गरोदरपणातील तुमच्या प्रत्येक क्षणाचे सोबती

0

नविन तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यात यशस्वी ठरलेले आहे. मात्र तंत्रज्ञानाचा प्रभाव हेल्थकेअर इण्डस्ट्रीवर सर्वात जास्त झाला आहे. डॉक्टर, टेक गुरु आणि रुग्ण असे सर्वजण मिळून निरोगी आरोग्यासाठी नवे पर्याय शोधत आहेत. आता आपण आपल्या कॅलरीज, हृदयाची गती आणि दर दिवशी झोपण्याची सवय याविषयी स्मार्टफोन ऍपच्या माध्यमातून जाणू शकता.

स्त्रीयांच्या बाबतीत गरोदरपणा ही एक अशी अवस्था आहे, ज्यामध्ये आई आणि बाळ दोघांना देखरेखीची खूप आवश्यकता असते. गरोदरपणात तणावपूर्ण नोकरी करणाऱ्या स्त्रीयांसाठी हे सर्व ऍप गरोदरपणाविषयी माहिती देणाऱ्या जुन्या पुस्तकांपेक्षा अधिक लाभदायक आहेत.

प्रेगनन्सी ऍप खूप लोकप्रिय झाले आहेत. गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस ऍप स्टोअरवर हे ऍप हजारो लोकांकडून शोधले गेले आहेत. हे ऍप केवळ बाळाच्या विकासासाठीच नाही तर तुम्हाला तणावमुक्त ठेवायला, योग्य जेवण जेवायला आणि व्यायामासाठी लाभदायक आहेत. यापैकी काही ऍप्सची माहिती येथे देत आहोत.

1. माय प्रेगनन्सी टुडे

'माय प्रेगनन्सी टुडे' ऍप तुमच्या गरोदरपणासंदर्भातील प्रश्नांची व्हिडिओ, न्यूट्रिशन गाईड्स आणि बर्थ क्लबच्या मॉमच्या माध्यमातून उत्तरे देते. कॅलेंडर फंक्शन आणि ट्रॅकिंग युवर बेबीज् मुव्हमेंट, तुम्हाला गरोदरपणाच्या अवस्थेला व्यवस्थित समजून घेण्यास मदत करते. हे ऍप बाळाचा प्रतिदिन विकास पाहण्यासाठी तुम्हाला मदत करते. हे ऍप ऍण्ड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे.

2. प्रेगनन्सी स्प्राऊट

'प्रेगनन्सी स्प्राऊट' नवजात बाळासाठी सल्ला, तपासणी आणि दैनंदिनीचे पर्याय, तसेच काही उल्लेखनीय चित्र प्रदर्शित करते. गरोदरपणातील दिवस आणि बाळाची कीक, अनुकूल माहितीसह व्यक्तिगत केले जाऊ शकतात आणि तुम्ही ते तुमच्या कुटूंबियांसाठी फेसबुकवर पोस्टही करु शकता. हे ऍप आयओएसवर उपलब्ध आहे.

3. बेबीबम्प प्रेगनन्सी प्रो

'बेबीबम्प प्रेगनन्सी प्रो' विस्तृत आणि वापरण्यासाठी सोपे आहे. या ऍपवर फोटो अल्बमच्या माध्यमातून माहिती दिली जाते. तुम्ही तुमच्या बाळाची कीक रेकॉर्डही करु शकता, वजन जाणू शकता. या ऍपच्या माध्यमातून तुम्ही इतर गरोदर महिलांशी संपर्कसुद्धा करु शकता. हे ऍप ऍण्ड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे.

4. हॅप्पी प्रेगनन्सी टीकर

हे ऍप तुमचे आठवड्याचे वजन जाणून घ्यायला तुम्हाला मदत करते. या ऍपच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्या गर्भवती महिलांशी सल्लामसलत करु शकता. यामार्फत तुम्ही गरोदरपणातील आठवणींचा संग्रह करु शकता. हे ऍप ऍण्ड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे.

5. आय ऍम एक्सपेक्टिंग

'आय ऍम एक्सपेक्टिंग' वापरण्यास सोपे आहे आणि वैद्यकीय आणि वैयक्तिक माहिती योग्यरित्या ठेवते. हे ऍप साप्ताहिक सल्ला आणि बाळाचा विकास, साप्ताहिक प्रेगनन्सी व्हिडिओची माहिती देते आणि ही माहिती तुमच्या डॉक्टरला सांगते. हे ऍप ऍण्ड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे.

6. प्रेगनन्सी गाईड इन हिंदी

हिंदीमध्ये खूप कमी ऍप उपलब्ध आहेत. हे ऍप तुमच्या जेवणापासून झोपण्यापर्यंत तुम्हाला मदत करते. हे तुम्हाला पहिल्या आठवड्यापासून नवव्या महिन्यापर्यंत गरोदरपणाबाबत माहिती देते. हे ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

7. एम प्रेगनन्सी

'एम प्रेगनन्सी' आयफोनचे पहिले प्रेगनन्सी ऍप्लीकेशन आहे जे पुरुषांसाठी आहे. या ऍपच्या माध्यमातून पुरुष आपल्या जोडीदाराच्या समस्या समजू शकतो. यामध्ये बाळाची वाढ कशी होते आणि त्याचा आकार याचे वर्णन पुरुषांना समजेल अशा शब्दात सांगितले गेले आहे. हे ऍप केवळ बाळाचे गर्भावस्थेतील वय, तिमाही आणि गर्भावस्था यांचीच माहिती ठेवत नाही तर हे गर्भाधारणेदरम्यान उपयोगी पडणाऱ्या टीप्ससुद्धा देते.

8. प्रेगनन्सी असिस्टेड

नावाप्रमाणेच हे ऍप गरोदरपणाची माहिती देण्यात मदत करते. हे वापरण्यास सोपे आहे. हे ऍप आकडे आणि फोटोच्या माध्यमातून बाळाच्या वाढीसंदर्भात माहिती देते. हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

9. प्रेगनन्सी ++

'प्रेगनन्सी ++' जगामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेले ऍप आहे. या ऍपच्या माध्यमातून बाळाची साप्ताहिक आणि मासिक माहिती फोटोच्या माध्यमातून प्राप्त होते. हे ऍप वडिल, आजोबा-आजी आणि परिवारातील इतर सदस्यांसाठी व्यक्तिगत केले जाऊ शकते. हे ऍप ऍण्ड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे.

10. प्रेगनन्सी ड्यू डेट कॅलक्यूलेटर

'प्रेगनन्सी ड्यू डेट कॅलक्यूलेटर' बाळंत होण्याची तारीख मोजण्यासाठी मदत करते. कॅलक्यूलेटर तुम्हाला बाळ व्हायची तारीख सांगू शकतो. हे पहिल्या तिमाहीपासून शेवटपर्यंतची माहिती देते. हे ऍप ऍण्ड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे.


लेखक- आयुष शर्मा

अनुवाद – अनुज्ञा निकम