वयाच्या केवळ ३८व्या वर्षी या “गे” मराठी भारतीयाने इतिहास रचला

आयर्लंडच्या पंतप्रधानपदी पोहोचले ‘लिओ वराडकर’

वयाच्या केवळ ३८व्या वर्षी या “गे” मराठी भारतीयाने इतिहास रचला

Wednesday June 14, 2017,

3 min Read

तुम्हाला थोडे नवल वाटेल की, आयर्लंडच्या पंतप्रधानाचा भारताशी काय संबंध? तर ऐका तुम्ही लिओ वराडकर यांचे नाव ऐकले आहे? केवळ वयाच्य ३८व्या वर्षी त्यांनी आयर्लंडच्या पंतप्रधान पदाची निवडणूक लढली आणि ते जिंकलेसुध्दा! जगातील सर्वात तरूण गे पंतप्रधान म्हणून त्यांनी आता स्थान निश्चित केले आहे. 


Leo Varadkar, Source: BBC(L) and Independent (R)

Leo Varadkar, Source: BBC(L) and Independent (R)


लिओ यांनी नुकतेच त्यांचे स्पर्धक गृहनिर्माणमंत्री सिमॉन कोवेनी यांना ६० टक्के मते घेवून हरविले, आणि फाईन गेल पक्षाला सर्वात मोठा जनाधार असलेला पक्ष म्हणून सिध्द केले. मध्य उजव्या पक्षाच्या ऐंडा केनी यांच्या नंतरचे ते सर्वात तरूण पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करत आहेत आणि ते पहिले गे (समलिंगी) पंतप्रधान म्हणून देखील इतिहास रचत आहेत. बीबीसीने दिलेल्या माहिती नुसार, ते आयरिश परिचारिकेचे पूत्र आहेत, आणि व्यवसायाने डॉक्टर आहेत ज्यांना भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळत आहे. वराडकर यांची पार्श्वभुमी, वय आणि लैंगिकता हा त्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

माध्यमांशी बोलताना लिओ यांनी त्याचा आनंद व्यक्त केला, “ आयर्लंडमध्ये सध्या बालपण व्यतीत करत मोठे होणारे प्रत्येक मूल आता, माझ्याकडे बघेल आणि मला वाटते माझ्या असंभव कहाणीचा आणि पार्श्वभुमीची प्रेरणा घेईल, आणि माझ्याबाबत सारे काही जाणून घेईल, काहीच नाही तरी निदान त्यांच्या स्वत:वरील विश्वास वृध्दिंगत होईलच”.

त्यांनी पुढे सांगितले की, “ पक्ष म्हणून आमचे काम आहे की देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच प्रकारच्या संधी मिळतील कारण आमच्या देशात त्यांचा आभाव आहे. येथे संधीची असमानता आहे ती दूर केली पाहिजे मात्र पक्ष म्हणून मला समान संधीचे गणराज्य म्हणून या देशाला तयार केले पाहिजे.”

त्यांच्या भगिनी शुभदा वराडकर ज्या प्रसिध्द औडिसी नृत्यांगना आहेत, म्हणाल्या की, “ आम्ही स्वातंत्र्यसैनिकाच्या घरातले आहोत ज्यांनी १९६०च्या दशकात मुंबईतून आयर्लंडमध्ये स्थलांतर केले, त्यांचे वडील अशोक यांनी आयरिश परिचारीका मरियम यांच्याशी विवाह केला. लिओ देखील वैद्यकीय डॉक्टर आहे, त्यांचे वडील मुंबईला आणि आमच्या गावी वराडला नेहमी जातात. लिओ देखील येतो. ऐवढेच नाही तर त्याने त्यांचे प्रशिक्षणार्थी म्हणून शिक्षण केईएम रूग्णालयात पूर्ण केले आहे. ज्यावेळी तो क्रीडामंत्री होता, तो आयरिश क्रिकेट संघासोबत मुंबईला आला होता. आमचे मोठे कुटूंब आहे. ज्यावेळी आयरिश बाजूचे कुटूंबिय मुंबईला येतात माझ्या घरी येतात आमचा ६० पेक्षा जास्त नातेवाईकांचा मेळावाच मग आमच्या बोरीवलीच्या घरी भरतो”.

डब्लिनमध्ये अंतिम मते मोजण्यात आली त्यावेळी त्या म्हणाल्या की, “ लिओ म्हणाला आहे की त्याला आनंद झाला आहे, आणि त्याला यशाची खात्री आहे. ऐंडा केनी ज्यानी लिओ यांच्यामुळे पराजय स्विकाराला त्या म्हणाल्या की, “त्यांचा वराडकर यांना पूर्ण पाठिंबा आहे.

हा त्याचा मोठा बहुमान आहे, मला माहिती आहे की तो त्याचे जीवन लोकांच्या आणि देशाच्या कल्याणासाठी वाहून देईल. मला सिमॉन कोवेनी यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की,त्यांनी या निवडणूकीत चुरस निर्माण केली. फाईन गेल पक्षासाठी ही लोकशाहीमधील आश्चर्यकारक लढत होती” केनी ज्यांनी पंधरा वर्ष पक्षाचे नेतृत्व केले, आणि त्या दोन वेळा सहा वर्ष सरकारच्या प्रमुख राहिल्या, त्यांनी अनेकदा आपला राजीनामा उशिराने सादर केला असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.

    Share on
    close