीव सराफ यांनी १९८० मध्ये आयआयटी  खडकपूरहून अॅग्रीकल्चरल इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्या कौटुंबीक व्यवसायात हातभार लावण्यास प्रारंभ केला. पण काही तरी वेगळे करण्याच्या हेतूने संजीव यांनी उद्योजकतेची वाटचाल सुरूच ठेवली आणि १९८४ मध्ये त्यांनी पॉलीप्लेक्सची स्थापना केली. पॉलीप्लेक्स इंडस्ट्रीज जगभरातील इंडस्ट्रीयल पैकेजिंग मध्ये वापरण्यात येणाऱ्या पॉलीएस्टर फिल्मची सगळ्यात मोठ्या उत्पादक कंपनीमधील एक आहे. युवर स्टोरीशी झालेल्या चर्चेदरम्यान संजीव सराफ यांनी सांगितले, "जेव्हा मी स्वतःच्या व्यवसायात स्थिर झालो तेव्हा नवीन करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. लहानपणापासून उर्दू भाषेचा छंद होता ,शेरोशायरी बद्दल असलेल्या प्रेमामुळे उर्दू शिकण्यास प्रारंभ केला. मी विचार केला की हा माझा छंद आहे पण याने अश्या लोकांना पण फायदा मिळू शकतो ज्यांना याची गरज आहे तसेच उर्दू साहित्य कुठे उपलब्ध होईल याची समस्या तर होतीच म्हणून मी रेख्ता फाऊंडेशनची स्थापना केली आज हे इंटरनेट तसेच नवीन माध्यमांद्वारे लाखो लोकांपर्यंत पोहचत आहे’’.

संजीव सांगतात की आज Rekhta.org वर लाखो लोकांना उर्दूचे उत्तम साहित्य उपलब्ध होत आहे. याशिवाय संजीव उत्तराखंडच्या खटीमा गावात एका शाळेचे व्यवस्थापन करत असून तिथे २००० मुलांना १२ वी पर्यंत आधुनिक शिक्षण दिले जाते.

लेखिका : रुबी सिंग

अनुवाद : किरण ठाकरे