महिलांनी चालविलेले ‘फिरते उपहारगृह’ जे कर्नाटकच्या रस्त्यावर प्रसिध्द होत आहे!

महिलांनी चालविलेले ‘फिरते उपहारगृह’ जे कर्नाटकच्या रस्त्यावर प्रसिध्द होत आहे!

Wednesday September 20, 2017,

2 min Read

महिलांनी चालविलेले मोबाईल कॅन्टीन (फिरते उपहारगृह) ‘ इंदीरा सविरूची कैतुथू’ ची कर्नाटकच्या जिल्ह्यात एक नोव्हेंबरला रस्तोरस्ती धूम होणार आहे.

याची अंमलबजावणी करण्यासाठी महिला संघटनांच्या बचत गटांच्या २०अध्यक्षा प्रत्येक जिल्ह्यात सज्ज झाल्या आहेत. प्रत्येक संघटनेला दहा लाख रूपये देण्यात आले आहेत. ज्यातून त्यांनी वाहने खरेदी करावी आणि खास प्रकारे तयार केलेली भांडी विकत घ्यावी. याबाबतच्या वृत्तानुसार, कर्नाटक महिला विकास महामंडळाच्या अध्यक्षा भारथी शंकर म्हणाल्या की, “कॉग्रेस सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्यातून महिलांना सक्षम करण्यासाठी नियोजित प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी उपहारगृहे सुरू केल्यानंतर ती तालुका पातळीपर्यंत वाढत जातील”. 


image


केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था यांनी यासाठी महिलांना स्वयंपाकाचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. त्यात त्यांना शुध्द नैसर्गिक पध्दतीने अन्न कसे शिजवावे याचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्राथमिक शिक्षण आहे कारण येथे नेमके कोणते पदार्थ करायचे आहेत ते निश्चित नाही आणि महिलांना जे हवे ते पदार्थ त्या शिजवून शिकू शकतात. त्यांना यासाठी देण्यात येणारी रक्कम त्यांनी मासिक हप्ते पध्दतीने विना व्याजी परत द्याय़ची आहे. या उपहारगृहात हलविण्यात येतील अशा खुर्च्या, टेबल्स,आणि लहानश्या उपहारगृहा सारखी व्यवस्था असेल जे फिरते असेल.

याशिवाय, महिलांनी चालविलेल्या बचत गटांना, त्यांचा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यांना कर्नाटक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज दिले जाते, ज्याच्या व्याजाचा दर अनुदानीत दराने असतो.

सध्या बंगळुरूमध्ये दहा अशी फिरती उपहारगृहे आहेत, त्याच प्रमाणे मैसुरू आणि मंगलुरू या शहरातून सुरूवातीला पाच सुरू झाली आहेत ज्यामध्ये प्रतिसाद पाहून वाढ केली जाणार आहे. ‘इंदिरा सविरूची कैतुथू’ उपहार गृहे ही बहुतांश शैक्षणिक संस्था, रूग्णालये, आणि सरकारी आस्थापनांच्या परिसरात असतील आणि त्यात प्रयत्न केले जात आहे की ते इंदिरा कॅन्टीन्सच्या खूप जवळही ती नसतील.

याबाबतच्या वृत्तानुसार ३० कोटी रूपये राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी राखून ठेवण्यात येत आहेत.