अनिकेत परिहारांमधील उद्यमीला ‘युवरस्टोरी’ची प्रेरणा

अनिकेत परिहारांमधील उद्यमीला ‘युवरस्टोरी’ची प्रेरणा

Thursday December 31, 2015,

4 min Read

आपापल्या परिमाणांवर, आपापल्या कसोट्यांवर नाना पडताळण्या केल्या आणि त्याअंती सगळ्याच प्रमाणकांनी आमच्यावर आपापल्या पसंतींची मोहोर उमटवली. इतक्या मोहोरा आमच्याकडे आता जमलेल्या आहेत, की आमचा चेहरामोहरा असा खुलून गेलाय… अभिमानाने उर भरून आलाय… आम्हाला भरून पावलेय आणि म्हणून आम्हाला भरूनही आलेय… उण्यापुऱ्या सहा वर्षांतच आम्ही किती-किती शिखरे सर केलीयेत… प्रमाणकांची ही प्रशंसापत्रे त्याची साक्ष आहेत… आम्ही आता एका अत्यंत उंच अशा शिखराच्या टोकावर उभे आहोत आणि इथून आम्ही सार्थ अभिमानासह हे सांगतो आहोत की, हो… नवोन्मेषाने भारलेल्या हजारो उद्यमींना आम्ही पहिल्यांदा त्यांच्या हक्काचे व्यासपीठ दिले. व्यासपीठावर त्यांना अभिमानाने उभे केले… आणि याद्वारे भारतातील उद्यमशील चैतन्याची पूजा आम्ही बांधली!

नवोन्मेषाच्या गळ्यात आम्ही टाकलेले हे हार अनेकदा नवोन्मेषाच्या विजयाचे शिल्पकारही ठरतात. अनिकेत परिहार यांचा आम्हाला नुकताच आलेला भावगर्भ मेलही हेच सांगणारा आहे! अनिकेतला त्याच्या ‘स्टार्टअप’मध्ये ‘युअरस्टोरी’ची साथ कशी लक्ष्मीच्या पावलाची ठरली, ‘युअरस्टोरी’मुळे अनिकेत पुराणकथेतील नचिकेताप्रमाणे कसा शतपट कार्यप्रवण बनला… वगैरे… वगैरे… मग अनिकेतची गोष्ट पुन्हा सांगण्याचा मोह आम्हाला पडला नाही तरच नवल! आम्ही चित्रपटातल्याप्रमाणे फ्लॅश बॅकमध्ये गेलो आणि गोष्ट धुंडाळली…

बरोबर सहा वर्षे उलटली… म्हणजे २०१० पर्यंत अनिकेत पुण्यातील eClerx Services Ltd कंपनीत टेक्निकल डोमेनमध्ये कार्यरत होता. आणि तेव्हाच युअरस्टोरीच्या संपर्कात आला आणि युअरस्टोरीमध्ये अडकला.

image


अनिकेत लिहितो, ‘‘तुम्हाला हे कळवण्यात मला अभिमान वाटतो, की तुम्हाला पुढेच पुढे जाताना पाहणाऱ्यांपैकी मी एक आहे. मग तो शेतकरी ते प्रयोगशिल व्यावसायिक असा प्रवास साधणाऱ्या केशव प्रसाद यांच्यावरला जुलै २०१० मधला वृत्तलेख असो अगर तुमचे ‘डॉट इन’ ते ‘डॉट कॉम’ असे स्वरूपांतर असो, की तुमचे टेकस्पार्क्स Techsparks, थोडक्यात जे जे म्हणून युवरस्टोरीशी निगडित आहे ते ते सगळेच मला प्रेरणा देत आलेले आहे.’’

अनिकेत नोकरी करत राहिला होता आणि मुंबईला त्याच कंपनीच्या शाखेत त्याची बदली झालेली होती. काम चाललेले असले तरी मनात खोलवर रुजलेली व्यवसाय-उद्यमाची महत्त्वाकांक्षा अनिकेतला स्वस्थ बसू देत नव्हती.

