मणीपूरच्या या शेतक-याने संशोधित केल्या १६५ तांदूळाच्या प्रजाती!

मणीपूरच्या या शेतक-याने संशोधित केल्या १६५ तांदूळाच्या प्रजाती!

Thursday July 06, 2017,

3 min Read

मणीपूरच्या पोतशंगबम देवकांत यांनी आपल्या छंद आणि झोकून देण्याच्या वृत्तीतून एक दोन नाही तर १६५ तांदूळाच्या प्रजातींचा शोध लावला आहे. मणिपूरच्या डोंगरी भागातील हवामान एकसारखे नाही, प्रत्येक भागातील वातावरण वेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्यांचे आहे. त्यामुळे तांदूळाच्या वेगवेगळ्या प्रजातींसाठी मणिपूरची ही भौगोलिकता अनुकूल आहे, आपल्या हिरव्यागार शेतात देवकांत यांनी २५ प्रजाती शोधून काढल्या, आणि त्या शिवाय त्यांनी आणखी देशी शंभर प्रजातींचे संरक्षण देखील केले आहे.


पोतशंगबम देवकांत, फोटो साभार: rediff.com

पोतशंगबम देवकांत, फोटो साभार: rediff.com


पाच वर्षांपूर्वी पी देवकांत यांनी आपल्या घरी इम्फाळ मध्ये तांदूळाच्या प्रजाती तयार करण्यास सुरूवात केली. ६५ वर्षांच्या देवकांत यांनी हे काम छंद म्हणून सुरू केले होते. मात्र त्यांना आता त्याचे वेड लागले आहे. पाहता पाहता त्यानी पूर्ण मणिपूरच्या डोंगरी भागात पारंपारिक धान (भात) पिकाच्या प्रजातींच्या संशोधनाची मालिका तयार केली.

मणिपूरच्या एका शेतक-याने कमाल केली आहे. मणिपूरमध्ये जैव वैविध्याचे संवर्धन करण्यात पारंगत असलेल्या पोतशंगबम देवकांत यांनी तांदूळच्या शंभर परंपरागत प्रजातींना सेंद्रीय पध्दतीने पुनरुज्जीवित केले आहे आणि नवा आदर्श निर्माण केला आहे. ते केवळ तांदूळाच्या प्रजातींची शेती करत नाहीत तर ज्या औषधी गुणांच्या प्रजाती आहेत त्यांची देखील लागवड करतात. त्यात सर्वात महत्वाची आहे, ‘चखाओ पोरेटन’ नावाचे काळे तांदूळ. या काळ्या तांदूळात असलेल्या औषधी गुणांमध्ये वायरल फिवर, डेंग्यू, चिकनगुनिया, आणि कर्करोग सुध्दा बरा करण्याचे सामर्थ्य आहे.

त्यांच्या छंदामुळे देवकांत यांनी पाहता पाहता मणिपूरच्या दुर्गम भागातील डोंगरी भाग पिंजून काढला, त्यांना तांदूळाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींचे बीज मिळाले, असे असले तरी अनेक प्रकारच्या प्रजातींचे बीज त्यांना अद्यापही मिळू शकले नाही. या वयात देखील त्यांचे तादूळाबाबतचे वेड कमी होत नाही, त्यामुळे शक्य होतील तितक्या प्रजातीचे बीज मिळवण्याचा त्यांनी चंग बांधला आहे.

देवकांत यांचे संशोधन खास का आहे?

नुकतेच आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय बीज वैविध्य महोत्सव २०१७ मध्ये देवकांत यांनी आपले संशोधन सादर केले. देवकांत यांनी केवळ तांदूळाच्या दुर्लभ प्रजातींची शेतीच केली नाही तर त्यातील औषधी गुणांचा शोध घेतला. देशातील साधारण शेतक-यांप्रमाणेच ६३ वर्षाचे देवकांत जास्तीत जास्त वेळ शेती करण्यात घालवितात. मात्र ते अन्य शेतकरी ज्या प्रकारच्या प्रजाती संशोधीत करत नाहीत त्या शोधण्याचे काम करतात. ते सांगतात की, ‘ हे काम आव्हानात्मक आहे, अनेक बीजांच्या प्रजाती लुप्त होत आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेणे जिकरीचे असते. मात्र आशा होती काही शेतक-यांजवळ या प्रजातींचे बीज मिळाले त्यामुळे मग मी मागे वळून पाहिले नाही. या बीजांना मिळवणे ही नाण्याची एक बाजू होती. मात्र ती किती फायद्याची आहेत याचा शोध घेणे हे आव्हान होते’. देवकांत यांना त्यांच्या या कार्यासाठी २०१२मध्ये पीपीवीएफआरए संरक्षण ऍवार्ड (प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हराइटीज ऍड फारमर्स राइट्स ऍक्ट) देखील मिळाला आहे.

मणिपूरच्या डोंगरी भागात वातावरण एकसारखे नाही, त्यात वेगवेगळ्या प्रजातींना पोषक हवामान आहे. धान म्हणजे तांदूळ पिकासाठी मणिपूर समृध्द राज्य आहे. इंफांळ मध्ये त्यांच्या तांदूळाच्या शेतीला आता प्रयोगशाळेचे रूप आले आहे.

त्यांनी कमी पाण्यात तयार होणा-या पांढ-या तांदूळासोबत काळ्या रंगाच्या तांदूळाची निर्मिती केली आणि त्याचा प्रचार देखील ते करतात. मणिपूरच्या काळ्या तांदूळाच्या अनेक प्रजाती वाढविल्या जातात, त्यात चखाओ पोरेटन सर्वोत्तम आहे. दुष्काळ सदृश्य भागात देखील हे पीक घेता येवू शकते. देवकांत यांचा दावा आहे की शरीरातील कोणत्याही प्रकारच्या कर्करोगावर हा तांदूळ गुणकारी आहे.

एका हिंदी वृत्तपत्राच्या मुलाखती दरम्यान डॉ. अंजली गुप्ता यांनी सांगितले की, ‘चखाओ पोरेटन कर्करुग्णांनी खायला हवा’, खूप महाग ऍलोपॅथीची औषधे आणि त्यांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी चखाओ पोरेटन खायला हवा. सेंद्रीय पध्दतीने याची लागवड केल्याने यातुन कर्करोगावर उपचार होवू शकतात. १५० रू किलो दराने विकल्या जाणा-या या तांदूळात पौष्टीक तत्वांशिवाय अमीनो आम्लांची मात्रा मोठ्या प्रमाणात आहे.

    Share on
    close