२०१९ मध्ये काय होईल त्याचे अंदाज बांधणे घाईचे होईल : आशूतोष

0

मला हा स्तंभ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर लगेच लिहावेसे वाटले पण मी तसे केले नाही. मी आवाज आणि धुरळा खाली बसण्याची वाट पाहिली जेणे करून स्पष्ट चित्र दिसावे. मागील सप्ताहभरात ब-याच चर्चा आणि संवाद झाले आहेत. ब-याच शक्यतांच्या चर्चा आणि विश्लेषण झाले आहे. तीन महत्वाचे मुद्दे अधोरेखीत झाले आहेत ज्यांची निष्पक्ष समिक्षा आणि तपशिलात विवेचन होण्याची गरज आहे.

१. मोदी नावाचे वादळ घोंघावते आहे आणि त्याला २०१९मध्ये संसदेच्या निवडणुकीत देखील थांबविता येणे शक्य नाही.
२. कॉंग्रेस पक्ष सध्या कठीण काळातून जात आहे, आणि राहूल गांधी हे कॉंग्रेस पक्षाचे बहादूर शहा जफर असल्याचे सिध्द होत आहे.
३. आप ज्याची राष्ट्रीय पक्षांना सक्षम पर्याय म्हणून खूप चर्चा झाली त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.

यात काहीच अमान्य करण्याजोगे नाही की भाजपाने आणखी एकदा यूपी मध्ये भव्यदिव्य यश मिळवले आहे. प्रत्येक राजकीय पंडित ज्यांच्याशी मी निकालांपूर्वी बोललो होतो त्यांनी सांगितले होते की ही तिरंगी लढत असेल,आणि दोन पक्षांची एका पक्षाशी लढत असेल. त्यातील काहीनी सागितले की भाजपाला स्पष्ट संधी आहे मात्र कुणालाही इतक्या मोठ्या संख्येत ते येतील असे वाटले नाही. कुणालाही असे वाटले नाही की बसपा देखील अशाप्रकारे संपेल आणि १८ जागा घेवून तिस-या क्रमांकावर जाईल. भाजपा मोदी यांच्या खमक्या नेतृत्वात ८० टक्के जागांवर चमत्कार वाटेल अशा पध्दतीने येईल. जसे २०१४मध्ये भाजपाने ७३जागा मिळवल्या होत्या जे कुणाच्या ध्यानीमनी नव्हते. भाजपाने उत्तराखंड मध्येही चांगल्या प्रकारे पुनर्गमन केले आहे. पण यूपीवर जेथे सर्वांचे लक्ष लागले होते त्यांनी मोदीं आणि त्यांच्या कार्यपध्दती बाबतच्या सर्व शक्यता आणि अंदाज बाजूला सारले. आता म्हटले जात आहे की, २०१९मध्ये अधिक मोठ्या संख्येने मोदी सत्तेत येतील.


हे सारे सांगणे खूप घाईचे ठरेल असे जर मी म्हणालो तर मला वेगळे ठरविले जाईल. त्याहीपेक्षा संसदेच्या निवडणुकांसाठी दोन वर्ष बाकी राहिली आहेत. आणि राजकारणात तर सप्ताहभर देखील खूप मोठा काळ मानला जातो. कुणाला माहिती भविष्यात काय होणार आहे? इतिहासात दाखला आहे की १९७१मध्ये पाकिस्तानच्या फाळणीनंतर आणि बांगलादेशच्या निर्मितीनंतर श्रीमती गांधी यांना दुर्गा अवतार संबोधण्यात आले होते. तेव्हा असे म्हटले जात होते की ‘इंदिरा म्हणजेच इंडिया आणि इंडिया म्हणजेच इंदिरा’ परंतू १९७२च्या शेवटी त्यांची लोकप्रियता ओसरू लागली होती. १९७५मध्ये तर त्यांनी आणिबाणी लागू केली त्यावेळी लोकांचा राग टिपेला पोहोचला होता. १९७७मध्ये तर त्या स्वत:च्या निवडणुकीतही हारल्या होत्या. कॉंग्रेसला जागा मिळाल्या नाहीत आणि प्रथमच बिगर कॉंग्रेस सरकार सत्तेत आले होते. अनपेक्षित घडले होते.

