वडील-मुलीच्या जोडीने हिमालयातील सुंगध आणि अत्तर जगासाठी खुले करून दिले!

उत्तराखंडमधील ऍरोमाझीया हिमालयातील जँम, हर्बल चहा, आणि विविध तेलांची निर्मीती आणि विक्री जगभर करतात.

वडील-मुलीच्या जोडीने हिमालयातील सुंगध आणि अत्तर जगासाठी खुले करून दिले!

Thursday January 19, 2017,

3 min Read

१७ वर्षापूर्वी, अखिलेश पाठक यांच्या जीवनात अपघात झाला ज्याने त्यांचे जीवन बदलून गेले, ते आता ५६ वर्षांचे आहेत. त्यांच्या मोडलेल्या दुख-या खांद्यावर नाना प्रकारचे उपचार केले. त्यावर विशिष्ट काळ इलाज केल्यांनतरही जेंव्हा आराम पडत नव्हता त्यावेळी त्यानी त्यांचे ३३ वर्षांचे अत्तर तयार करण्याचे ज्ञान वापरून तसेच उपचार पध्दतीचे ज्ञान वापरून वेदनाशामक तेल तयार केले.

वेदनादायक संशोधनानंतर, अखिलेश यांना योग्य प्रकारचे मिश्रण तयार करण्यात यश मिळाले, वनौषधीच्या उपयोगातून त्यांनी योग्य अशा प्रकारचे तेल तयार केले. या तेलाने केवळ त्यांच्या नाहीतर इतर अनेक मित्र आणि नातेवाईकांच्या जीवनातील वेदनेपासून आराम देण्याचे काम केले. त्यांची कन्या स्वप्नील यांनी मग त्याचे घरगुती दुकान सुरु केले आणि नंतर देशभरात ऍरोमाझेईआ च्या माध्यमातून देशभरात नेले.


image


अभियांत्रिकी पासून सुरुवात

वयाच्या २८ व्या वर्षी पुण्यातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर, स्वप्निल यांनी परत येवून ऍरोमाझीया सुरु करण्याचे ठरविले. ज्यात पूर्णत: नैसर्गिक तेल निर्मितीचे काम सुरु केले. “आमचे ध्येय हेच होते की, या माध्यमातून जगभरात हे प्रेम वाटावे आणि जगभरातील लोकांना एकत्र आणावे”. स्वप्निल सांगतात.

त्यामुळे, लहानश्या शहरात ब्रँण्ड तयार करून आणि त्याचा दर्जा जागतिक पातळीचा राहील यांची काळजी घेत हे आव्हान स्विकारण्यात आले. त्यांच्या लवकरच लक्षात आले की दर्जा नुसार त्यांचे पँकेजींग देखील दर्जेदार असायला हवे होते. स्वप्निल सांगतात की, “ हे तितकेच खरे आहे की तुमचे उत्पादन आकर्षक असायला हवे, जेणे करून गर्दीच्या किरकोळ विक्रीच्या दुकानातही ग्राहक तुमच्या उत्पादनाकडे आकर्षित होतील. त्यामुळे उत्पादनाच्या स्टाईलचा विचार करताना मी ती स्वत:च तयार करण्याचे ठरविले मग ते पँकेज डिझाइन किंवा फोटो शूट असो.”

पाच हजार वर्षांच्या पंरपरेत येताना

मग मुलगी आणि वडील या दुकलीने उत्तराखंडमध्ये स्वत:चे निर्मीतीगृह तयार करण्याचे ठरविले. २०१४च्या शेवटी आणि २०१५च्या सुरुवातीला ज्यावेळी कुटूंबिय १९११ पासूनच ऍरोमा थेरपीसाठी तेल हायड्रोसोल, फ्लेवर्स, आणि सुगंध तयार करत होते, अखिलेश यांना माहिती होते की चांगले उत्पादन कसे तयार करु शकतो.

अत्तराचे उदाहरण देत स्वप्नील सांगतात की, पाण्याची वाफ गाळून तयार केलेल्या उत्पन्नाला एक महिन्याचा काळ जात असे. ही पध्दत पाच हजार वर्षांपासून अस्तित्वात आली आहे त्यात आजवर कोणताच बदल झाला नाही. “ आमच्या अत्तरात आम्ही तेलाच्या ज्या प्रकारच्या ‘बेस’चा वापर करतो, तो सेंद्रीय पध्दतीचा असतो त्यामुळे तो आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आणि सौंदर्यवर्धक असतो.” स्वप्निल सांगतात. मुख्य चमूमध्ये त्या आणि त्यांचे वडील काम करतात, परंतू ते निलम पाठक यांच्याकडून मार्गदर्शनही घेतात, ज्या अखिलेश यांच्या पत्नी आणि स्वप्निल यांच्या आई आहेत. स्वप्निल यांच्या मते त्यांच्यापेक्षा जास्त वनस्पतीची माहिती असणारा माहितीकोश दुसरा कोणताच असू शकत नाही.

ऍरोमाझीया आज विविध वनस्पती, वनस्पती चहा, अत्तर तेल, वेदनाशामक तेल, आणि प्रिझर्वेटीव-फ्री जाम्स, आणि फळांच्या चटण्या तयार करतात. जी सर्व उत्पादने हिमालयात सहा हजार फुट उंचीवर तयार केली जातात आणि पँकेजिंग केली जातात.

जागतिक मूल्य

उत्पादनासाठी निर्मितीची जागा आणि वनस्पतीची लागवड यांवर वडील आणि मुलगी या दुकडीने कौटुंबिक साधने वापरली आणि २०१५ मध्ये अधिकृत सुरुवात केली. एप्रिल २०१५ ते ३१ ऑक्टो. २०१५ दरम्यान त्यांना ४४लाख रुपयांचा महसूल मिळाला. त्यांच्या संकेतस्थळाशिवाय, ऍमेझॉन सारख्या संकेतस्थळावरही त्यांची उत्पादने उपलब्ध आहेत.

गेल्या काही वर्षात, स्थानिक पातळीवरील विशिष्ट उत्पादनांची निर्मिती करण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. त्यात गिस्का आहे. जे पूर्वोत्तर भागातील उत्पादने आणि पदार्थांचे इ-कॉमर्स पोर्टल आहे. काश्मिरी बॉक्स मधून नैसर्गिक उत्पादनांवर भर दिला जातो. हॉपस्कॉच जे भारतीय आयांचे आवडते पोर्टल आहे, त्याने जानेवारी २०१५मध्ये अकरा दशलक्ष डॉलर्सची उलाढाल केली; आणि नैस्रगिक वस्तूंचे ठिकाण असलेल्या एॅथनिक फूडच्या बाजारात क्राफ्टविलाने फेब्रुवारीत पादाक्रांत केले.

ऍरोमाझीयाच्या मोठ्या योजना आहेत. या चमूने अर्जेंटीना,ऑस्ट्रेलिया, बल्गेरिया, बेल्जियम, बोस्निया, ब्राझिल, कोलंबिया, कँनडा, चीन, चिली, डेन्मार्क, इंडोनेशिया, आणि फ्रान्स या सारख्या ठिकाणी उत्पादने पाठविली आहेत.

स्वप्निल म्हणतात, “ ज्या दिवशी आम्ही सुरुवात केली तेंव्हापासून आमचे पहिले प्राधान्य दर्जा हेच आहे, आणि ग्राहकांपर्यंत ते योग्य प्रकारे पोहोचविणे हेसुध्दा आहे. आणि त्यामुळेच आम्ही पुढे पुढे जात ाराहिलो आहोत”.

लेखिका - सिंधू कश्यप