रक्षाबंधनानिमित्त शेतकरी व अल्पसंख्यांक भगिनींनी बांधली मुख्यमंत्र्यांना राखी

रक्षाबंधनानिमित्त  शेतकरी व अल्पसंख्यांक भगिनींनी बांधली मुख्यमंत्र्यांना राखी

Tuesday August 08, 2017,

1 min Read

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रक्षाबंधनानिमित्त राज्यातल्या विविध भागातून आलेल्या शेतकरी भगिनींनी वर्षा निवासस्थानी औक्षण करुन त्यांना प्रातिनिधीक स्वरुपात राखी बांधली व शुभेच्छा दिल्या.


image


यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा महत्वपुर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. हा एक उपाय आहे परंतु शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत आणि शेतकरी समृद्ध होईपर्यंत हा लढा चालू राहील. कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीत आपले सरकारच्या माध्यमातून फॉर्म भरावा असे सांगून त्यांनी सर्व महिला शेतकरी भगिनींना रक्षाबंधनानिमित शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनानिमित्त भाजपा अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्या वतीने आज वर्षा निवासस्थानी राखी बांधली व शुभेच्छा दिल्या.


image


या महिलांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रुपये 21 हजाराचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला, यावेळी महिला खान शमिप बानो, शबाना आजम, रिझना आझम, आलिया शेख, फातमा सिद्दीकी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली, यावेळी डॉ.हैमद राणा, हाजी हैदर आझम, वसीम खान, मुनाफ पटेल आदी उपस्थित होते.