कालव्यावरील सौर पॅनल्स गुजरातच्या प्रकल्पाची महाकल्पना; अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील नवी संकल्पना!

कालव्यावरील सौर पॅनल्स गुजरातच्या प्रकल्पाची महाकल्पना; अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील नवी संकल्पना!

Thursday August 03, 2017,

3 min Read

अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील स्त्रोत हे नेहमीच अनाकलनीय राहिले आहेत, त्यामागे अनेक दबाव गट आणि शक्ती काम करत असतात, मात्र वातावरण बदलामुळे ही धोक्याची सूचना मानवाला सातत्याने मिळत आहे की त्याने लवकरात लवकर स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा निर्मितीचा पर्याय शोधून काढावा. आता तर सौर ऊर्जा अशा मर्यादेला जावून पोहोचली आहे की, जेथे त्याच्या निर्मितीचा खर्च कमी होत आहे आणि एक नवे दालन उपलब्ध होत आहे ज्यात केवळ स्वच्छ उर्जा मिळणार आहे. 


image


या बाबतच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे की, मुख्य प्रवाहातील सौर ऊर्जा तंत्रज्ञानातील सिलिकॉन आरेखन वापरले जाते त्याची क्षमता ३४टक्के इतकी आहे, मात्र प्रत्यक्षात त्याच्यापासून २२% इतकाच उपयोग होतो. आणि सध्यातरी त्यातून पुरेश्या प्रमाणात परवडणारी वीज निर्माण करता येत आहे.


image


यामध्ये परिणामकारक विकास कसा झाला आहे याचा शोध घेताना आम्हाला भारतात गुजरात मध्ये सरकारनेच सोलर पॅनल पाण्याच्या कॅनल्स (कालवे) वर उभारल्याचे दिसून आले. ही कल्पना २०१२ मध्ये साकारण्यात आली आणि आम्ही गुजरात मध्ये जावून ते पाहिले तेंव्हा जाणवले की हा प्रकल्प समर्थपणे सुरू आहे. भारताचे महत्वाकांक्षी लक्ष्य आहे १००जीडब्ल्यू च्या स्थापित क्षमतेने २०२२ पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती करणे. जर सारे प्रकल्प एकाच ठिकाणी उभारले तर जी जमीन त्याखाली जाईल ती दिल्ली राज्याच्या १.५पट इतकी असेल. येथे या प्रकल्पाची काही वैशिष्ट्ये देत आहोत:

१. पहिला १मे.वॅटचा कॅनल-टॉप सोलर प्रकल्प सानंद शाखा कालवा या सरदार सरोवर प्रकल्पावर करण्यात आला.

२. याची क्षमता होती स्वच्छ ऊर्जा १.६दशलक्ष युनिट प्रतिवर्ष, आणि त्यातून ९०लाख लिटर्स पाण्याचे बाष्पीभवन रोखण्याची.

३. कालव्यांवर अच्छादन म्हणून सौर पॅनल लावल्याने त्याच्या खालील जमीन दहा टक्के जास्त थंड राहात होती, त्यामुळे प्रकल्पातून निर्माण होणारी उर्जा ही ग्राऊंडमाऊंटेड सोलर पीव्ही पॅनल्सच्या तुलनेत जास्त होती.

४.केवळ गुजरातमध्येच कालव्यांचे ८०हजार किमीचे जाळे आहे, जीएसइसीएल (गुजरात वीज महामंडळ)च्या माहितीनुसार जरी यापैकी तीस टक्के कालव्यांवर सौर पॅनल्स लावण्यात आले तरी त्यातून १८ हजार मे.वॅट वीज निर्मिती शक्य होणार आहे. त्यातून ९० हजार एकर जमिनीचे रक्षण होणार आहे.

५.भारतात असे अनेक कालव्यावर पॅनल्स लावण्यात आले आहेत, त्यापैकी एक दहा मेवॅट क्षमतेचा पॅनल वडोदरा शहरात गुजरात मध्ये लावण्यात आला, आणि १ मे.वॅट क्षमतेचा पॅनल कर्नाटकात लावण्यात आला आहे. अशाच प्रकारचे पॅनेल्स आंध्रप्रदेशातही लावण्यात आले आहेत.

६.यातील पहिला प्रायोगिक प्रकल्प गुजरात वीज महामंडळाने सुरू केला त्याला पंतप्रधानांचे सार्वजनिक व्यवस्थेचे सर्वोत्तम प्रकल्पाचे पुरस्कार २०१५मध्ये मिळाले आहेत.

ही संकल्पना जगभरात स्विकारली जावी अशी सर्वोत्तम संकल्पना आहे, सरकारने यातून शंभर मे. वॅट वीज निर्मिती करताना आणि शंभर जी डब्ल्यूचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने जाताना २०२२ पर्यंत यात वेगाने वाढ करण्याचे ठरविले आहे असे याबाबतच्या अहवालात म्हटले आहे.

डिसें.२०१६ पर्यंत भारताच्या सौर वीज ग्रीडमध्ये ९जीडब्ल्यू इतकी क्षमता होती आणि मार्च २०१७ पर्यंत त्यात १५ जीडब्ल्यू इतकी वाढ झाली आहे. याबाबतच्या अपारंपारीक उर्जा क्षेत्राची माहिती घेण्यासाठी या संकेतस्थळला भेट द्या. visit Ministry of New and Renewable Energy.