एक मुलगी जिने वाघांच्या देशात राहून काम करण्यासाठी कॉर्पोरेट जीवनाचा त्याग केला

0

जेंव्हा दिव्या श्रीवास्तव सुटीसाठी रणथंबोरला आल्या, त्यांना विश्वास बसत नव्हता की त्या लवकरच लग्न करून भारतातील वाघांच्या राजधानीत येतील. आणि त्यांना हे देखील जाणवले नाही की त्या त्यांचा कॉर्पोरेट आहारतज्ञाचा व्यवसाय सोडून राजस्थान मधील सामाजिक संस्थेत काम करतील. ती धर्मेंद्र खंडाल या तरूण जैवशास्त्रज्ञाला भेटण्याची संधी होती, जो एका टायगर वॉच या सेवाभावी संस्थेसोबत काम करत होता, ज्याने तिचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवन बदलून टाकले. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, : “ माझी धरमशी ओळख झाली, आणि सारे काही सिनेमात होते तसे घडले- पहिल्याच भेटीत आमचे प्रेम जडले! आणि आता तो इतिहास झाला आहे!”

त्या प्रेमात पडल्या, लग्न केले, आणि मोठ्या शहरातील जीवनातून बाहेर आल्या, आणि हस्तकलेवर आधारीत संस्था 'ढोंक' स्थापन केली. ही संस्था मुख्य निर्वाहक म्हणून काम करते, टायगर वॉच या संस्थेच्या संवर्धनासाठी. आणि तिचा हेतू हा आहे की, रणथंबोरच्या आसपास राहणा-या मोगिया या जनजातीच्या विकासासाठी जगण्याची साधने निर्माण करून त्याचे जीवनमान सुधारणे. रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील ढोंक  हे नाव आहे अनोजिस्सुस पण्डुला(Anogeissus pendula) या राजस्थानातील कोरड्या वाळवंटी प्रदेशातील झाडाचे नाव आहे. आणि अरवली डोंगरद-यात आढळणा-या सर्वात प्राचीन झाडांपैकी ते एक आहे. ढोंकचा जन्म स्थानिकांच्या हस्तकलेच्या गरजेतून झाला, ज्यातून वाघांच्या शेजारी राहणा-या लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

सरळसाधेपणाने हस्तकला व्यावसायिक स्थानिकांच्या कलाकौशल्याचा वापर करुन घेतात, ज्यातून सदरे,पिशव्या,पर्स मोबाईल फोन्स, आणि शोभिवंत वस्तु तयार केल्या जातात. ढोंकच्या हस्तकला वस्तूंचे वैविध्य फर्निचरपासून दैनंदिन गरजेच्या वस्तूंपर्यंत आहे. राजस्थानच्या पारंपारीक उंटाच्या चामड्यापासून बनविलेल्या वस्तूंपासून वाघाच्या कातडीपर्यंत बनविलेल्या वस्तूंपर्यत अनेक वस्तु तुम्ही भेट दिली असता तुम्हाला आढळतील.

दिव्या खंडाल संस्थापक ढोंक.
दिव्या खंडाल संस्थापक ढोंक.

मुंबईत व्यावसायिक आयुष्य घालविल्यानंतर येथे येऊन राहणे सोपे नव्हते. “ मी प्रकल्प तीन वर्ष घरीच केला. माझ्या घराच्या गॅरेजमध्ये ढोंक आणला जात होता. आम्ही महिलांना प्रशिक्षण दिले, त्यासाठी तीन चांगले शिंपी नियुक्त केले होते. मला व्यवसाय कसा चालवायचा याचे काहीच ज्ञान नव्हते, नक्षीकाम कसे करायचे, किंवा विकायचे कसे! माझ्या बचतीच्या पैशातून सारे काही सुरू केले होते आणि सुई हरवली तरी ती मोठी गोष्ट असायची. ते अजूनही तसेच आहे, मी आजही आपण काय वाचविले हेच पाहते ना की काय मिळवले.” दिव्या सांगतात.

