अकरा महिन्यांच्या बाळाची ही आई, जिने पंचकुलाला जळण्यापासून वाचविण्यास मदत केली!

0

स्वयंघोषित गुरू गुरूमित राम रहिम सिंग यांच्या वरील खटल्याच्या सुनावणीच्या घटनेने पंचकुला परिसरात तणाव निर्माण झाला होता. या हिंसाचारात सुमारे ३८ जणांचा प्राण गेला तर सुमारे तीनशेच्या आसपास लोक जखमी झाले. या सा-या गदारोळात एका घटनेने मात्र हे दाखवून दिले की अजूनही माणुसकी जीवंत आहे.

गौरी पराशर जोशी यांना भेटा, ज्या पंचकुलाच्या उप आयुक्त आहेत आणि अकरा महिन्यांच्या बाळाच्या मातादेखील. ज्यांनी रागावलेल्या निदर्शकांपासून रस्ते शांत ठेवण्याचे काम केले. त्यांनी अंगावर जखमा झेलल्या आणि संतप्त जमाव त्यांच्यावर चालून देखील आला. अनेकांच्या हातात दगड आणि काठ्या होत्या असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे. जरी नंतर स्थिती नियंत्रणात आली असली तरी गौरी
 यांच्या
 शौर्याच्या चर्चा ऐकून त्यांनी देशवासीयांची मने जिकंली.


Source: Tribune Indiaं
Source: Tribune Indiaं

सन २००९मध्ये पदवी प्राप्त ओडिसा कॅडरच्या अधिकारी असलेल्या जोशी सध्या पंचकुला मध्ये गेल्या वर्षभरापासून रूजू झाल्या आहेत. असे याबाबतच्या अन्य वृत्तात म्हटले आहे. यावेळच्या त्यांच्या शौर्याने या तरूण आईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे. यापूर्वी त्यांची नेमणूक कट्टर नक्षल भाग असलेल्या ओडिसाच्या भागात झाली होती, त्यांनी स्थानिक महिलांना गरीबीसारख्या समस्यांशी लढण्यास शक्ति दिली होती त्यातून तणाव वाढला होता.

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरूमीत राम रहिम सिंग याला रोहतक तुरूंगात वीस वर्षांच्या कारावासाची आणि तीस लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याने दोन भाविक महिलांवर बलात्कार केल्यानंतर १८ वर्षांनी हा निर्णय लागला. या दोन प्रकरणाची शिक्षा त्याला एकाच वेळी भोगायची आहे असे याबाबत मुख्य वकील एस के गर्ग नरवाणा म्हणाले. ज्यावेळी विशेष सीबीआय न्यायाधिशांनी विशेष बंदोबस्तात सुनारिया जिल्हा तुरूंगात झालेल्या सुनावणीत याबाबतचा निर्णय दिला.