अनिकेत सांगतात, ‘‘उद्यम हाच माझा श्वास आहे, हे मला कळत होते. नोकरी करत असलो तरी उद्यमशीलता सारखे मला खुणावतच होती.’’ युवरस्टोरी जॉब्स्‌ लिस्टिंग ब्राउज्ड करत असतानाच अनिकेत यांना श्रुती धांडा यांच्याबद्दल माहिती मिळाली. श्रुती या दिल्लीत ‘शॉपटूसरप्राइज’ची उभारणी करत होत्या. श्रुती या तंत्र सहसंस्थापकाच्या शोधातच होत्या. अनिकेत यांनी त्यांना मेल टाकण्याचे ठरवून टाकले. अनिकेत सांगतात, ‘‘श्रुती यांची भेट घ्यायला म्हणून मग मी दिल्लीला रवाना झालो. भेट झाली. तत्क्षणी मी त्यांच्या या नव्या प्रवासात सहवाटसरू होण्याचे निश्चित केले.’’ अनिकेत नमुद करतात, ‘‘तेव्हापासून दमदार प्रवास झालेला आहे आणि हा दमदार प्रवास जणू आयुष्यभराची रपेट बनलेला आहे. श्रेय अर्थातच ‘युवरस्टोरी’ला आहे. ‘युवरस्टोरी’ला मी त्याबद्दल देणे लागतो.’’

image


‘शॉपटूसरप्राइजडॉटकॉम’ Shoptosurprise.com बद्दल

एखाद्याला सप्रेम भेट म्हणून काहीतरी देणे हे एकप्रकारचे कलात्मक, कौशल्यपूर्ण असे सादरीकरणच होय. अनेक तंत्र व्यावसायिकांनी लोकांसाठी भेटवस्तू निवडणे आणि ती मित्र वा कुटुंबीयापर्यंत पोहोचवणे ही सगळी प्रक्रिया सहजसुलभ करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे अशी संकल्पना आहे, जी या सगळ्या प्रक्रियेला अधिक सहजसुलभ करू शकते, असा शॉपटूसरप्राइजच्या टीमचा विश्वास आहे. संकल्पना म्हणजे या टिमच्या दृष्टीने संकल्पनांची संकल्पना! अनिकेत सांगतात, ‘‘आम्ही संकल्पनांच्या सर्जनावर भर देतो. या संकल्पना म्हणजे स्वत:च एक ‘सेक्शन’ आहेत. प्रत्येक संकल्पना दुसरीपेक्षा वेगळी आहे. आमच्या साइटवर १३ वेगवेगळ्या अशा मूर्त संकल्पना आहेत. उदाहरणार्थ ‘तुमचे हॅम्पर बनवा’, ‘शुभेच्छा द्या’ या अशा संकल्पना आहेत, जिथे युजर ९९ रुपयांत शुभेच्छा पाठवतो आणि ‘शॉपटूसरप्राइज’ एका कार्डवर लिखित स्वरूपात या शुभेच्छा ठरलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवते. ‘नसण्याविषयी काहीतरी’ हा एक असा संकल्पनावजा सेक्शन आहे, जिथे भेटवस्तू कशी तयार करावी, यासंदर्भातल्या टिप्स असतात. इत्यादी, इत्यादी. अनिकेत सांगतात, ‘‘एका परिपूर्ण सप्रेम भेट समुदायाची उभारणी हे आमचे उद्दिष्ट आहे.’’ दर महिन्याला एक नवे संकल्पनावजा सेक्शन आपल्या साइटवर अनिकेतना सुरू करायचे आहे आणि ते त्यांचे लक्ष्यही आहेच.

कंपनीचे दोन ऑफलाइन स्टोअर्सही सुरू झालेले आहेत. एक डेहराडूनला आणि दुसरे नोयडामध्ये. ‘क्राउड-फंडिंग’ प्रकल्पाची सुरवात करण्याच्या मार्गावरही कंपनी आहेच. ‘विशबेरी’वर Wishberry एक कल्पक दालन याअंतर्गत असेल. युजरच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे हे प्रॉडक्ट असेल, या संकल्पनेवर कंपनीचे काम सुरू आहे. प्रवेश शुल्क ५० रुपये असेल. साहित्य, अवजारे असे बाकी सारेच कंपनीच्या टीमकडून पुरवले जाईल.

शॉपटूसरप्राइजची बारासदस्यीय टीम सप्रेम भेटीच्या दुनियेत आपले आगळे अस्तित्व निर्माण करण्याच्या ध्येयाने झपाटलेली आहे. युजरच्या दृष्टीने सप्रेम भेट अधिक सुकर करण्यासाठी आगामी कार्यक्रम, प्रसंग वगैरेंचे भान ताजे करणारे एक ॲअॅप विकसित करण्याच्या दिशेने कंपनीच्या हालचाली चाललेल्या आहेत.

“How to Become an Entrepreneur ” ‘फंडर्स’ (निधी उपलब्ध करून देणारे) आणि फाउंडर्सबद्दलचे (संस्थापक) हे इन्फोग्राफिक बघायलाही तुम्हाला आवडेल.

image


लेखक : जुबिन मेहता

अनुवाद : चंद्रकांत यादव