या 'रॅप' साँग' ने मुस्लीम महिलांच्या हिजाब परिधान करण्याच्या हक्काबाबत जागृती केली आहे!

0

हिजाब (बुरखा) वापरावा किंवा नाही, यावर खूप मोठी चर्चा महिला प्रधान मुस्लिम महिला सुधारकांमध्ये होत आहे. बहुतांश लोकांना हिजाब हा मुस्लिम महिलांच्या शोषणाचे प्रतिक वाटतो, आणि ते तो झुगारून देण्याचा सल्ला देवून गुलामी नाहीशी करा असे सांगतात.

“ काय तुझे केस दिसतात,
पैज लाव ते खूप छान दिसतात,
नको त्यांना तू घामाने भिजवू नको?
त्यांना खूप करकचून बांधू नको?”

मोना हैदर, कवयित्री आणि पर्यावरणवादी, यांनी येथे  'रॅप' साँग'  मधून दावा केला आहे की त्यांना हिजाब वापरण्याचा हक्क आहे.


Image: Huffington Post
Image: Huffington Post

मोना केवळ बोलून थांबत नाहीत, किंवा या प्रकरणात स्वत:साठी गातात. या गाण्यातून त्यांनी महिलांचे प्रतिनिधित्व जगभरात करताना त्यांच्या बाबतीत कसे भेदभाव केले जातात ते दाखवून दिले आहे. या गाण्यात काय आहे ते देखील महत्वाचे आहे, की मोना स्वत: आठ महिन्याच्या गर्भवती आहेत असे व्हिडीओत दिसते.

अर्थात सनातन्यांना धक्का बसला, आणि त्यांनी मुस्लिम महिलेने असे बाहेर दिसण्यावर आक्षेप घेतला, आणि ते सुध्दा गर्भवती असताना. या गाण्याला मिळालेल्या प्रतिसादाबाबत त्या म्हणाल्या की, “ यात धक्का बसण्यासारखे काय आहे की एक गर्भवती महिला तिच्या पोटात वाढणा-या नव्या जीवा सोबत दिसते? महिला म्हणून ज्या सा-या शरीराला चांगले आणि सुंदर समजतात, यातून मला आनंद मिळतो समाजाच्या कुप्रथांना आव्हान दिल्याचा, ज्या आम्हा महिलांचे शरीर कसे दिसावे किंवा नाही यांचे सल्ले देत असतात.”

जरी त्यांच्यावर टीका झाली, अनेक महिला म्हणाल्या की हे गाणे पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली, कारण त्यांना वाटले की, त्यातून त्यांचे सक्षमीकरण होत आहे. हे गाणे मुस्लिम महिला दिनाचा भाग म्हणून प्रसिध्द करण्यात आले, लगेच व्हायरल झाले आणि मुस्लिम महिलांचे राष्ट्रगीत असल्यासारखे वाजू लागले.

मोना या सिरीयन अमेरिकन मुस्लिम कवी आणि कार्यकर्ता आहेत, त्यांनी त्यांचा आवाज वाढवला आहे ज्यावेळी त्यांनी #AskAMuslim मोहिम यूएस मध्ये सुरू केली आहे. त्यांनी समाजात चर्चा सुरू केल्या आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन आणि निर्मिती टुंडे ओलानीरान यांची आहे.