तसेच १९८४मध्ये राजीव गांधी यांनी ४०५जागा जिंकल्या होत्या, अगदी त्यांच्या आजोबा आणि आईलाही इतक्या जागा संसदेत त्यापूर्वी मिळवता आल्या नव्हत्या, मात्र १९८७ मध्ये बोफोर्स प्रकरणाने त्यांना इतके घायाळ केले की, १९८९ मध्ये त्यांना व्हि पी सिंग यांच्या हाती सत्ता सोपवावी लागली. २००४ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने लोकप्रियतेचे कळस गाठले होते.असे मानले जात होते की हाच फिल गुड फॅक्टर आहे. त्यामुळे निवडणुका सहा महिने अगोदर घेण्यात आल्या असे समजून की जिंकणे सोपे होईल मात्र प्रत्यक्षात नुकसानच झाले. २००९मध्ये भाजपा पुन्हा जेंव्हा हारली, त्यावेळी आपसातील वाद आणि भांडणे इतकी विकोपाला गेली की २०१४ मध्ये पक्षाचे काही भवितव्यच नाही असे मानले जात होते आणि २०१९ची तयारी करण्याचा सल्ला दिला जात होता. पण सा-यांनाच माहिती आहे की टेबल कसा फिरवण्यात आला; कॉंग्रेसचा धुव्वा उडविण्यात आला. त्यामुळे मी म्हणतो की मोदी यांना संधी आहेत, मात्र त्या क्षणापर्यंत ते तग धरून राहू शकतील का हा देखील मुद्दा आहे. जर ते राहिलेच, त्यांच्या समोर काहीच आव्हान नसेल अन्य़था वेगळ्याच प्रकारे इतिहास लिहिला जाईल.

येथे आणखी एक दृष्टीकोन आहे. मोदी यांच्यामुळेच उत्तरप्रदेश, उत्तराखंड जिकंता आले म्हणजे यात भाजपाचे किंवा एनडीएचे यश नव्हते. या दोन राज्यात भाजपा सत्तेत नव्हती. परंतू पंजाब आणि गोव्यात जेथे भाजपा सत्तेत होती तेथे त्यांना यश मिळवता आले नाही, आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेसला पुन्हा पहिल्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. पंजाबमध्ये अकाली- भाजपा युतीला कॉंग्रेसला रोखता आले नाही. आणि गोव्यात लोकांनी भाजपाला नाकारले तरीही त्यांनी तोडफोड करत सरकार स्थापन केले. मणिपूरमध्येही भाजपाला सरळ यश मिळाले नाहीच. याचा अर्थ असा होतो की जेथे भाजपा आणि सहकारी पक्षांना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत, लोकांनी त्याना नाकारले आहे. त्यामुळे हे देखील अध्यारूत आहे की मोदी यांनी त्यांच्या लोकप्रियतला गृहित धरू नये. त्यांना पुन्हा पंतप्रधान व्हायचे असेल तर आर्थिक आघाडीवर मुख्यत: काम करावे लागेल.

परंतू कॉंग्रेस ख-या अर्थाने संकटात आहे. राहूल गांधी हेच पक्षाला ओझे झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाला जोरदार विरोध केला जात आहे, जरी पक्षाने पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये चागली कामगिरी केली आहे. त्यांना काहीच श्रेय दिले जात नाही आणि कुजबुज सुरू झाली आहे की त्यांना बदलावे किंवा त्यांच्या कामाची पध्दत त्यांनी बदलावी. राहूल यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे त्यांना पुन्हा एकदा अशा माणसासमोर मार खावा लागला आहे जो लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर आहे. ज्याला कोणत्याही प्रकारे तंत्रात हरवता येत नाही, नैतिक आणि अनैतिकच्या प्रश्नात अडवून सत्ता हिसकावुन घेता येत नाही. अरूणाचल आणि उत्तराखंडमध्ये सरकारला बरखास्त करून कॉंग्रेसला देशातून बेदखल करण्याचा त्यांचा प्रयत्न होताच सध्याचे उदाहरण गोवा आणि मणिपूर आहे. जेथे भाजपाने कॉंग्रेसला सत्ता स्थापन करू दिले नाही. राहूल यांची पध्दत खूपच बचावात्मक आहे. सोनिया गांधी यांच्या प्रमाणे राहूल यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याकडून आदर मिळवला नाही. त्यात असेही मानले जाते की ते बिनकामाच्या लोकांनी घेरले गेले आहेत ज्यांच्या कल्पना तोंडघशी पाडणा-या असतात. त्यांनी नव्या प्रकारे काम केले पाहिजे, नवे स्वप्न निर्माण केले पाहिजे आणि त्याच्या प्राप्तीसाठी मेहनत केली पाहिजे, त्यांनी कॉंग्रेसला नव्याने लोकांमध्ये अशाप्रकारे घेवून जायला हवे की, लोकांच्या मनात नवा विश्वास निर्माण करता येईल. त्यांचे अस्तित्व शिल्लक राहील जर त्यांनी काही बदल स्वत:मध्ये केले तरच पण ही अपेक्षा करणेच अनाठायी ठरावे किंवा खूपच जास्त सांगितल्यासारखे व्हावे!

