स्टार्टअप सुरू करताना हे लक्षात ठेवा !

स्टार्टअप सुरू करताना हे लक्षात ठेवा !

Sunday November 22, 2015,

3 min Read

सध्याचा काळ हा स्टार्टअपचा काळ आहे. अनेक महत्त्वाकांक्षी तरुण-तरुणी आपल्या नोकऱ्या सोडून स्टार्टअपच्या जगात प्रवेश करीत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू करायचा असेल तर बाहेरुन गुंतवणूक मिळवणं हाच एकमेव मार्ग आहे कारण कोणताही व्यवसाय चालवण्याबरोबरच सुरू करणंही मोठं आव्हानात्मक असतं. म्हणूनच बाजारपेठेत कितीही आव्हानं असली तरी तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरूवात केलीच पाहिजे. यातूनच तुम्हाला व्यवसायातील आणि अर्थकारणातील मूलभूत गोष्टी जाणून घेण्याची संधी मिळते. गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याआधी तुम्हाला उत्पादन नेमकं कसं घेतलं जातं, लोकांना कसं सांभाळायचं, आपल्या प्राथमिक ग्राहकांना कसं शोधायचं या गोष्टी शिकून घेणं गरजेचं असतं. त्यामुळे एखाद्या व्यवसायाचा आरंभ करताना तुम्हाला उच्च मुल्यांकन मिळवण्याची आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करुन घेण्याची संधी जास्त असते.


image


घरापासून सुरूवात करा – भारतातील काही सगळ्यात मोठ्या उत्पादनांवर आधारित स्टार्टअपची संकल्पना आणि सुरूवात संस्थापकांच्या घरातच झाली आहे. घरातून काम करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही खूप कमी खर्चात, एकाग्रतेने काम करु शकता आणि तुमच्या व्यवसायाचा विकास करु शकतात. तसंच काम करताना तुम्हाला इतर कोणतीही चिंता राहत नाही. पण तुम्ही जर कार्यालय स्थापन करुन त्यात काम करण्याचा विचार केला तर तुमच्या आजूबाजूला खूप गर्दी असल्यामुळे तुम्ही वेगानं काम करु शकत नाहीत. घरातून काम केल्याचा फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काम करता येतं. घराच्या एका कोपऱ्यात तुम्ही कार्यालय सुरू केलं तरी तुमचा खर्च वाचतो आणि त्या वाचलेल्या पैशाचा वापर तुम्ही उत्पादनवृद्धी आणि विक्रीसाठी करु शकता.

कोंडिंग, विक्री आणि विपणनासाठी सर्वाधिक प्रयत्नांची गरज- अनेक स्टार्टअप संस्थापकांनी याच तंत्राचा वापर केलाय. गुंतवणूकदार आणि एक चांगली टीम उभी करण्यापूर्वी त्यांनी उत्पादनवृद्धी आणि विक्रीशी संबंधित सगळ्या बाबींचा अभ्यास करुन घेतला. त्यासाठी त्यांनी प्राथमिक प्रोग्रामिंग, यूजर ऑनबोर्डिंग, विपणन आणि विक्रीसारख्या प्रक्रिया पूर्ण केल्या. तांत्रिक बाबी शिकून घेतल्या तर निर्णयक्षमता वाढते. त्याचप्रकारे विपणन आणि विक्री व्यवस्था समजून घेणंही गरजेचं आहे. कोणतंही काम तुच्छ लेखू नका. तुम्ही ते काम स्वत: केलं तर तुमचे इतर सहकारी ते काम करतील.

कमी खर्चाची किंवा मोफत साधनं मिळवण्यावर भर द्या-

स्टार्टअपसाठी लागणाऱ्या साधनांवर पैसा खर्च करण्याआधी त्यातील काही साधनं किमान काही काळासाठी मोफत मिळवण्याचा प्रयत्न करणं फायद्याचं ठरतं. गुगलवर स्टार्टअप डील आणि इतर ऑफर शोधल्या तर त्यातून बरंच काही फायद्याचं मिळू शकतं. त्याचबरोबर फ्री लान्सरचा वापर केला तर अधिक स्वस्त आणि वेगानं काम होऊ शकतं.

मोफत विपणनावर भर द्या-

उत्पादन सुरू करण्यापूर्वी विपणनावर खर्च करणं टाळा कारण व्यवसायात विपणनावर जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे मोफत विपणन केलं तर उत्पादन खर्च कमी होतो. यात तुम्ही एखादी गोष्ट मोफत उपलब्ध करुन दिली तर एक ब्रँड तयार होतो आणि तुमच्या उत्पादनाची जाहिरातही होते.

अनावश्यक आणि मोठा खर्च टाळा-

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करताना कायदेशीर बाबींमध्ये कोणतीही तडजोड आणि घाई करु नका, ही कामं नंतरही करता येतात. निधीची कमतरता असेल तर तुम्ही तो पैसा उत्पादन, विपणन आणि विक्रीवर खर्च करा. महाग फर्निचर इतर वस्तुंवरील खर्च टाळता येऊ शकतो.

( हा लेख मूळ इंग्रजीत लेखक पुष्कर गायकवाड यांनी लिहिला आहे. गायकवाड यांनी inBoundio ची स्थापना केली आहे.)


अनुवाद- सचिन जोशी