'पीक्यूब'कडे ३००पेक्षा अधिक रिक्रूटमेंट कन्सलटन्टचं जाळं, ३० दिवसांत केल्या ५५ नेमणुका

'पीक्यूब'कडे ३००पेक्षा अधिक रिक्रूटमेंट कन्सलटन्टचं जाळं, ३० दिवसांत केल्या ५५ नेमणुका

Wednesday December 09, 2015,

4 min Read

नवीन उद्योगाला सुरुवात करायच्या कल्पना या बऱ्याचदा चहा-कॉफीच्या टेबलावर गप्पा मारतामारता सुचतात. पीक्यूब (PiQube) ही याला अपवाद नाही. जयदीप महालिंगम आपल्या मित्राशी कॉफी टेबलवर गप्पा मारत होते. जयदीप यांच्या या मित्रानेही उद्योगाला नव्यानेच सुरुवात केलीय. बोलता बोलता हा मित्र म्हणाला, नोकरभरती सल्लागारांद्वारे भरती केल्यास खूप फायद्याचं ठरतं.

त्यावेळी, जयदेव उद्योगाला व्यवसायाच्या चौकटीत घालण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा उद्योग सुरु होऊन एक वर्ष झालं होतं आणि कोअर टीमला ७ महिने पगार मिळाला नव्हता. जयदेव सांगतात, "मित्रासोबतच्या चर्चेनंतर एक नवी उभारी मिळाली आणि लगेचच 'Uber for Recruitment Consultants' ला सुरुवात झाली. आमच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आम्ही उमेदवाराची क्षमता, कंपन्यांची गरज यांची स्कोरिंग सिस्टमने (गुणांक प्रणाली) सांगड घालतो. कडक छाननी झाल्यावर उत्तम अनुरूप प्रोफाईल कंपन्यांना पाठवण्यात येतात. "


image


उमेदवाराची रूपरेषा (Profiling)

पीक्यूब हा आज लोकांसाठी बुद्धिमत्तेचं व्यासपीठ आहे. इथे उमेदवाराची माहिती, मानवी स्वभाव, कुशलता आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून त्यांच्यातलं कसब ओळखून त्यांना आणखी काय करता येऊ शकतं हे सांगण्यात येतं. नेमणुकीच्या या साधनाद्वारे (hiring tool) व्यक्तीच्या सामाजिक, बौद्धिक, तांत्रिक क्षमतेचं विश्लेषण मिळतं. शिवाय, रोजगारनिर्मिती, एखाद्या जागेसाठी उमेदवाराची माहिती पाहणे, प्रोफाईल्सची छाननी करणे, अपात्र प्रोफाइल्स नाकारणे, मुलाखतीची वेळ ठरवणे, उमेदवाराची ओळख पटवणे आणि योग्य उमेदवाराला प्रस्तावही दिला जातो.

पीक्यूबकडे सध्या ३००पेक्षा अधिक रिक्रूटमेंट कन्सलटन्टचं जाळं आहे. त्यांच्या यशस्विततेचं प्रमाण १:८ असं आहे. सध्याच्या कोणत्याही हायरिंग टूलपेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे.

आज कंपन्यांना नोकरभरती हे मोठं आव्हान ठरत आहे. टालेंट सर्चमध्ये योग्य क्षमता, कसब, विषयाची पुरेपूर जाण आणि करून दाखवेन असा आत्मविश्वास असलेला उमेदवार कसा शोधावा हे कंपन्यांना कळत नाही. योग्य संवाद, तंत्रज्ञानाची मदत, अचूक माणसाची निवड याद्वारे नेमणुकीच्या प्रक्रियेतल्या शंका मिटवण्याचं पीक्यूबचं ध्येय आहे.

वेगळेपण :

जयदेव खात्रीने सांगतात की, सध्या भारतात आणि जगभरात मनुष्यबळ तंत्रज्ञान (HR tech) क्षेत्रात आश्वासक वारे वाहताहेत. सूचक विश्लेषण, मोठ्या प्रमाणात माहितीचा संग्रह याद्वारे नोकरभरती करताना येणाऱ्या अडचणी आम्ही थोड्या थोड्या प्रमाणात सोडवत आहोत. पण आपल्याकडील नेमणूक प्रक्रिया अजून प्राथमिक अवस्थेतच आहे.

त्यांच्या मते, प्रत्येक पातळीवरील 'सूचक विश्लेषण आणि योग्य माणसाची निवड' या गोष्टी पीक्यूबला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. यामुळे संपूर्ण नेमणूक प्रक्रिया अगदी सुलभ होते. रेझ्यूमेची छाटणी आणि कागदी घोडे नाचवणे या सगळ्यांत वाया जाणारा वेळ आणि शक्ती आम्ही वाचवतो.

जयदेव सांगतात, "आमच्या ग्राहकांची संख्या नुकतीच २५ वर पोहचलीय. गेल्या ३० दिवसांत १७ कंपन्यांमध्ये आम्ही ५५ नियुक्त्या केल्यात. आम्ही सध्या ३०० हून अधिक रिक्रूटमेंट कन्सलटन्ट सोबत काम करतोय."

