यश त्यांनाच मिळते जे यशाबद्दल खात्री बाळगतात- धीरज गुप्ता, संस्थापक ‘जंबोकिंग’

यश त्यांनाच मिळते जे यशाबद्दल खात्री बाळगतात- धीरज गुप्ता, संस्थापक ‘जंबोकिंग’

Sunday July 24, 2016,

6 min Read

जर आपण महाराष्ट्रात राहात असाल तर रोजच्या सारखे आजही वडापाव खायला विसरु नका. असे करण्यासाठी आणखी छान गोष्ट आहे की, आपण त्यांच्यासाठी वडापाव खरेदी करा ज्यांनी आपणांस प्रेरित केले आहे. होय, मी आपल्या रस्त्यावरील अन्न विशेषकरुन वडापावला पसंती देतो. आज आपल्याला वडापाव खायलाच हवा कारण जंबोकिंग आपला १४ वा स्थापना दिवस साजरा करत आहे ज्याला वडापाव दिवस म्हणूनही साजरे केले जाते.

या उत्सवाला जो ब्रांड आज कारणीभूत आहे, उद्यमशिलतेची ती एक अनोखी कहाणीच आहे. जंबोकिंग, धीरज गुप्ता, त्यांच्या परिवारातील तिस-या पिढीतील उद्यमीद्वारे स्थापित करण्यात आला. धीरज यांचे कुटूंबिय हॉटेल आणि खानपान व्यवसायात होते आणि त्यांची मिठाईची दुकानेसुध्दा होती. त्यामुळे सिंबोयसीस पुणे मध्ये एमबीए केल्यांनतर धीरज यांनी दुबईप्रमाणेच भारताच्या बाजारात मिठाई निर्यात करण्याचा निर्णय घेतला. खरेतर मिठाईच्या निर्यातीचा हा प्रयत्न फसला आणि धीरज यांना दुकान बंद करावे लागले. त्यांचा दुसरा उद्यम स्ट्रिटफूड होता आणि चाट फॅक्टरीच्या नावासहित त्यांनी मुंबईच्या मालाड मध्ये एक दुकान सुरु केले. जसजसा व्यवसाय वाढत गेला धीरज यांच्या लक्षात आले की, धीरज यांच्या मेन्यूमध्ये सर्वाधिक विक्री वडापावची होते आणि या विशेष खाद्य पदार्थासोबत आणखी काम करण्याचे त्यांनी ठरविले. अशाप्रकारे जंबोकिंगची यात्रा सुरू झाली.

image


सुरुवातीचे दिवस

धीरज गु्प्ता सांगतात की, “ याचा अनुभव लग्नासारखाच होता, ज्यात तुम्हाला माहिती नसते की काय होणार आहे. तुम्हाला सतत सुधारणा आणि सावरासावर करावी लागते आणि आपण शिकतो की लग्नानंतरची पाच वर्ष वेगळी, मुले झाल्यावर वेगळी, स्थिती सारखी बदलत राहते. याचा कोणताच फार्म्युला नाही. प्रत्येक पती आणि पत्नी आपला रस्ता निवडतात”. आणि याच सिध्दांतानुसार धीरज यांनी व्यवसायातसुध्दा पालन केले. व्यावसायिक कुटूंबातून आल्याकारणाने बाहेर काम करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर कधीच नव्हता. व्यावसायिक पार्श्वभूमीमुळे त्यांनी यात उडी घेतली.

जंबोकिंगने २००१मध्ये आपले पहिले दुकान उघडले आणि ज्यावेळी रस्त्याच्या बाजूला दोन रुपयांत वडापाव विकला जात होता त्यावेळी दुकानात त्यांनी याची किंमत पाच रुपये ठेवली होती. धीरज सांगतात की, “ लोकांना दुकानातील वडापाव बाबत उत्सुकता होती” स्वच्छतेच्या कारणाने हे अंतर आले. हळुहळू चवींचे प्रकार आणि बटर वडापाव, पनीर वडापाव, शेजवान वडापाव सुरु केले. विक्री वाढली आणि सातत्याने नवीन काहीतरी करणे सुरु ठेवले. जंबोकिंगने लवकरात लवकर महानगरात फ्रेंचाईजी दुकाने सुरू केली. त्यांनी आपली दुकाने अशा जागी सुरू केली जेथे जास्तीत जास्त लोक येतात. जसे की, रेल्वे स्थानकांच्या बाहेर. दोनशे-तिनशे चौरसफुटाचे दुकान योग्य होते आणि घरी जाताना, बैठकीला जाताना गाडी पकडणारे लोक त्यांचे ग्राहक होते. खरेतर रेल्वे स्थानकाजवळ सुरू करण्याचे कोणताही फार्म्युला काम करत नव्हता. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाबाहेर सुरू केलेल्या दुकानाचा अनुभव त्यांनी आम्हाला सांगितला, धीरज आठवण करून सांगतात की, “ आम्हाला पुलाखाली एक छान जागा मिळाली, पण आम्हाला तेथे विक्री करता आली नाही, आणि आम्ही आपल्या ब्रांड, उत्पादन विक्री यावरचा विश्वास गमाविण्यास सुरुवात केली कारण पन्नास मीटर अंतरावर दुसरा व्यक्ती वडापावचा जोरदार व्यवसाय करत होता.” अधिक माहिती घेतल्यावर समजले की, कमी विक्री होण्याचे कारण मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावर येणारी गर्दी होती. धीरज सांगतात की, “ आम्हाला जाणवले की तेथे कोणतेही महाविद्यालय किंवा कार्यालय नाही, केवळ कारखान्यातील कामगार आणि मिल मजूर जात होते आणि त्यांच्यासाठी एक रुपयाचे अंतर ही सुध्दा मोठी गोष्ट होती.” यातून आम्हाला धडा मिळाला की गर्दीचे स्थानक आमच्या साठी कामाचे नव्हते.

