२० हजार शहीद जवानांच्या आठवणी जिवंत ठेवणारा देशभक्त, एका सुरक्षा कर्मचा-याची शहिदांना अनोखी मानवंदना   

0

विसरणे हा माणसाच्या स्वभावाचा एक भाग आहे. पण काय आपण अशा लोकांना विसरू शकतो जे आपल्या जवळचे असतात? काय आपण आपल्या कुटुंबातील लोकांना विसरू शकतो जे आपल्या आयुष्याचा एक हिस्सा असतात? नक्कीच नाही? पण देशासाठी शहीद होणाऱ्या आपल्या जवानांना सरकार लक्षात ठेवते का? पण एक अशी व्यक्ती आहे जी १७ वर्षापासून देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला पत्र लिहित आहे. त्यांच्याकडे जवळजवळ २०,००० शहिदांचा तपशील आहे, ज्यात त्यांचे नाव, युनिट नंबर, पत्ता इ. चे विवरण आहे. एवढेच नाहीतर आतापर्यंत त्यांनी सुमारे ३००० पेक्षा जास्त पत्र शहिदांच्या कुटुंबियांना लिहिले आहे. जे शहिदांच्या सन्मानाला संबोधित करतात. “मध्यम वर्गीय कुटुंब व ठराविक पगार असतांना हे करणे सोपे नाही. माझ्या कुटुंबियांना वाटते की मी वेडा झालो आहे, पण मी दृढ संकल्प केला आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या शहीद जवानांच्या आठवणीत त्यांच्या कुटुंबाला पत्र लिहित रहाणार आहे.”

हे शब्द आहे ३७ वर्षीय जितेंद्र सिंह यांचे जे सुरत येथे एका खाजगी संस्थेचे सुरक्षा कर्मचारी आहे. ते आपुलकीच्या भावनेने शहीद कुटुंबियांचे आभार प्रकट करण्यासाठी पोस्टकार्ड लिहितात, ज्यामुळे त्यांना या मार्फत श्रद्धांजली देता येईल व त्याच बरोबर त्यांना ही जाणीव करून देता येईल की कुणीतरी आहे जो त्यांची आठवण काढत आहे व ते या पत्राद्वारे हे स्वीकारतात की जर देशातील नागरिक सुखा समाधानाने रहातात तर याचे श्रेय फक्त शहीद जवानांनाच जाते. मुळतः राजस्थानच्या भरतपूर जिल्यातील कुटखेडा गावातील निवासी जितेंद्र यांनी जम्मू-काश्मीरच्या २००३ मध्ये अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या, हरदीप सिंह या जवानाच्या कामगिरीने प्रेरित होऊन आपल्या मुलाचे नाव हरदीप सिंह ठेवले आहे. जवळजवळ १७ वर्षापासून शहिदांच्या कुटुंबियांना पत्र लिहिण्याचा हा परिपाठ या देशभक्ताचा सुरु आहे. स्वखर्चाने ते पोस्टकार्ड व इतर वस्तूंवर खर्च करतात. त्यांना जेव्हा या पत्रांचा प्रतिसाद येतो तेव्हा त्यांना आपली एखादी इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद होतो.

मी हे पत्र कारगिल युद्धापासून लिहित आहे. मला वाटते की सैनिक होणे हे कठीण काम आहे व हे देशाचे कर्तव्य आहे की त्या शहिदांचा सन्मान केला पाहिजे ज्यांनी देशासाठी आपले जीवन बलिदान दिले आहे. असे कमी लोक असतील जे आपल्या जवळच्यांच्या जाण्याने दु:खी होवून त्यांच्या आठवणीत जगत असतील. आपल्या अश्या कुटुंबाच्या प्रती आपले नैतिक कर्तव्य पूर्ण केले पाहिजे.”

एका जवानाच्या वडिलांनी मला फोन केला होता व त्यांनी मला भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. आम्ही आजपर्यंत भेटलो नाही पण मी नेहमी त्यांना फोन करून आठवण करून देतो की गुजरात मध्ये एक व्यक्ती आहे, जी तुमच्या मुलाबद्दल विचार करते.” जितेंद्र यांचा हा उपक्रम नक्कीच सरकारचे डोळे उघडणारा आहे .

अशाच काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या Marathi YourStory Facebook पेजला लाईक करा.

‘मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ हेच त्यांच्या मन:शांतीचे कारण! तन्ना दंपतीना तरूणमुलाच्या अकस्मात निधनाने मिळाला जगण्याचा नवा मार्ग!

कॅन्सर पिडीतांसाठी मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये गिटार वाजवतात 'सौरभ निंबकर'

७० वर्षाच्या अमला रुईया यांनी राज्यस्थानच्या २०० दुष्काळग्रस्त गावात केली हरितक्रांती  

लेखक – कुलदीप भारद्वाज
अनुवाद – किरण ठाकरे