३-२-१ फिटनेस मंत्रा देणाऱ्या रमोना ब्रगान्जा

0

जेसिका अल्बा, हाले बेरी, स्कार्लेट जोहानसन आणि केट बेक्किंसले यांच्यात काय समानता आहे?, या प्रश्नाचे उत्तर आहे रमोना ब्रगान्जा, ज्या या सर्वांच्या फिटनेसकरिता कारणीभूत आहेत. लाखो लोक त्यांना स्क्रिनवर पसंत करतात. रमोना या ʻ३-२-१ फिटनेस लिमि.ʼच्या संस्थापक आहेत. याशिवाय त्या ३-२-१ प्रशिक्षण प्रक्रियेच्या निर्मात्यादेखील आहेत. जर्मनीत जन्मलेल्या रमोना वैंकूवर येथे राहतात. फिटनेसची आवड त्यांच्यात त्यांच्या आईमुळे निर्माण झाली. रमोना यांच्या आई ८० वर्षांच्या असूनही, एक फिटनेस प्रशिक्षक आहेत. फिटनेसच्या व्यवसायात अनेक वर्षे कार्यरत राहिल्यानंतर रमोना यांनी ʻफिल फिट लूक फॅन्टास्टिक इन ३-२-१ʼ (feel fit look fantastic in 3-2-1) नामक एक पुस्तक लिहिले आहे. दिल्ली येथे आपल्या या पुस्तकाच्या प्रचारासाठी आलेल्या रमोना यांच्याशी आम्ही बातचीत केली आणि त्यांचा प्रवास जाणून घेतला.

रमोना जेव्हा नऊ वर्षाच्या होत्या. तेव्हा त्यांच्या खोलीच्या भिंतींवर हॉलीवुड कलाकारांचे फोटो लावलेले होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना २० वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लागला. आज आपल्या फिटनेस प्रशिक्षण सत्रांमध्ये आणि ʻन्युट्रीशन प्लॅनʼद्वारे त्या हॉलीवूडमधील अनेक बड्या हस्तींना प्रशिक्षण देतात. लहानपणापासूनच रमोना या फिटनेसबाबत जागरुक होत गेल्या. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांना त्यांच्या आईने जिमनॅस्टीक प्रशिक्षण केंद्रात दाखल केले. तेथे त्या एक उत्कृष्ट प्रतिस्पर्धी ठरत होत्या. १८ व्या वर्षी त्यांना झालेल्या दुखापतीमुळे त्यांची जिमनॅस्टीकची कारकिर्द संपुष्टात आली. मात्र रमोनाला आपले स्वप्न पूर्ण करायचे होते. त्यानंतर लगेचच त्यांच्यात नृत्यकलेविषयी आवड निर्माण झाली. जवळपास ८० दशकातील ही गोष्ट आहे. तेव्हा रमोना यांनी नृत्य आणि चियरलिडिंग करण्यास सुरुवात केली. त्यांनी एनएलएफ संघासाठी चियरलिडिंग केले.

१९८५ साली रमोना लॉस एंजेलिस येथे निघुन गेल्या. १९९९ साली जेव्हा त्या व्यायामशाळेत काम करत होत्या. तेव्हा एका निर्मात्याने त्यांना पाहिले आणि एका १७ वर्षीय युवतीला जिमनॅस्टिक्स शिकवण्याकरिता त्यांच्याशी संपर्क साधला. ती युवती म्हणजे जेसिका अल्बा आणि त्या वर्षी ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करत होती. रमोना यांनी जेसिका अल्बासोबत जवळपास एक दशक काम केले. रमोना यांच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या यादीत हॉलिवूड कलाकार जसे की, हाले बेरी, स्कार्लेट जोहानसन, एने हैथवे आणि अन्य कलाकारांचादेखील समावेश आहे. तर सुप्रसिद्ध अभिनेते जॅक इफ्रान, रियान रेनॉल्ड्स आणि ब्राडले कूपर हे देखील रमोना यांच्याकडून प्रशिक्षण घेतात. ३-२-१ प्रशिक्षण प्रक्रिया आणि ३-२-१ न्यूट्रीशन प्लॅनच्या सहाय्याने हॉलिवूडमधील अनेक बड्या हस्तींची शरीरयष्टी सुदृढ बनवल्यानंतर, रमोना आपल्या ३-२-१ प्रक्रियेवर पुस्तक लिहित आहेत. शरीर, मन आणि आत्म्याची शक्ती एकत्रित जोडण्याचे हे एक मानसशास्त्र आहे. रमोना यांचे पुस्तक विशेष करुन भारतात प्रकाशित करण्यात आले आहे. रमोना यांच्या मते, त्यांच्या पुस्तकात व्यायाम पद्धती आणि सकस आहार, यांचे संतुलन राखण्यात आले आहे. ज्यामुळे तुम्ही तुमचे शरीर सुदृढ बनवू शकाल. त्या सांगतात, ʻहे काही कोणते जादूचे औषध नाही, जे तुम्ही आज खाल्ले आणि उद्या तुमचे शरीर सुदृढ झाले.ʼ रमोना स्वतःवर नियंत्रण राखण्याचे आवाहन करतात. ʻ३-२-१ मानसिक तयारी करा, शारीरिकरित्या तयार व्हा आणि भावनात्मक स्वरुपात पुढे चला, याच वेळेस तुम्ही एका चांगल्या भविष्याची पायाभरणी करू शकता.ʼ

रमोना यांची 3-2-1 fitness ltd, चे संकेतस्थळ पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आले. ज्याद्वारे रमोना व्यायाम पद्धती, प्रशिक्षण आणि सकस आहाराविषयी सांगतात. या संकेतस्थळावर डीवीडी, पुस्तके, प्रशिक्षकांचे प्रमाणीकरण, कलाकारांना दिलेले प्रशिक्षण आणि सुंदर स्थळांवर आयोजित करण्यात आलेल्या retreatsबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यांचा प्रसिद्ध असा ʻ3-2-1 baby bulge be gone programʼ देखील फोर्टीस रुग्णालयात ʻमम्मा मियाʼ कार्यक्रमाच्या स्वरुपात उपलब्ध आहेत. रमोना मोबाईल जिम ʻmobile physiqueʼच्या सह-संस्थापकदेखील आहेत. mobile physique ५२ फुटी ʻआर्ट ट्रेलरʼ आहे, जो बिग बजेट चित्रपटात वापरण्यात आला आहे. अनेक निर्माते कंपनीद्वारे तो भाडेतत्वावर घेतात. गरज भासल्यास रमोना आणि त्यांचे सहकारी ट्रेलरच्या आतल्या भागात प्रशिक्षण देतात. ʻगॉडझिलाʼ चित्रपटात या ट्रेलरचा वापर करण्यात आला होता.

वयाच्या ५२व्या वर्षीदेखील रमोना स्वतःला फिट ठेवतात. तसेच अन्य महिलांनादेखील फिटनेसकरिता पैसे खर्च करण्यास सांगतात. प्रशिक्षणासोबतच रमोना फिटनेसप्रति लोकांमध्ये आवड निर्माण करू इच्छितात. ज्या कोणा लोकांना त्या भेटतात, त्यांना त्या फिटनेसबद्दल सांगत राहतात. नवजात शिशुंच्या मातांनादेखील त्या याबाबतीत सांगतात. फिटनेसबाबत संपूर्ण जगात जागरुकता निर्माण करणे, हा रमोना यांचा उद्देश्य आहे.

Related Stories