अंतर्गत कामकाज

एखाद्या कंपनीने पीक्यूब वर 'जॉब' पोस्ट केला की, आमची स्कोरिंग सिस्टम सफाईदारपणे काम करत या नोकरीकरता उत्तम उमेदवार ठरवते. वेग आणि बेरोजगारी दोन्ही करता ' सिस्टम' जबाबदार ठरते. जास्त पर्याय उपलब्ध नसतील तरीही सिस्टम बारकाईने शोध घेते.

मग कन्सलटन्टच्या कामाला सुरुवात होते. ते त्यांच्याकडचे प्रोफाइल्स सिस्टमवर अपलोड करतात. आमची अंतर्गत गुणांक पद्धत क्षमता, व्यक्तिमत्व, विशेषता या आधारावर प्रोफाईलची छाननी करते. यानंतर आमची टीम वैयक्तिकपणे लक्ष घालते. आमचे घरून काम करणारे सदस्य सिस्टमने छाननी केलेल्या प्रोफाईलवरून नजर फिरवतात. तीनपैकी दोन छाननीत यशस्वी ठरलेली प्रोफाइल्स मग कंपनीकडे पाठवली जातात.

बटण क्लिक करून मुलाखतीचं वेळापत्रक ठरवलं जातं. नेमणूक व्यवस्थापक आणि उमेदवार दोघांना कळवण्यात येतं. अंतिम निकाल आमच्या प्लाटफॉर्मवरच दाखवला जातो आणि यासर्वासाठीच्या आमचा मेहनतानाचा हिशोबही तिथेच करून लिहिला जातो.

टीम

जयदेव हे विमानाचे पंख डिझाईन करायचे. त्यांना नोकरभरतीच्या कामाचाही अनुभव आहे. ते सांगतात एकट्याने मी हे सुरु करताना खूप आव्हानांना तोंड द्याव लागलं. पण जगरहाटीच्या विरुद्ध असलं तरी भागीदार नसल्याचा फायदाच झाल्याचं ते सांगतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या कोअर टीमवर जास्त खर्च करता आला.

राजेश्वर राजरत्नम हे पीक्यूबचे टेक हेड आहेत. याआधी ते पे पाल (Pay Pal) मध्ये काम करत होते. गुणांक पद्धत आणि वरचा कळस रचण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. प्रोडक्ट हेड जगदिश नटराजन हे अॅमेझाॅनमधून आलेत. पीक्यूबचं काम सुरळीत चालू आहे ना यावर प्रभा राजगोपालन यांचं बारीक लक्ष असतं. कंपनीची १० लोकांवरून २५० लोकापर्यंत झालेली वाढ त्यांनी पाहिलीय.

पीक्यूबमध्ये करण्यात येणाऱ्या विश्लेषणांचा कणा आहेत, आग्नेलो मास्केरेन्हस आणि इम्यानुवेल वसंत. हे दोघेही कॉर्पोरेटस आणि उदयान्मुख उद्योगात काम करायचे. सिस्टिममध्ये असलेल्या बौद्धिक भांडवलासंदर्भात ते काम करतात.

लक्ष्मी बालसुब्रहमण्यम ग्राहकांशी संपर्क साधतात. त्या आधी e-shakti मध्ये काम करायच्या. रंजनी शंकर जनसंपर्क आणि जाहिरातीवर कसून काम करतात.

एच.आर. टेक स्पेस :

एच आरमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा म्हणून ५०-६० एच आर हेड एकत्र येऊन त्यांनी एक टीम बनवलीय. या टीमने 'एच आर फंड' म्हणून साधारण ३ कोटी रुपये जमवलेत. सध्या पीक्यूब वेबच्या माध्यमातून कार्यरत आहे. पण लवकरच त्यांचं अंड्रोइड आणि आय फोनवर एॅप दिसणार आहे.

जयदेव सांगतात, "आमच्याकडे आता सिंगापूरचे क्लाएंट आहेत. येत्या काही महिन्यात आम्ही त्यांच्यासोबत कामाची आवक वाढवणार आहोत. मार्च २०१६ पासून युजर्स थेट आमच्या वेबसाईटवर नोकरीसाठी अर्ज करू शकतात."

एच आर सर्व्हिस डिलीव्हरी अन्ड टेक्नॉलोजी सर्वेक्षणानुसार ८५% भारतीय कंपन्या मनुष्यबळाच्या माहितीकरिता कम्प्युटर (cloud) चा वापर करतात. ४४% भारतीय कंपन्या एच आर माहितीकरिता मोबाईलचा आधार घेतात. तर जागतिक पातळीवर याकरता i Momentous आणि Virgin Pulse या प्रोग्रम्सनी जागा व्यापलीय.

लेखिका : सिंधू कश्यप

अनुवाद : साधना तिप्पनाकजे