भेंडीबाजारातील २४वर्षांची मुस्लिम तरुणी बीडीएस परिक्षेत अव्वल येवून राजकारणात येण्याची तयारी करते तेंव्हा......

0

दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार ही बाजारपेठ आहे. २४ वर्षांच्या निदा फातिमा या डॉ. शाहीद अहमद या भेंडीबाजारातील लोकप्रिय समाजसेवकांच्या कन्या आहेत. त्यांनी काहीतरी वेगळे करून दाखवले आहे.असे काहीतरी जे या लोकवस्तीत यापूर्वी कधीच झाले नाही. दंतवैदकच्या (बीडीएस) राज्य स्तरावरील अंतिम वर्षांच्या परिक्षेत निदा या राज्यात पहिल्या आल्या आहेत. ही परिक्षा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ नाशिक यांनी घेतली होती. २९ नोव्हेंबे २०१६ला निकाल जाहीर झाल्यापासून या भागातील रहिवाशी अहमद यांच्या कुटूंबावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याहस्ते निदा यांना सुवर्ण पदक आणि पदवी प्रमाणपत्र नाशिक येथे झालेल्या पदवीदान समारंभात प्रदान करण्यात आले.

Source : Pixabay
Source : Pixabay

फातिमा यांचे वडील इमामवाडा रस्त्यावर लहानसे क्लिनिक चालवितात.ज्याच्या बाजुला मोठी कचरा साठविण्याची जागा आहे. भटक्या कुत्र्यांचे आश्रयस्थान आहे. अश्या वातावरणातून आलेल्या,फातिमा यांनी दैदिप्यमान यश मिळवले ही खरोखर वाखाणण्यासारखीच गोष्ट आहे. फातिमा यांनी राज्यभरातील २६ दंतवैदकीय महाविद्यालयातून आलेल्या तीन हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांमध्ये अव्वल येण्याची ही असामान्य कामगिरी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना फातिमा म्हणाल्या की, “माझे वडील हेच माझे सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत आहेत, त्यांच्याकडूनच मी हे धाडस शिकले.” त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ सर्फराज आरजू म्हणाले की, “भावंडात सर्वात धाकटी ती आहे, त्यामुळे वडीलांची लाडकी आहे. त्यांनी आम्हा मुलांना शिकण्यासाठीआणि चांगले काम करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. त्याचे सार्थक तिने आज करून दाखविले.”

फातिमा शासकीय दंतवैद्यक महाविद्यालयात शिकत होत्या आणि व्दितीय वर्षातही त्यांनी अव्वल क्रमांक मिळविला होता. त्यावेळी वडीलांच्या हे लक्षात आले की त्यांच्यात असामान्य प्रतिभा आहे आणि त्यांनी त्यांना लक्षपूर्वक अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले.असे असले तरी या कुटुंबावर २२नोव्हेंबर रोजी मोठा आघात झाल ज्यावेळी फातिमाचे वडील कर्करोगाने निवर्तले. फातिमा सांगतात, “आज त्यांची उणीव मला प्रकर्षाने जाणवते आहे, हे त्यांचे स्वप्न होते की मला अंतिम परिक्षेत सुवर्ण पदक मिळावे. आता ते मला मिळाले आहे तर ते पहायला ते आमच्यात नाहीत”. त्यांच्या वडीलांची इच्छा होती की त्यांनी राजकारणात जावे आणि समाजसेवा करावी. त्यांची पहिली इच्छा पूर्ण झाली, फातिमा आता आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुका प्रभाग क्रमांक २२३मधून लढविणार आहेत. “ नगरसेविका म्हणून माझ्या भागातील लोकांसाठी मला सर्वकाही करता येईल ज्यांच्यासोबत मी लहानाची मोठी झाली आहे. आणि मी वैद्यकीय व्यवसाय देखील सोडणार नाही ज्याच्या साठी माझ्या वडिलांनी माल प्रोत्साहीत केले होते.” त्या म्हणाल्या.