‘स्टार्ट अप इंडिया‘ उपक्रमाला आजपासून सुरुवात

‘स्टार्ट अप इंडिया‘ उपक्रमाला आजपासून सुरुवात

Saturday January 16, 2016,

1 min Read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्टार्ट-अप इंडिया’ अभियानाला आजपासून सुरवात होत आहे. या अभियानात भारत सरकारसमवेत सहभागाची संधी ‘युवरस्टोरी’ला बहाल करण्यात आलेली आहे. ‘युवरस्टोरी’चा हा अत्यंत मोठा गौरव आहे. नवी दिल्ली येथे समारंभपूर्वक हे अभियान सुरू होते आहे. ‘युवरस्टोरी’ही अभियानातील आपल्या योगदानासाठी सज्ज आहे.


image


‘स्टार्ट-अप अभियान’ म्हणजे देशातील नवोन्मेषी उद्यमशिल चैतन्याचा उत्सवच आहे. देशभरातील १५०० वर ठळक स्टार्टअप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक या शुभारंभाला हजेरी लावणार आहेत. समारोपाच्या सत्रात दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी मार्गदर्शन करतील. अभियानाचा औपचारिक प्रारंभही त्यांच्याच हस्ते होईल. स्टार्ट-अप कृती आराखडा नेमका कसा असेल, त्याचे वरकरणी प्रारूपही पंतप्रधान स्पष्ट करतील. या कार्यक्रमाला अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील स्टार्टअप कंपन्यांचे ४८ सदस्यीय प्रतिनिधीमंडळ उपस्थित राहणार आहे.