साक्षी मलिक ठरल्या ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ मोहिमेच्या सदिच्छादूत!

साक्षी मलिक ठरल्या ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ मोहिमेच्या सदिच्छादूत!

Thursday August 25, 2016,

3 min Read

हरियाणाने आपली सुकन्या साक्षी मलिक यांची पंतप्रधानांच्या बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेच्या सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली आणि ऑलिंपिकच्या कांस्यपदक विजेत्या पहिलवानाला २.५कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. साक्षी यांचे आज सकाळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर हरियाणा सरकारने त्यांच्यासाठी भव्य स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. साक्षी यांच्या स्वागतासाठी त्याचे मातापिता आणि नातेवाईक हजर होते. साक्षी यांनी ५८किलो गटातील फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यांनी पदक झळकावून उपस्थितांना अभिवादन केले. साक्षी त्यानंतर झज्जर जिल्ह्यातील बहादूरगढ येथे गेल्या जेथे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मंत्रिमंडळातील सहकारी कॅप्टन अभिमन्यू आणि ओपी धनकड यांच्यासह राज्याच्या लाडक्या खेळाडूचे स्वागत केले. त्या २३वर्षीय पहिल्या महिला भारतीय पहिलवान आहेत ज्यांनी ऑलम्पिक पदक जिंकले आहे. साक्षी म्हणाल्या की, “ ऑलिम्पिक पदक जिंकणे माझे स्वप्न होते त्यासाठी मी कठोर मेहनत घेतली होती. आता ते पदक जिंकल्याने असे वाटते की मी स्वप्नात जगते आहे.” साक्षी म्हणाल्या की, “जेंव्हा मी वडिलांना आलिंगन दिले आणि त्यांना पदक दाखवले तेंव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. माझे कुटूंबिय भाऊक आहेत आणि मला भेटून आनंदी आहेत. मी सुध्दा आनंदले आहे” साक्षी यांनी प्रेरित करण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी कुटूंबिय, प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंना मदत केल्याबद्दल धन्यवाद दिले. “सुशीलकुमार आणि योगेश्र्वर दत्ता सारख्या माझ्या वरिष्ठ खेळाडूंनी प्रेरित केले आणि मला खूप काही शिकायला मिळाले” असे साक्षी म्हणाल्या. त्या म्हणाल्या की भारताच्या ध्वजवाहक बनणे त्यांच्यासाठी गौरवपूर्ण होते. सोबतच त्यांनी राजीवगांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्यांना हा पुरस्कार २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात प्रदान केला जाईल. बहादूरगढ येथे आयोजित भव्य स्वागत समारंभात साक्षी यांना मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दीड कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. 

image


या २३ वर्षीय खेळाडूचा पारंपारिक पगडी देवून सन्मान करण्यात आला. खट्टर म्हणाले की, “देशाच्या दोन कन्यांनी पदक मिळवून सन्मानात भर घातली आहे आमच्या करिता हा गौरवाचा क्षण आहे” (सिंधू हैद्राबादच्या आहेत त्यांनाही त्यांनी पन्नास लाखाच्या बक्षीसाची घोषणा केली.) ते म्हणाले की पुन्हा एकदा हरियाणाच्या खेळाडूंनी देशाचा गौरव केला आहे. खट्टर यांनी साक्षी यांच्या कुटूंबियांच्या उपस्थितीत सांगितले की, “ आमचे सरकार खेळांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे साक्षी यांनी सर्वांचा गौरव वाढविला आहे त्यात त्यांचे कुटूंबिय, प्रशिक्षक त्यांचे निवासी शहर रोहतक यांचा सहभाग आहे” साक्षी म्हणाल्या की, “ मला वाटते की भविष्यातही मला असेच सा-यांचे सहकार्य लाभावे,जेणे करून मला आणखी पदके जिंकता येतील.” साक्षी या़चे पिता सुखबीर जेंव्हा विमानतळावर त्यांना भेटले आणि त्यांच्या गळ्यात पदक पाहिेले त्यावेळी भाऊक झाले. ते म्हणाले की, “ मला तिच्या कामगिरीचा अभिमान आहे. मलाच नाही सा-या देशाला तिचा अभिमान आहे. तिचे पदक देशाचे पदक आहे” कधी कधी लोक मला म्हणत की मुलगी आहे. आणि ही कुस्ती तिच्यासाठी चांगली नाही पण ज्यावेळी २०१०मध्ये रशियात तिने पदक मिळवले आणि मग आशियाई खेळात आणि राष्ट्रकूल खेळात सुवर्ण पदक मिळवले तेंव्हा सा-यांना तिच्यासारखे बनायचे होते. तीने जे केले तेच त्यांना करावेसे वाटत होते.” साक्षी त्यानंतर आपल्या मामांना भेटायला इस्माइला गावात पोहचल्या. गावाच्या ज्येष्ठांनी पत्रकारांना सांगितले की सा-या देशाला साक्षी आणि सिंधू यांचा अभिमान आहे. एक आजोबा म्हणाले की, “ आता ती जुनी मानसिकता बदलली आहे मुली मुलांपेक्षा कशातही कमी नाहीत. त्या सर्व क्षेत्रात चमकल्या आहेत. मग ते खेळ असो की शिक्षण. त्या बरोबरीतच नाहीत काकणभर सरस आहेत. मला वाटते त्यांनाही त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी बरोबरीने संधी द्यायला हवी. साक्षी यांच्या मार्गात जागोजागी लोकांनी हारफुले देवून त्यांचा गौरव केला. काही लोकांनी गळ्यात नोटांच्या माळा टाकल्या. तर तरुणांनी त्यांच्यासोबत सेल्फि काढून घेतले. त्यांना फुले देण्यात आली मिठाई वाटण्यात आली. लोकांनी ढोल वाजवत नाच करून स्वागत केले. एका भागात शाळकरी मुलांनी बासरी आणि ढोल वाजवून त्यांचे स्वागत केले - पीटीआई

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा 

    Share on
    close