हे देखील खरे आहे की कॉंग्रेस प्रमाणेच पंजाबमध्ये आपकडूनही खूपच जास्त अपेक्षा करण्यात आल्या, माध्यामतून असेही अंदाज व्यक्त करण्यात आले की आपला ३/४ बहुमत मिळेल. तसेच ते गोव्यातही खूप चांगली कामगिरी करतील असे सांगण्यात आले होते. पण पक्षाने पंजाबमध्ये सहयोगी पक्षांसोबत केवळ २२जागाच मिळवल्या, तर गोव्यात पक्षाला खातेही उघडता आले नाही. आता आपचा सामना भाजपा/ कॉंग्रेस यांच्यासमोर दिल्ली महापालिका निवडणुकीत होणार आहे. टीका करणारे लिहीत आहेत की २०१४ च्या संसदेच्या निवडणुकांनंतर जशा आपच्या ४०९ जागांवर अनामत रकमा जप्त झाल्या होत्या तसे होईल, पण २०१५ मध्ये त्यांनी पलटी मारली होती आणि जनमत मिळवले होते. हे विसरले जाते की आप हा खूप लहान पक्ष केवळ चार वर्षांचा आहे. या छोट्याश्या काळातही त्यांनी दिल्लीत दोनदा सरकार स्थापन केले आहे, अन्य राज्यात प्रमुख विरोधीपक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. ही उपलब्धी काहीच नाही का. सध्या आप जेथे पोहोचली आहे तेथे पोहोचण्यास अन्य पक्षांना अनेक वर्ष लागली. भाजपा दोन दशकांपासून यूपीत अस्तित्वात आहे मात्र तरीही त्यांना १९८० मध्ये तीन टक्के तर १९८५ मध्ये ४ टक्के मते मिळवता आली.

आप नक्कीच तशी नाही हे नक्की. टीकाकारांची पुन्हा निराशा झाली. पण एक गोष्ट नक्कीच आहे ती म्हणजे देशात चांगल्या विरोधी पक्षांची गरज आहे. जे सरकारला अंकूश लावू शकतात, प्रवाह पतित न होता. लोकशाहीच्या अस्तित्वासाठी घुसळून काढणारी चर्चा व्हावी यासाठी, आकुंचन होवून चालणार नाही. योग्य त्या गोष्टीसाठी अल्पसंख्याकांचा आवाज उठवारे हवे आहेत ज्यांचा आदर ठेवावाच लागेल. अल्पसंख्याकाना पाशवी बहुसंख्याकासमोरही सुरक्षित आणि संरक्षित वाटले पाहिजे. सहिष्णूता जपली गेली तरच विविधतेतून एकता शिल्लक राहणार आहे, जी इतिहास आणि परंपार यांचा हिस्सा राहिली आहे. सध्या लोकानी रास्वसंघ / भाजपला असाधारण स्थान दिले आहे.असे तत्वज्ञान जे अनेक दशकांपासून अज्ञातवासात होते त्याने त्यांची शक्ति दाखवली आहे पण लोकशाहीत समिकरणे बदलण्यास वेळ लागत नाही जसे वाजपेयी यांच्यावेळी बदलले, ज्यातून त्यांना बाहेर पडण्यास पुन्हा दहा वर्ष वाट पहावी लागली.

(लेखक आशूतोष हे आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी पत्रकार आहेत, युवर स्टोरी मराठी मध्ये प्रसारीत झालेल्या त्यांच्या विचारांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)