ऑस्ट्रेलियन स्पेलिंग चॅम्पियन बनला भारतीय वंशाचा अनिरुद्ध

भारतीय वंशाचा नऊ वर्षीय अनिरुद्ध काथिरवेल ५० हजार डॉलर ची 'द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी' ही स्पर्धा जिंकून ऑस्ट्रेलिया चा नवा स्पेलिंग चॅम्पियन बनला आहे.

0

भारतीय वंशाचा नऊ वर्षीय अनिरुद्ध काथिरवेल ५० हजार डॉलर ची 'द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी' ही स्पर्धा जिंकून ऑस्ट्रेलिया चा नवा स्पेलिंग चेम्पियन बनला आहे.

मेलबोर्न येथील तमिळ परिवारात जन्मलेल्या अनिरुद्धला ५० हजार डॉलर च्या बक्षिसाने सन्मानित करण्यात आले आणि सोबतच त्याच्या शाळेलाही १० हजार किमतीचे समान देण्यात आले.

छोट्या अनिरुद्धला बक्षीस जिंकल्याचा विश्वासच बसत नव्हता त्याने अन्य स्पर्धकांना त्याला चिमटा काढायला सांगितले म्हणजे त्याला विश्वास होईल.

तो म्हणाला,"मी स्वप्नात नसून जागा आहे हे पाहण्या साठी मी माझे डोळे चोळले" अनिरुद्ध पुढे म्हणाला, "नाही...नाही. खरंच ! मी सांगु शकत नाही. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होता." त्याचे बाबा पृथ्वीराज आणि आई सुजाता १६ वर्षां आधी ऑस्ट्रेलियात आले होते.

छोट्या अनिरुद्धने सांगितले, " मी दोन वर्षांचा असतानाच वाचणे सुरु केले होते. हळू हळू वाचायचा माझा छंद शब्दांच्या प्रेमात बदलून गेला. माझ्या आई वडिलांनी मला प्रोत्साहन दिले आणि  स्पेलिंगच्या विश्वात खोलवर शिरण्यात मदत झाली" तो म्हणाला, " मी स्पेलिंगच्या स्पर्धेत पहिलीत असताना पहिल्यांदा भाग घेतला. मात्र स्पेलिंगच्या स्पर्धेतील माझे पहिले वर्ष फार संघर्षपूर्ण राहिले. " अनिरुद्ध म्हणाला,  "हळू हळू माझा आत्मविश्वास वाढला आणि मी माझी स्पेलिंगची क्षमता वाढवत गेलो. या प्रकारे स्पेलिंगच्या माझ्या यात्रेची सुरवात झाली"

Related Stories

Stories by Suyog Surve