आणि परिणाम दिसू लागले. त्यांनी त्यांचे काम मोगियापुरतेच विस्तारले नाहीतर चंबळमधील केवट जनजातीच्या आजुबाजूच्या गावातही पोहोचविले आहे. ढोंकमध्ये ‘कशिदा’ या प्रकारच्या साच्यातील छपाईचे काम चालते, त्याचबरोबर खास प्रशिक्षित कलाकारांच्या माध्यमातून हस्तकला देखील केली जाते. या त्यांच्या कामातून सध्या ४५ कुटूंबाना रोजगार या संस्थेने देऊ केला आहे. ग्राहकांनी ढोंकचे वर्णन ‘रंगाचा कँलिडोस्कोप’ असे केले आहे. स्थानिक स्त्रियांसोबत काम करताना त्याचजागी वस्तु बनवून देताना ही संस्था वेगळयाच पध्दतीने सौंदर्य निर्माण करत आहे.’ 

कदाचित दिव्या यांच्यासाठी हेच आव्हान होते की त्यांचे प्रशिक्षण वेगळ्याच व्यवसायासाठी झाले होते, गेल्या सहा वर्षापासून त्यांनी प्रामाणिकपणाने हे काम सुरू ठेवले आहे. – “ ही अवघड स्वारी होती, पण नंतर, कसेतरी, आम्ही यातून निभावलो कारण मनोहर सिंगजी यांच्यासारख्या रणथंबोर सफारीच्या टूर ऑपरेटर्सनी हे गांभिर्याने  घेतले आणि काही यात्रा करणारे पुढे आले आणि आमच्या कामावर त्यांनी प्रकाश टाकण्यास सुरूवात केली. त्यातून पर्यटकांना याची गोडी लागली. उर्वरित व्यवसाय ३०-४० टक्के कमीशन देऊन चालतो. ज्यातून आम्हाला टिमचा खर्चही परवडत नाही, आम्ही रास्त भावानेच विक्री करतो, आणि नफा झाला तर स्वत:च्या खिशात न घालता त्यातून वाघांच्या आणि समाजाच्या कामासाठी खर्च करतो.”

जरी हा सामाजिक उपक्रम असला तरी त्यांचा मुख्य उद्देश हा असतो की, जास्तीत जास्त व्यवसाय व्हावा जेणेकरून त्यांना समाजाला आणखी चांगल्या प्रकारे देता येईल”. व्यवसायाच्या तंत्राबाबत दिव्या यांचे विचार स्पष्ट आहेत.- जे काही जास्तीचे उत्पन्न येईल ते टायगर वॉच साठी दयायचे. दुसरे व्यवधान महिलांच्या समुहातील सदस्यांना व्याजमुक्त कर्ज देणे हे असते. आणि शेवटी समुहात काम करणा-या महिलांच्या दोन मुलींना शिक्षणासाठी मदत करणे हे असते.

आता दिव्या यांना लहान मुलगी आहे, जिचे नाव योगायोगाने रणथंब ठेवण्यात आले आहे.ज्यात स्थानाचे तिच्या भोवतालाच्या जीवनाचे सार आहे. ढोंक चालविताना असलेल्या आव्हानांपेक्षा त्यांना त्यांच्यातील मातृत्व गवसले आहे, त्या दोन्ही भूमिका बखुबी निभावताना दिसत आहेत. त्यांच्या हस्तकला व्यवसायाला चालविताना त्यांचे साधे तत्वज्ञान असते की, मला विश्वास नाही की यात कुणी प्रतिस्पर्धक आहेत, येथे केवळ प्रोत्साहन देणारे आहेत जे तुम्हाला अधिक चांगले काम करण्यास प्रवृत्त करतात. ढोंक हे अनोख्या पध्दतीचे काम आहे, त्यामुळे आमचे आम्ही हवे ते करू शकतो, म्हणूनच आम्हाला त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. बाकीचे सारे आपापली काळजी घेतात.” त्यांच्या हातोटीपूर्ण पध्दतीने या धडाकेबाज महिलेने एका वादळी व्यवसायाची सुरूवात राजस्थानच्या वाळवंटी भागात केली आहे. त्यांच्याच त त्वचिंतक शब्दात सांगायचे तर, ‘मला माहिती नाही उद्या कसा असेल, आजचा दिवस मात्र चांगलाच आहे”.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

कॉर्पोरेटमधील तरुणीची विपणन क्षेत्रातील उंच भरारी : मितिका कुलश्रेष्ठ !

निसर्गाची साद जिनं ऐकली..आणि घडवून आणला एक चमत्कार !

स्वबळावर व्यावसायिक साम्राज्य निर्माण करणारी सायकल दुकानदाराची मुलगी : 'यलो फॅशन'ची निर्माती !

लेखिका : बहर दत्त
अनुवाद : नंदिनी वानखडे-पाटील