गोव्याच्या कैंडोलीम किना-यावर आता अपंगांसाठी व्हिलचेअरची सुविधा!

गोव्याच्या कैंडोलीम किना-यावर आता अपंगांसाठी व्हिलचेअरची सुविधा!

Wednesday April 05, 2017,

2 min Read

गोव्याच्या प्रसिध्द कैंडोलीम समुद्र किना-यावर ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान व्हिलचेअर फ्रेंडली वातावरण असेल. उमोजा, भारतातील पहिले प्रवासी संकेतस्थळ अपंगासाठी सहलीचे आयोजन करत आहे. ज्यांनी अॅडाप्ट आणि दृष्टी या सेवाभावी संस्थेसोबत यासाठी सहभागिता केली आहे.


image


दृष्टी हि संस्था गोव्याच्या पर्यटन विभागाचा भाग आहे, आणि त्यांचा प्राथमिक उद्देश हाच आहे की, समुद्र किनाऱ्यावरील वातावरण सर्वांसाठी सोयीचे बनविणे.

चॅटच्या माध्यामातून गोव्याचे अपंग हक्क संस्थचे अध्यक्ष ऍव्हेलिनो डेसा म्हणाले की, “ उमोजाने अपंग संस्थेशी हातमिळवणी केली आहे, स्थानिक लोक, जल क्रीडा चालक, आणि हॉटेल चालक यांच्या मदतीने कैंडोलीम समुद्र किना-याचे वातावरण बदलून भारतातील पहिला व्हिलचेअर फ्रेंडली किनारा म्हणून साकारण्यात येत आहे.”

याचाच भाग म्हणून, या संस्थानी बोर्ड वॉकची स्थापना बिच च्या प्रारंभीच केली आहे जी पाण्याच्या दिशेने घेवून जाते. सोबतीला चांगल्या प्रकारच्या व्हिलचेअर असतील ज्या अपंगांना पाण्यात खेळण्याच्या आणि पोहण्याच्या आनंदासाठी मदत करतील. या चेअरच्या चाकांच्या टायरची रचना ते वाळूत रूतणार नाहीत अशाप्रकारे केली आहे.

यशवंत होळकर, उमोजाचे सीइओ, म्हणाले की, “ या व्हिलचेअर अगदी बीच लाऊंज चेअर सारख्या असतील, ज्या पाण्यात देखील हलक्या असल्याने तरंगतील.” आयोजकांच्या मते या महोत्सवात भारतातील राज्यांना नवे उदाहरण मिळणार आहे, अशा प्रकारच्या पर्यटनालाही मागणी आणि प्रतिसाद मिळतो आहे.

व्हिलचेअर युजर्स गाईड देखील गोव्यात उपलब्ध करून दिले जात आहे, ज्यात गोव्यातील ३५ हॉटेल्स, रेस्टॉरेंट्स, आणि प्रसिध्द पर्यटनाची आकर्षणे कोणती याची माहिती असेल. #BeachFest2017 चा ट्रेंड चांगलाच वधारण्याची स्थिती आहे.