image


उद्यमतेच्या बाबतीत दुसरा धडा दुकांनांच्या प्रकाराबाबत होता. फ्रेंचाईजी मॉडेल सोबत सुरू केल्यानंतर, २००७मध्ये जंबोकिंग मालकीच्या आपल्या दुकांनांच्या यात्रेवर निघाले. धीरज सांगतात की, “ आम्हाला कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळाली त्यामुळे लोक म्हणू लागले की, तुम्हाला स्वत:च्या मालकीची दुकाने सुरू केली पाहिजेत, आपण जास्त कमाई कराल आणि पुढच्या तीन वर्षात आम्ही कंपनीच्या फ्रेंचाईजी खरेदी करण्यास सुरूवात केली आणि कंपनी मालकीची दुकाने खरेदी करु लागली. दोन्ही केल्यानंतर जंबोकिंगने २००कोटी रुपयांचा व्यवसाय केला”.

सुरुवातीपासून धीरज खूपच स्पष्ट होते की, ते ब्रांडला अधिकाधिक मजबूत करतील. त्यामुळे बारा वर्षापासून ते त्यांचे उत्पादन वडापावशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यांनी त्यात सातत्याने बदल केले, पण आतापर्यंत एक पूर्णत: वेगळे उत्पादन यात त्यांनी आणले नाही. धीरज सांगतात की, “ आधी पंधरा वर्षांसाठी, मॅकडोनाल्डने आपल्या मेन्यूमध्ये बर्गर, फ्राईज आणि कोक यांच्याशिवाय काहीच दिले नाही. इतके की पाच-सहा वर्षात लोक येऊ लागल्यानंतरही त्यांच्या मेन्यूमध्ये २-३ गोष्टी होत्याच. त्यांनी त्यांचे लक्ष एकाच उत्पादनावर ठेवले. त्याचवेळी त्या उत्पादनाच्या चारही बाजुला आणखी काही करण्यात आले जेणेकरून त्यांना स्वचालन, आधुनिक तंत्रांचा खर्च यांचा निर्वाह करता यावा आणि कंपनी चालविणे सोपे जावे.”

प्रवासाकरिता प्रेरणा

धीरज मॅकडोनाल्डचे खूप मोठे प्रशंसक आहेत, आणि जंबोकिंगला मॅकडोनाल्डसारखा मोठा ब्रांड करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे मान्य करायला त्यांना काही वाटत नाही. धीरज सांगतात की, “ आपण आपल्या चारही बाजूला ब्रांडवर नजर टाकली तर दिसते की, त्यातून ९०%अमेरिकेत तयार होऊन आले आहेत. आणि हा केवळ योगायोग नाही, ते ब्रांडीगला समजतात जे जपानलाही समजले नाही. इतके की, आकियो मेरितोला अमेरिकेत जावे लागले आणि सोनी ब्रांड तयार करावा लागला.” रे क्रोकच्या जीवनचरित्राने धीरज यांच्यासाठी जणूकाही बायबलसारखे काम केले आहे.

आज जंबोकिंगने दहा रुपयांपासून ७५रुपयांपर्यंतच्या उत्पादनांना वडापाव म्हणून आणले आहे. अलिकडेच ब्रांडमध्ये नव्यारुपात समोसा जोडण्यात आला आहे. जंबोकिंग च्या भटारखान्यात १.५टन पॅटीस एक तासात बनविण्याची क्षमता आहे. त्यांनी सांगितले की अनेक खाद्य श्रेणी त्यात आहेत पण एक तज्ञ डॉक्टर सामान्य डॉक्टरपेक्षा जास्त कमाई करेल, यासाठी धीरज यांना विश्वास आहे की, तज्ञता यशाची पहिली पायरी आहे.

