जुन्या नोटांचा वापर करून १५ तारखेपर्यंत करता येतील व्यवहार!

जुन्या नोटांचा वापर करून १५ तारखेपर्यंत करता येतील व्यवहार!

Friday November 25, 2016,

2 min Read

नोटबंदीनंतर काळे धन बँकेत जमा करणारे वाचू शकणार नाहीत यासाठी केंद्र सरकार आता आयकराच्या नियमात बदल करणार आहे, संसदेच्या याच सत्रात याबाबतचे कायदा दुरुस्ती विधेयक येण्याची शक्यता आहे. बँक खात्यात अडीच लाखपेक्षा जास्त पैसे जमा करणा-यांसाठी ही मोठी बातमी आहे.

नोटबंदीनंतर १६व्या दिवशी केंद्रसरकारने महत्वाची बैठक घेवुन त्यात या निर्णयाचा आढावा घेतला, त्यानुसार २५ डिसेंबरपासून बँका आणि पोस्ट कार्यालयात नोटा बदली करून देण्याचे काम बंद करण्यात आले आहे. या शिवाय हजार रुपयांच्या नोटा आता केवळ आपल्या बँक आणि पोस्ट खात्यात जमा करता येणार आहेत. जुन्या नोटा आता केवळ आपल्या खात्यात जमा करता येणार आहेत. या शिवाय आणखी काही महत्वाचे निर्णय़ झाले आहेत.

image


केंद्र आणि राज्य सरकारच्या शाळा, महाविद्यालये, आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये दोन हजार रुपयांपर्यंतच्या शुल्काची प्रतिपूर्ती जुन्या पाचशे रुपयांच्या नोटांनी करता येणार आहे. सहकारी भांडार मध्येही पाच हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीसाठी पाचशेच्या जुन्या नोटा चालू शकतील. प्रीपेड मोबाईलच्या टॉप- अपसाठी देखील जुन्या पाचशेच्या नोटा चालू शकतील. १५ डिसेंबरपर्यंत शासकीय कर भरणा देखील याच जुन्या पाचशेच्या नोटांनी करता येणे शक्य झाले आहे. दोन डिसेंबरपर्यंत टोल घेतला जाणार नाही, मात्र ३ डिसेंबरपासून १५ डिंसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा टोलसाठी वापरल्या जावू शकतात. विदेशी नागरीकांनी पाच हजार रुपयांपर्यतच्या रकमा त्यांच्या चलनात परावर्तीत करता येणे शक्य झाले आहे. याची नोंद त्याच्या पारपत्रावर देखील केली जाणार आहे. पेट्रोलपंप, सरकारी इस्पितळे, रेल्वे मेट्रो दुध केंद्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थाची देयके, वैद्यकीय देयके. न्यायालयाच्या शुल्काचा भरणा, शाळा महाविद्यालायाच्या शुल्काचा भरणा. जुन्या पाचशेच्या नोटांनी करता येणार आहे. शेतकरी देखील जुन्या पाचशेच्या नोटा वापरून बियाणे खरेदी करू शकणार आहेत.