युपी पोलिसांनी समाज माध्यमांशी जुळवून घेत अफवा आणि खोट्या बातम्या यांना कसा घातला आऴा!

0

अफवांना आळा बसावा आणि त्या समाजमाध्यमातून पसरू नयेत, ज्यातून अनेकदा समाजात भेदाचा वणवा पसरतो, आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी त्यासाठी ट्वीटर आणि फेसबूकवर गस्त घालण्यास सुरूवात केली असून त्यासाठी समाजमाध्यमात दखल असलेल्यांची मदत घेतली आहे.


डिजीटल मित्र हा प्रायोगिक प्रकल्प त्यासाठी राबविला जात असून तो कायमस्वरूपी ऑगस्ट महिन्यात लागू करण्याचा युपी पोलिसांचा मानस आहे. त्यात २४ तास स्वयंसेवक काम करतील आणि रिट्वीटच्या माध्यमातून किंवा पोस्ट शेअरींग करून समूह संपर्क माध्यमांवर नजर ठेवतील. याबाबत माहिती देताना पोलिस प्रमुखांच्या कार्यालयातील अधिकारी राहूल श्रीवास्तव यांनी सांगितले की, “ आम्हाला समजा माध्यमात सक्रीय असलेल्या अनेकांची माहिती आहे, ज्यांचे मोठ्या प्रमाणात ट्वीटर आणि फेसबूकवर चाहते (फालोअर्स) आहेत. या कार्यक्रमातून निश्चितपणे अफवा रोखता येतील, आणि जनता तसेच पोलिस यांच्यात दुवा तयार करता येईल. जर पोलिसांना कळाले की काही गोष्टी घडत आहेत, आम्ही मुळापासून या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू शकू. त्यासाठी आम्ही माध्यमातून या लोकांची मदत घेत आहोत, ज्यांना आम्ही ‘डिजीटल मित्र’ किंवा ‘डिजीटल स्वयंसवेक’ संबोधतो.

अभय राज, लखनौमधील समाज माध्यमातील संवादकर्ते विद्यार्थी म्हणाले की, “ युपी पोलिसांचा ट्वीटर हँडल अगोदरच सुरू झालं असून त्यांच्या दक्ष उपस्थितीचा परिचय देत आहे. विशेष करून ज्यावेळी ते लोकांना प्रतिसाद देतात तेव्हा हे लक्षात येते. सहारनपूर् दंगलीच्या काळात समाजमाध्यमातून ज्या चर्चा सुरू होत्या, त्यात यांचा प्रत्यय आला”. अभय म्हणाले, “ जर अशाप्रकारे आक्षेपार्ह मजकूर मुळातूनच शोधण्यात आला तर त्याची नक्कीच मोठी मदत मिळणार आहे, त्यामुळे पोलिस आणि समाज दोघांचा फायदाच होणार आहे.” हे डिजीटल स्वयंसेवक समाज माध्यमांवर अफवांचा शोध घेण्याशिवाय पोलिसांना खोट्या बातम्यांपासून देखील सावध करतील.