हीच वेळ आहे, जेंव्हा ‘स्टार्टअप्स’ला वरिष्ठ नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल......

0

पाब्लो पिकासो यांनी सांगितले आहे की, “युवावस्थेचे कुठले वय नसते”.

एक असा देश जो आपल्या काम करणा-या लोकसंख्येचे वय आणि वाढणा-या विकासदरामुळे जगभरात आपली एक वेगळी ओळख बनविण्यात यशस्वी होत आहे आणि जेथे काम करणा-या अधिकाधिक कंपन्या तरुणांची शक्ती आणि आकारमानावर आपले सर्व लक्ष केंद्रित करत आहे, तेथे अनेकदा वरिष्ठ नागरिकांचा एक समुचित आणि मोठा वर्ग दृष्टिक्षेपातच राहतो. आमच्याकडील अधिकाधिक बातम्या, शिखर सम्मेलन, प्रतिभा शोध इत्यादी सर्व केवळ युवा व्यावसायिक, विलक्षण प्रतिभेची मुले आणि तरुण मुलांच्या प्रतिभेबाबत बोलताना दिसतात आणि वरिष्ठ नागरिकांना केवळ अपराध, सुरक्षा आणि वैद्यकीय संबंधित मुद्द्याच्या ठिकाणी स्थान मिळते. एकीकडे जेथे भारत हा एक युवा देश आहे, तसेच दुसरीकडे वरिष्ठ नागरिकांचा जनसंख्या वृद्धी दर हा भारताच्या जनसंख्येच्या वृद्धीदरापेक्षा दुप्पट आहे. यामुळे वर्ष २०५० पर्यंत देशात ६० वर्षापेक्षा अधिक वयात लोकांची संख्या वाढून लोकांची जनसंख्या १/५ असेल, जी वर्ष २०१० मध्ये केवळ ८ टक्के होती.

आपण या परिवर्तनासाठी तयार आहोत का? वरिष्ठ नागरिकांची वाढणारी संख्या आजही केवळ ‘गुन्ह्यांचे बळी’ या पानांमध्येच अडकून राहील का? नव्या भारताचे नव्या युगाचे हे वरिष्ठ नागरिक निवृत्त तर होत आहेत, मात्र विश्रांतीने बसण्यासाठी नाही तर, स्वतःला पुन्हा एकदा तयार करून मैदानात उतरण्यासाठी आणि या प्रश्नाच्या उत्तरात या उदाहरणांवर एक नजर टाकून एका जबरदस्त ‘ना’ ला एकले जाऊ शकते :

• दुस-यांवर अवलंबून आणि नेहमी उदास दिसणा-या निरूपा रॉय यांच्यापासून रागिष्ठ आणि विनोदी किरण खेर यांच्यापर्यंत, बॉलीवुड सिनेमात आईचे जलदगतीने बदलणारे चरित्र भारतीय वरिष्ठ नागरिकांच्या प्रवासाला शानदाररित्या दर्शवते.

• ८४ वर्षाच्या यामिनी मजुमदार यांनी ६८ वर्षाच्या वयात, जेव्हा अधिकाधिक लोकांचा सेवानिवृत्त होऊन एका दशकाइतका कालावधी झालेला असतो, अशावेळी एका घरगुती महिलेने ‘जीव्स’ या नावाने आपल्या ड्राईक्लीनिंग व्यवसायाचा पाया रचला. गाठीच्या रोगाने गंभीररित्या पीडित आणि हृदयविकाराने त्रस्त असूनही त्यांना स्वतःला ‘वृद्ध’ संबोधणे आवडत नाही. स्वतःला सल्ला देणा-या लोकांना त्या केवळ एकाच वाक्यात उत्तर देताना सांगतात की, “वृद्ध झाल्यावर मला चालण्या-फिरण्यासाठी काठीचा वापर करायला लागेन.”

• ६१ वर्षीय दिपक अमेंबल यांनी एयर इंडिया मधून ५८ वर्षात निवृत्त झाल्यानंतर पुन्हा एकदा आपली बाईकची आवड जोपासण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या एका मित्राला स्वतःसोबत सामील करून ७२ दिवसांचा ‘क्रॉस–कंट्री’ बाईकने करण्याचा विचार केला आणि मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या आजारांना मात देत, मुंबई ते लद्दाख-उत्तर पूर्व भारत-ओरिसा आणि परत मुंबईपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. आपल्या त्या अनुभवा बद्धल खूपच उत्साहित होताना ते सांगतात की, “ ते ७२ दिवस माझ्या आयुष्याचे सर्वात अनमोल क्षण आहेत, ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही.”

• वर्तमानात आयुष्याच्या ७१ व्या वसंत ऋतुत चालणा-या आणि बंगळुरूच्या जवळ असणा-या एका वृद्धाश्रमात आयुष्य व्यतीत करणा-या विधवा सिताम्मा यांनी ५६ व्या वर्षात ट्रेकिंगमध्ये व्यावसायिक खेळ खेळण्यासाठी प्रारंभ केला आणि त्याच्या एका दशकानंतर ६६ व्या वर्षात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात काम करण्यास सुरुवात केली. खेळाने त्यांच्यासमोर नव्या संधी ठेवल्या आणि आता त्या तरुणांसोबत बोलणे आणि त्यांचे मार्गदर्शन करण्याव्यतिरिक्त नवे नवे मित्र देखील बनवत आहेत. त्यांनी मार्च २०१५ मध्ये रोहतक येथे आयोजित ३५ व्या ‘राष्ट्रीय मास्टर्स एथलेटीक्स मिट’चे सुवर्णपदक पटकाविण्यात देखील यश संपादन केले.

