बिर्याणी घरपोच वितरीत करणारे क्विक सर्व्हिस रेस्टोरेंट ʻचारकोल बिर्य़ाणीʼ

0

खाद्यपदार्थांचे क्षेत्र विकसित होत असताना जेवणाची ऑर्डर देणे आणि ते पदार्थ घरपोच येणे, हे काही निवडक खाद्यसंस्कृतीपुरतेच मर्यादित होते, विशेषकरुन भारतीय खाद्यसंस्कृतीत. या यादीत अव्वल स्थानी आहे तो पिझ्झा हा पदार्थ. सध्या डॉमिनोजसारख्या क्विक सर्व्हिस रेस्टोरेंट मॉडेलमध्ये काम करणारे लोक कमी असतात. त्यात त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असते ते मेन्यू आणि चव कायम सारखी राखणे. क्विक सर्व्हिस रेस्टोरेंट मॉडेल पिझ्झा साखळीपासून दूर नेण्याचे आव्हान अनुराग मेहरोत्रा आणि क्रिष्णकांत ठाकूर यांच्यासमोर होते. लायन वेन्चरच्या या दोघांनी ʻचारकोल बिर्य़ाणीʼ सुरू केली. एआयएम मणीलाचे अनुराग यांची पार्श्वभूमी फायनान्शियल सर्व्हिसची आहे. तर आयआयएम बंगळूरू येथून एमबीएचे शिक्षण घेतलेले क्रिष्णकांत ठाकूर यांचीदेखील पार्श्वभूमी फायनान्शियल सर्व्हिसची आहे. ही दुकडी गेल्या तीन वर्षांपासून लायन वेन्चरच्या नावाखाली अनेक गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करत आहे.

शेफ मोहम्मद भोल यांना भेटल्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली. मोहम्मद भोल हे शेफ त्यांच्या बिर्याणी करिता प्रसिद्ध असून, भारत आणि यूकेमध्ये त्यांना बराच अनुभव आहे. या त्रिकूटाने विचार केला की, सकस आणि पारंपारिक भारतीय जेवणात सातत्य राखणारे पूर्णकालीन क्विक सर्व्हिस रेस्टोरेंट वेन्चर अद्यापही सुरू झाले नव्हते. भारतीय ग्राहकांना पिझ्झा आणि बर्गरच्या साखळीची कल्पना होती. मात्र जेव्हा भारतीयांचे पसंतीचे खाद्य असलेल्या बिर्याणीचा विषय यायचा, तेव्हा तिच्याकरिता कोणतीही क्विक सर्व्हिस रेस्टोरेंट पद्धती नव्हती. ३४ वर्षीय क्रिष्णकांत सांगतात की, ʻचारकोल बिर्याणीकरिता हिच मोठी संधी होती. अन्नाचा दर्जा आणि त्यातील सातत्य, अद्ययावत सुविधांकरिता तंत्रज्ञानाचे सहाय्य तसेच घरपोच सेवा पोहोचवण्यासाठी कुशल वितरण व्यवस्था, या तीन आधारस्तंभांवर या टीमने मोठ्या प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.ʼ

