न्यायालयातून राष्ट्रगीत अनिवार्य करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली!

0

कोणताही सिनेमा दाखविण्यापूर्वी सिनेमाघरांना राष्ट्रगीत दाखवणे अनिवार्य करण्याचा निर्णय दोनच दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांना राष्ट्रगीत सुरु असताना उभे राहणे देखील अनिवार्य असल्याचे सांगितले, मात्र आता अपेक्स न्यायालयाने राष्ट्रगीत न्यायालयात अनिवार्य करण्याबाबतची याचिका मात्र फेटाळून लावली आहे.


Image : Live Law
Image : Live Law

याबाबतच्या वृत्तात न्यायालयाने म्हटले आहे की, “राष्ट्रगीत सर्वोच्च न्यायालयात अनिवार्य नाही, याबाबतची योग्य ती याचिका न्यायालयात करण्यात आलेली नाही. त्या पलिकडे जावून आम्ही याबाबत निर्णय थोपवू शकत नाही”. न्यायालयाने या बाबत महाअधिवक्ता मुकूल रोहतगी यांची मदत देखील घेत असल्याचे म्हटले आहे. त्यापूर्वी  न्यायालयाने मागच्या बुधवारी सिनेमाघरातून राष्ट्रगीत अनिवार्य असल्याचा निर्णय दिला होता. त्यावेळी सर्व सिनेमाघरांच्या पडद्यावर राष्ट्रध्वज देखील फडकविला पाहीजे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, वृत्ता नुसार न्यायालयाने म्हटले होते की, “ ज्यावेळी राष्ट्रगीत वाजेल तेव्हा सर्वानी त्याचा आदर आणि सन्मान केलाच पाहीजे, त्यातून राष्ट्रीयत्वाची बांधिलकी आणि देशभक्तीचा परिचय होतो”.