• मुंबई मध्ये राहणा-या ७९ वर्षीय सुशिला मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत आणि आपला प्रबंध जमा करण्याच्या अखेरच्या टप्प्यात आहे. वर्ष १९५३ मध्ये केरळ महाविद्यालयात अव्वल येणा-या सुशिला यांनी जवळपास एका दशकापूर्वी एमएमध्ये प्रवेश घेण्यासोबतच पुन्हा एका शिक्षणाच्या क्षेत्रात पाउल ठेवले आणि त्यानंतर एमफील करण्यात यशस्वी झाल्या.

• भारतीय मेट्रोशहरात राहणारे ६८ टक्के वरिष्ठ नागरिक स्वतःच्या बळावर राहत आहेत. कारण त्यांची मुले आपल्या नोक-यांमुळे दुस-या शहरात किंवा दुस-या देशात राहतात. इतकेच काय तर, जे काही लोक आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहेत, ते विभिन्न आणि व्यावसायिक कारणांमुळे त्यांच्यासोबत अधिकाधिक वेळ व्यतित करण्यात असमर्थ आहेत.

• वर दिलेल्या उदाहरणांसहित काही उदाहरणे हे सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहेत की, वर्तमानात आमच्या वरिष्ठ नागरिकांच्या मानसिकतेत हळू-हळू योग्यरीतीने बदल होत आहे. ते आपल्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेऊ इच्छितात आणि सर्वात मोठी बाब ही आहे की, ते असे करण्यासाठी तयार आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपली कारकीर्द घडविण्यासाठी, घरखरेदी करण्यासाठी, मुलांना मोठे करण्यासाठी, त्यांचे लग्न करण्यासाठी इत्यादी गोष्टींमध्ये घालवली आणि अखेर आता त्यांच्याकडे त्यांचे हित आणि आवड जोपासण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही आहेत.

• ही ती पिढी आहे, ज्याने आपल्या काम करण्याच्या कालावधीत संगणकाचा कधी उपयोग केला नाही. मात्र आज चारही बाजूला त्यांची नजर असते. सध्या प्रत्येक महिन्यात फेसबुकवर असणा-या भारतीय वृद्धांची संख्या दोन दशलक्षापेक्षा अधिक आहे. जुनी शाळा, महाविद्यालय आणि कार्यक्षेत्राच्या मित्रांसोबत पुन्हा एकदा संपर्कात येण्याच्या दिशेने व्हाट्सएप्प, फेसबुकपेक्षा अधिक लोकप्रिय आहे. आणि असे नाही की, हे केवळ निष्क्रिय सदस्य आहेत. अधिकाधिक गोष्टीत त्यांचे आपले विचार आहेत, मात्र तरीही ते दुस-यांच्या विचारांशी एकरूप होणे आणि त्यांची प्रशंसा करण्यास आनंद मानतात.

मग समूहसंपर्काचा भाग बनणे असो किंवा जगभरात राहणारे आपले मित्र आणि नातेवाईकांसोबत व्हाट्सएप्प आणि स्काईपच्या माध्यमातून संपर्कात राहण्यासाठी स्मार्टफोन च्या उपयोगाची, भारताचे वरिष्ठ नागरिक कुठल्याही प्रकारे नव्या पिढीहून मागे नाहीत आणि ते देखील सर्वात पुढे राहून दुस-यांसोबत संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत आणि तरुणांना टक्कर देत आहेत.

ही एक अशी पिढी आहे, जी कुठल्याही अन्य उपभोक्ता समुहा प्रमाणेच आपल्या आवाजाला ऐकवू आणि समजवू इच्छिते आणि त्याव्यतिरिक्त त्यांच्या काही विशेष आवश्यकता आहेत, मग त्या स्वास्थ्य किंवा कल्याणाशी संबंधित असो किंवा जीवनशैली, तंत्रज्ञान, मदत, सेवा किंवा वित्तीय उत्पादनाशी संबंधित असो. एकीकडे जेथे वरिष्ठ नागरिकांना अधिक महत्वाचे ग्राहक मानले जात आहे, जे निर्णय घेण्यात थोडा वेळ घेतात. मात्र ते आपला पैसा खूप विचार करून खर्च करतात. या वरिष्ठ नागरिकांच्या आवश्यकतेनुसार विशेष करून आपल्या विभिन्न सेवा आणि उत्पादने तयार करणे या कंपन्यांसाठी एक मोठे आव्हान आहे. आणि यात केवळ उत्पादनाची नक्षी सामील होत नाही, शिवाय त्यांच्या उत्पादनाचे वितरण कुठल्याप्रकारे करण्यात आले आहे आणि विशेषकरून विक्री केल्यानंतर सेवा कशी असेल, हे खूपच महत्वाचे आहे.


लेखक : राहूल गुप्ता

अनुवाद : किशोर आपटे.