यशस्वी उद्योजक बनायचे असेल तर...

2

आपल्या कार्यालयात पोहोचल्यानंतर सर्वसाधारणपणे लोक सर्वप्रथम आपले ई-मेल पाहतात. त्यानंतर ते मिटिंगमध्ये व्यस्त होतात आणि मग आपल्या सहकार्यांसोबत गप्पा केल्यानंतर पुन्हा ई-मेल किंवा फेसबूक पाहण्यात वेळ घालवतात. दरम्यानच्या काळात ते थोडेबहुत काम सुद्धा करतात. तो पर्यंत लंच घेण्याची वेळ झालेली असते. असेच काहीसे लंचनंतर देखील चालत असते. लंच नंतर थोडेबहुत काम, ई-मेल पाहणे आणि मग घरी जाण्यासाठी संध्याकाळी साडे पाच वाजण्याची वाट पाहणे.

परंतु जेव्हा कुणी आपली नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु करते तेव्हा मग या दिनचर्येत बदल होतो. आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करणा-या प्रत्येक उद्योजकाची वेगळी कहाणी असते. परंतु असे असले तरी, इतरांपासून ते वेगळे आहेत हे अधोरेखित करणा-या काही गोष्टी त्यांच्यामध्ये समान देखील असतात.

आपल्याला काय करायचे आहे हे त्यांना ठाऊक असते

कोणताही उद्योजक आपल्या दिवसाची सुरूवात अनियमीतपणे करत नाही. आपल्याला दिवसभरात काय करायचे आहे हे त्याला पक्के माहित असते. त्यांची अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे काय आहेत याची त्यांना माहिती असते. हे काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने तो उद्योजक पूर्ण निष्ठेने आपल्या कामाला लागत असतो. बहुतेक उद्योजक आपल्या दिवसभरातील कामांची यादी तयार करतात आणि मागील आठवड्यात केलेल्या कामांची ते पुन्हा माहीती घेतात. इतकेच नाही, तर झोपी जाण्यापूर्वी ते उद्याच्या दिवसात करायच्या कामाची आखणी देखील करतात. त्यानुसारच ते आपल्याला उद्या किती वाजता उठायचे आहे हे निश्चित करतात.

कामाला प्राथमिकता

उद्योजकांसाठी केवळ कामाची यादी बनवणे इतकेच पुरेसे नसते. आपल्याला दिवसभरात कोणते काम करायचे नाही याबाबत सुद्धा त्यांना चांगली माहिती असते. तसे पाहता कामे दोन प्रकारची असतात, एक म्हणजे गरजेची (तातडीची) आणि दुसरी महत्त्वाची. जी कामे गरजेची ( तातडीची) असतात त्या कामांसाठी उद्योजकांना जास्त लक्ष द्यावे लागते. परंतु प्रत्येक काम काही महत्त्वाचे असते अशातला भाग नसतो. उदारहणार्थ मागच्या महिन्यात आलेल्या जास्तीच्या टेलिफोन बिलाबाबत कॉल सेंटरमध्ये तक्रार नोंदवणे गरजेचे नसते. उद्योजक महत्त्वाच्या कामाचा सर्वात आधी निपटारा करतो. त्यानंतर मग तो इतर कामे हातावेगळी करत असतो. कोणताही उद्योजक ८०/२० चा नियम पाळत असतो. या नियमानुसार ८० टक्के उत्पादकता असते आणि २० टक्के काम. या गोष्टी करण्यात उद्योजक कुशल असतात.

मल्टी टास्किंग

बहुतेक उद्योजक हे एखाद्या विशेष क्षेत्राचे विशेष ज्ञान असते. परंतु त्यांना इतर क्षेत्रामध्येही तितकीच उत्कृष्ट कामगिरी करायची असते. कोणत्याही उद्योजकासाठी सीईओचा अर्थ चीफ एव्हरीथिंग ऑफिसर ( मुख्य सर्वकाही अधिकारी) असा असतो. उद्योजकाला तो विविध प्रकारची कामे करताना त्याला संकोच वाटणार नाही असा चांगला प्रोग्रॅमर असावे लागते. मग भले ते काम परीक्षणाचे असो, डिझाईनचे असो, विपणनचे असो, विक्रीचे असो, ग्राहक सहायतेचे असो, लोकांना कामावर नेमण्याचे असो, किंवा मग खुर्च्यांची साफसफाई करण्याचे असो. आपल्या संस्थेचा विकास झाल्यानंतर उद्योजकाला प्रत्येक क्षेत्रासाठी विशेषज्ञाची नेमणूक करावी लागते. परंतु त्याला सर्व प्रकारच्या कामांची माहिती असणे गरजेचे असते.

कामावर विश्वास

उद्योजक केव्हाही यश मिळवण्यासाठी शॉर्टकट मार्ग शोधत नाहीत. ते आपल्या कामावर मनापासून प्रेम करतात आणि त्यासाठी आपले शंभर टक्के देत असतात. ते देवाकडे लॉटरी जिंकण्यासाठी मदत मागत नाहीत.

अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास

कोणीही उद्योजक अशिक्षित नसतो. परंतु उद्योजक केवळ मौजेसाठी शिकत नाहीत, तर ते शिकण्यासाठी शिक्षण घेतात. त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळावी हा त्यामागचा उद्देश असतो. उद्योजक एखाद्याचे जीवन चरित्र, उद्योजकता, आध्यात्मिकता, मानवी मानसशास्त्र आणि आपल्या कामाशी संबंधीत भरपूर ब्लाॅग्स वाचतात. या व्यतिरिक्त ते मासिके, पाक्षिकांशिवाय दररोजच्या वर्तमानपत्रांवर देखील नजर टाकत असतात.

टीव्ही पाहत नाहीत

ही एक अशी गोष्ट आहे जी बहुतेक उद्योजक करत नाहीत. ते आपला वेळ टीव्ही पाहण्यात वाया घालवत नाहीत. टीव्ही पाहण्याऐवजी ते चित्रपट किंवा डॉक्युमेंटरी पाहण्यात आपला वेळ खर्च करतात. टीव्हीच्या रिमोटपासून दूर राहणेच त्यांना आवडते.

चांगली झोप घेणे

कोणताही उद्योजक आपल्या झोपेशी तडजोड करत नाही. रात्रीची चांगली झोप आरोग्यासाठी खूपच गरजेची असते हे सत्य कोणापासून लपून राहिलेले नाही. आपल्या कामाच्या व्यापामुळे त्यांची रात्रीची झोप गायब झालेली असायची असे उद्योजक अनेदा सांगत असतात, मात्र हळूहळू त्यांनी या गोष्टीवर नियंत्रण मिळवायला सुरू केले. ‘आरोग्यदायी मेंदू आरोग्यदायी शरीरातच वास करत असतो’ असे म्हटले जाते ते याच कारणामुळे.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe