इंग्रजीचा शिक्षक ते चीनमधील सर्वात श्रीमंत माणूस: ‘जेक मा’ यांची संघर्षातून यशाच्या राजमार्गावर येण्याची कहाणी!

इंग्रजीचा शिक्षक ते चीनमधील सर्वात श्रीमंत माणूस: ‘जेक मा’ यांची संघर्षातून यशाच्या राजमार्गावर येण्याची कहाणी!

Friday January 06, 2017,

3 min Read

लहान मुले म्हणून आम्हाला अनेक संघर्षातून यशाच्या कहाण्या सांगण्यात येतात ज्या आमच्या मन आणि मश्तिष्कावर कोरल्या जातात. या यादीला जोडून, किंवा तीची उजळणी करताना एका माणसाच्या जीवनाकडे पाहूया ज्याने जगाच्या अर्थकारणावर प्रभाव टाकला आहे आणि संपूर्ण चीनी इंटरनेट जगताला वादळासारखे व्यापून टाकले आहे.


Image credits: www.creativecommons.com

Image credits: www.creativecommons.com


जेक मा, अलिबाबा समुहाचे संस्थापक, २७.९दशलक्ष डॉलर्सच्या साम्राज्यातून ते चीन मधील सर्वात श्रीमंत व्यक्ति आहेत. मा यांना हे यश काही एका रात्रीत मिळालेले नाही. संघर्ष, पिळवणूक आणि मेहनत यांची परिसीमा गाठल्यांनतर ते येथे पोहोचले आहेत. त्यांच्या या यशामागे एक कहाणी आहे. कदाचित अपयश आल्यावर त्यातून बाहेर पडण्याची जबरदस्त क्षमता त्यांच्यात असावी त्यामुळेच हे शक्य झाले. शेवटी, सातत्याने अपयश येत असेल तर आपल्या पैकी कितीजण त्यातही तग धरून पुढे जात राहतात? जेक मा यांच्या जीवनात सातत्याने अपयश आले तरी ते यशाच्या कमानीतून जातच राहीले.

ते गरीब विद्यार्थी होते.

बालपणीच मा यांना त्यांच्या प्राथमिक शाळेतील जीवनात दोनदा नापास व्हावे लागले, माध्यमिक परिक्षेत ते तीनदा नापास झाले, तर विद्यापीठाच्या प्रवेश परिक्षेत हांगझोऊ सर्वसाधारण विद्यापीठात येण्यापूर्वी देखील तिनदा ते नापास झाले होते. या परिक्षेत तर त्यांना गणित विषयात एक टक्केपेक्षा कमी गुण मिळाले होते. “ माझे गणित चांगले नव्हते, मी कधीच व्यवस्थापन शिकलो नाही, आणि आजतागायत हिशेबाचे ताळेबंद वाचले नाहीत”.एकदा त्यांनी सांगितले होते. पण यापैकी काहीही त्यांना ते आज जिथे आहेत तिथे येण्यापासून रोखू शकले नाही.

अनेकदा त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते.

मा यांची जिद्द आणि चिकाटी यांचेही कौतूक करावे तेवढे थोडे आहे कारण त्यांना सुमारे तीस वेळा वेगवेगळ्या कामांवरून काढून टाकण्यात आले मात्र ते नाराज न होता दुसरे काम शोधत राहीले. इतकेच काय, केएफसीमध्ये निवड झालेल्या २४जणांमधून हाकलून लावण्यात आलेले ते एकमेव होते.

केवळ पाच उमेदवारांमधील ते एकजण होते ज्याची निवड पोलीसदलात झाली होती, मात्र तेथून काढून टाकण्यात आलेले एकमेव होते, कारण त्यांनी ते संगितले की ते ‘चांगले’ नाहीत.

हार्वर्डने त्यांना दहावेळा नाकारले.

त्यांनी हार्वर्डला दहावेळा अर्ज केले आणि प्रत्येकवेळी तो नाकारण्यात आला. दुसरा कुणी असता तर निराश झाला असता पण जेक मा यांनी या प्रत्येक नकाराला नवी संधी म्हणून पाहिले. त्यांच्या जवळ हा सकारात्मक दृष्टीकोन नसता तर काय झाले असते?

त्यांच्यावर नुकसानीचा उद्योग केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

सन १९९९मध्ये मा यांनी मित्रांच्या मदतीने आलिबाबाची स्थापना केली पण सिलिकॉन व्हँलीला निधीसाठी गळ घातली नाही. एकावेळी अलिबाबा दिवाळ्यात जाण्यापासून केवळ १८महिने दूर होती. पहिली तीन वर्ष, अलिबाबाला काहीच महसुल मिळाला नाही. सप्टें २०१४मध्ये अलिबाबा सार्वजनिक कंपनी झाली त्यातून ९२.७० डॉलर्सचे समभाग विकण्यात आले. असे करून ती अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी आय पी ओ ठरली.

सन२००९मध्ये आणि २०१४मध्ये मा यांचे नाव सर्वात प्रभावशाली व्यक्ति म्हणून ‘टाइम’ नियतकालिकात झळकले होते. बिझनेस विक मध्ये चीनमधील सर्वात शक्तिवान व्यक्ति म्हणून त्याची निवड झाली. फोर्बच्या मुखपृष्ठावर देखील त्याची छबी चीन मधील पहिला मुख्यप्रवाहातील उद्योजक म्हणून झळकली आहे.

जेक मा यांच्या बद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे यशाच्या उंच शिखरावर पोहोचल्यावरही त्यांना त्यांच्या पूर्वीच्या दयनीय स्थितीचा विसर पडला नाही. त्यांच्या यशातून प्रेरणा घेणा-या कुणालाही प्रोत्साहन देण्यास ते कुचराई करत नाहीत. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, “ तुम्ही जर काही त्याग केला नसेल तर तुम्हाला अजूनही संधी आहे. तसे करता न येणे हे मोठे अपयश आहे”.

लेखिका - शारिका एस नायर