वाचनाचे शौकीन धीरज यांना अल रिएस चे पुस्तक ‘फोकस’ आणि जँक ट्राऊट यांचे पुस्तक ‘डेथ ऑफ ऍडवर्टायजिंग’ आणि राइज तसेच पीआर सारख्या पुस्तकांनी प्रेरणा दिली. आम्ही त्यांना विचारले की वाचनासाठी वेळ कसा काढता तर त्यांनी रुचकर व्याख्या सांगितली. ते हसत सांगतात की, “ जाहिरात किंवा मार्केटिंग एजन्सीत दोन कोटी रुपये घालवण्यापेक्षा बाजारहाट समजण्यासाठी दोनशे रुपयांची पुस्तके वाचणे गरजेचे वाटले ”.

उद्यमींचे कठीण जीवन

आज जंबोकिंग चांगल्या प्रकारे वाढत आहे आणि हा ब्रांड भारताच्या नऊ शहरात हजर झाला आहे. मुंबई, ठाणे, बंगळूरू, औरंगाबाद, म्हैसूर, दिल्ली अमरावती, इंदौर आणि रायपूर . पण सुरुवातीला सारे कठीणच होते. धीरज आठवून सांगतात की, “ जेंव्हा मी एमबीए पूर्ण केले. माझ्या सा-या सहका-यांची मोठ्या पगारावर नियुक्ती होत होती. काही म्हणत होते की, आपण एमबीए केले आहे आणि रस्त्याच्या बाजूला विक्रेत्यांशी स्पर्धा करत आहात” उद्यमींना दृढता असण्याची खूप गरज आहे. आपल्या आजुबाजूचे लोक पैसा कमावित आहेत आणि आपण मात्रा केवळ स्वप्नात जगत आहोत. त्यावेळी आपण आणि कदाचित आपली पत्नी आपल्यावर विश्वास ठेवते आणि कुणी नाही. धीरज सांगतात की, “ तुमच्याजवळ विश्वास ठेवायला आणखी कुणीच नसते, कारण तुम्हाला काहीतरी वेगळे करायचे असते,जे आधीकुणीच केले नसते. पहिली तीन वर्ष खूप एकटेपणाची असतात जेंव्हा आपण आपल्या कार्याला आव्हान देता. लोक म्हणतात की मॅकडोनाल्ड करु शकतो, पण वडापाव मध्ये होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या वातावरणात आपण काम करतो. स्टाफ आपल्याला सांगत असतो की सर व्हरायटी म्हणून समोसा कसा वाटेल”.

जंबोकिंगने पहिल्या दिवसापासूनच पैसा मिळवण्यास सुरुवात केली, पण तो सगळा व्यवसाय विकसित करण्यात जात होता, चांगली सक्षम यंत्रणा, यंत्रसामुग्री आणणे. काळानुसार जंबोकिंगची वेगवेगळी टीम असते. धीरज सांगतात की, “तुम्हाला आधिक जाणून घेण्यासाठी एका टीमच्या रुपात अधिक कुशल असावे लागते. मी माझ्या टिमला नेहमी सांगतो की, पुढच्या तीन वर्षात आपण इथे असू उठा आणि काम सुरू करा.”

वडापाव दिवसांचा उत्सव साजरा करण्यासाठी धीरज खूप अभिमानाने १५ ऑगस्टला त्यांच्या ९५ लाख वडापाव विक्रीची घोषणा करु इच्छितात, आणि जानेवारी पर्यंत शंभर लाखांच्या विक्रीच्या आकड्याची वाट पहात आहेत. ज्या प्रमाणे एमबीए झाल्यानंतर नोकरी करणे हा त्यांच्यासाठी पर्याय नव्हता, ते मानतात की त्याच प्रकारे यशासाठी देखील कोणताही जवळचा मार्ग (शॉर्टकट) नसतो. त्यांच्या आवडीच्या या ओळी ज्या त्या़ना प्रेरित करतात, ‘ यश त्यांनाच मिळते जे त्यावर सर्वाधिक विश्वास ठेवतात, आणि दीर्घकाळ ते विश्वास टिकवून ठेऊ शकतात’.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

'रोडीज ते फुडीज्' कवनीत साहनी यांचा रंजक प्रवास

मुंबईत या माता-पूत्र जोडीने ‘बोहरी किचन’च्या माध्यमातून कसा बदलला ‘घर का खाना’चा अर्थ!

बिर्याणी घरपोच वितरीत करणारे क्विक सर्व्हिस रेस्टोरेंट ʻचारकोल बिर्य़ाणीʼ


लेखिका : प्रिती चामीकुट्टी

अनुवाद : नंदिनी वानखडे -पाटील

    Share on
    close