या टीमने सर्वच वयोगटातील लोकांकरिता जवळपास ५०० प्रोडक्ट फिडबॅक सेशन राबवले. ʻया टीमकरिता युरेका क्षण होता तो, मोठ्या मॅन्युफॅक्चरींग स्केलद्वारे उत्पादनात सातत्य राखल्याचा, ज्यामुळे किचन किंवा शेफवर अवलंबून राहण्याचा मुद्दा आपसूकच बाजूला राहिला.ʼ, असे क्रिष्णकांत सांगतात. कोणत्याही रेस्तरॉसमोर येणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेल्या जेवणात सातत्य राखणे आणि जेवणाचे दरदेखील निश्चित राखणे, हे होय. जेव्हा ʻचारकोल बिर्याणीʼसमोर हे आव्हान उभे राहिले तेव्हा त्यांनी एकावेळेसच मोठ्या प्रमाणात उत्पादन तयार करणे, कार्यक्षम लॉजिस्टिक, निश्चित दर आणि कुशल वितरण व्यवस्थेचा विचार केला. क्रिष्णकांत सांगतात की, ʻअन्न निर्मितीतील सर्वोत्तम असलेल्या मोठ्या कंपन्यांसोबत पार्टनरशीपमुळे हे शक्य झाले. आम्ही बिर्याणीमध्ये सहा प्रकार दाखल करुन आमच्या कार्यपद्धतीचा विस्तार केला. आम्ही मुंबईत कुलाबा ते बोरीवलीदरम्यान खाद्यपदार्थांचे घरपोच वितरण करतो.ʼ बिर्याणी तयार करण्याची कृती ही प्रमाणित असून, तिच्या चवीत आणि दर्जात सातत्य राखण्यासाठी उत्पादन साखळीचा वापर करता येऊ शकतो. जेथून शहरातील विविध भागात बिर्य़ाणीचे वितरण करण्यात येते. यात ग्राहकाभिमुख संकेतस्थळ, एप्लिकेशन यात तंत्रज्ञानाचा वापर होतो. तर बॅंकएण्ड इंटरफेसमध्ये पॉईंट ऑफ सेल आणि इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट यांचा विचार केला जातो. आयएसएम धनबाद आणि आयआयटी बंगळूरू येथून शिक्षण पूर्ण केलेले गौतम सिंग यांनी बॅंकएण्ड इंटरफेसची निर्मिती केली आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेफ मिखाईल शहानी यांनी काही काळानंतर मुख्य टीमसोबत काम सुरू केले. नव्या उत्पादनाच्या निर्मितीत त्यांनी आपली भूमिका बजावली तसेच कंपनीकरिता एक मजबूत उत्पादन तयार करण्यासाठी ते जबाबदार होते. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या जुन्या तंत्रज्ञानाच्या मॉडेलमध्ये आपल्या सोयीचे बदल करुन, त्याला नव्याने उभारण्याचे त्यांनी ठरवले. सप्टेंबर २०१५ मध्ये या टीमने ʻचारकोल बिर्याणीʼचे एक उत्पादन लॉंच केले आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यात दहापट वाढ झाल्याचे ते सांगतात. सध्या मुंबईतील आठ ठिकाणी काम सुरू केल्याचे ते सांगतात. ʻयेत्या काही महिन्यात ही वाढ शंभर टक्के असावीʼ, अशी क्रिष्णकांत यांची अपेक्षा असल्याचे ते सांगतात. ते पुढे सांगतात की, ʻउच्च दर्जाच्या जेवणाव्यतिरिक्त ग्राहकांचा अनुभव हा चांगला असायला हवा. त्यामुळे एखादा ब्रॅण्ड हा ग्राहकाभिमुख होतो आणि चारकोलकरिता या गोष्टी महत्वाच्या आहेत.ʼ

हे उत्पादन स्वच्छ पॅकिंग केलेल्या एका लहान बॉक्समध्ये येते. एखादा ग्राहक वेबसाईट, एप्लिकेशन किंवा कॉल सेंटरद्वारे चारकोल बिर्याणीची ऑर्डर देऊ शकतो. त्यानंतर त्या ग्राहकाच्या जवळ असलेल्या ठिकाणी ती ऑर्डर देण्यात येते. या कंपनीने विविध वितरण कंपन्यांसोबत संबंध प्रस्थापित केले आहेत, ज्यामुळे खाद्यपदार्थाचे घरपोच वितरण करण्यात त्यांना सहसा अडचणी येत नाहीत. येत्या काही कालावधीतच ही टीम मुंबईतील सर्व ठिकाणी खाद्यपदार्थांचे वितरण करणार आहे. तसेच बंगळूरू, पुणे आणि एनसीआर या शहरांमध्येदेखील आपला विस्तार करण्याचा ते विचार करत आहेत. याशिवाय नव्या उत्पादनाच्या निर्मितीचा ते विचार करत आहेत. डॉमिनोज हे या साखळीत प्रत्येक ठिकाणी आढळते. ज्युबिलन्ट फूडवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कौल सांगतात की, ʻग्राहकांना विचारात घेऊन डॉमिनोजची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ते आढळते. ग्राहकांकडून येणारा प्रतिसाद लक्षात घेऊन त्या यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे.ʼ डॉमिनोज पिझ्झामध्ये जवळपास ३० हजार कर्मचारी असून, त्यापैकी २० ते २५ हजार कर्मचारी ग्राहकांचा सामना करतात. या कर्मचाऱ्यांना डॉमिनोज एक डिव्हाईस देण्याचा प्रय़त्न करत असून, ते त्याद्वारे पैसे घेऊ शकतात. तसेच त्यात जीपीएस ट्रॅकिंगची यंत्रणा असेल. EasyKhanna सारख्या स्टार्टअप्सपासून तसेच अम्मीज बिर्य़ाणी, नवाब शेख यांसारख्या बिर्य़ाणी वितरण कंपन्यांचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

लेखक - सिंधु कश्यप

अनुवाद - रंजिता परब

Related Stories

Stories by Team YS Marathi