कलाकार आणि डिझायनर्सला प्रगतीची दारं खुली करणारी ‘Canvs.in’

0

भारतातील डिझायनर्स आणि कारागिरांना एकत्र आणण्याच्या हेतूनं देवप्रोतिम रॉय, विकाश चौधरी आणि अंकित अगरवाल या आयआयटीच्या तीन माजी विद्यार्थ्यांनी कॅनव्हास डॉट इनची निर्मिती केली. या व्यासपीठावर कारागिर आणि डिझायनर्स त्यांचं काम अपलोड करू शकतात, ऑनलाईन विक्री करू शकतात, मित्रांसोबत गप्पा मारू शकतात, नोकरी आणि प्रकल्प शोधू शकतात आणि ऑफलाईन प्रदर्शनं किंवा कार्यशाळा आयोजित करू शकतात. सध्या भारतात कला क्षेत्रात खूप बदल होत आहेत आणि कॅनव्हास डॉट इन हे अशाच विविध डिझाईन आणि कलांना मिळालेलं व्यासपीठ आहे, असं देवप्रोतिम सांगतात.


कॅनव्हास डॉट इन ही अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनची मुंबईतली सल्लागार समिती आहे.

१. देशातील सर्वोत्तम डिझायनर्स आणि कारागिरांना एकाच छताखाली आणून त्यांचा समूह तयार करणं. त्यामुळे जागेचा गोंधळ दूर होतो. तसंच त्यांना एकमेकांना जाणून घेण्याचं आणि संवाद साधण्याचं हे व्यासपीठही आहे.

२. डिझाईन आणि कला क्षेत्रातल्या सृजनशील लोकांना एकत्र आणणं, विक्री सोपं करणं आणि त्यांच्या शंकाचं आणि प्रश्नांचं निरसन करणं ही कॅनव्हास डॉट इनची ध्येयं आहेत. सृजनशील व्यासपीठ निर्माण करण्यासोबतच कॅनव्हास डॉट इनची निर्मिती होण्यामागे काही व्यावहारिक कारणंही आहेत. या व्यवसायापूर्वी विकास आणि अंकित यांचा छपाईचा व्यवसाय होता, तर देवप्रोतिम यांचा स्वत:चा एक प्रकल्पही होता. त्या तिघांनाही एक समान समस्या भेडसावत होती, ती म्हणजे डिझाईनच्या प्रतिभेची, कौशल्याची कमतरता..व्यवसाय करताना विविध प्रकारच्या डिझाईनवर आधारित कामाची खूप गरज होती. त्यासाठी देवप्रोतिम चांगल्या डिझायनरच्या शोधात होते. देवप्रोतिम यांची आयआयटीमध्ये असताना अनेक छायाचित्रकार आणि कारागिरांची ओळख होती. अशा प्रकारे मुक्तपणे काम करणारे कारागिर, डिझायनर्स मिळवणं आणि आपण करत असलेलं काम पोहोचवणं हे अत्यंत अवघड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याच कारणामुळे या तिघांनी सध्या अस्तित्वात असलेल्या समस्या, त्यांना उपलब्ध असलेली जागा आणि डिझायनर्सच्या श्रेणी यावर संशोधन करायला सुरुवात केली. त्यासाठी देशभरातल्या कारागिर आणि डिझायनर्सशी ते बोलले आणि ऑनलाईन फोरमवरही त्यांनी संवाद साधला.

भारतात डिझाईनचं क्षेत्र हौशी उत्पादनापेक्षा गरजेची वस्तू म्हणून विकसित झालेलं पहायला मिळतं. २००८च्या मंदीनंतर जागतिक स्तरावर कलाक्षेत्रात प्रचंड बदल झाले. भारतात तर मंदीच्या आधीच्या काळापेक्षाही हे क्षेत्र विस्तारलं. भारतातील बहुतेक अन्य बौद्धीक क्षेत्रांप्रमाणेच कलाक्षेत्रही विकसित झालं. पण मुख्य प्रवाहापासून मात्र दूरच राहिलं. चांगले कारागीर किंवा कौतुक करण्यासारख्या कला आणि कारागीर यांचा शोध कुठे आणि कसा घ्यायचा याबद्दल सर्वसामान्य माणूस अनभिज्ञच राहिला.

कॅनव्हास डॉट इनमध्ये मोठ्या शहरांमधल्या कौशल्याशी स्पर्धा करु शकेल असे यूजर्स अर्थात कारागिर छोट्या आणि मोठ्या शहरांमधूनही येताना दिसतात. मोठ्या शहरांमध्ये अशा कलांना किंवा कारागिरांना व्यासपीठ मिळतं, तांत्रिक पाठिंबा मिळतो जो छोट्या शहरांमधल्या कारागिरांना मिळत नाही हाच मुख्य फरक आहे. केवळ चार महिन्यांत आमच्या युजर्सची संख्या एक हजारावर पोहोचली आहे आणि ती वाढतेच आहे, असं देवप्रोतिम सांगतात.

कॅनव्हास डॉट इन ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. यावर प्रवेश म्हणजे देशात काय कौशल्य आहे याचं उत्तम निदर्शक आहे. कॅनव्हास डॉट इन हे एक ऑनलाईन ग्राफिक डिझाईन सॉफ्टवेअर आहे. सामान्य यूजर तसंच डिझायनरला याच्या माध्यमातून इ-मेल, बॅनर्स, पोस्टर्स अशा सुंदर रितीनं ऑनलाईन संवाद साधता येतो. देशभरातले दररोज साधारण दोन हजार यूजर त्यांना मिळतात आणि सध्या त्यांचे देशभरात १ लाख ५० हजार यूजर असल्याचा त्यांचा दावा आहे. २०१६ च्या अखेरीपर्यंत एकट्या भारतातून एक दशलक्षापेक्षाही जास्त ग्राफिक मिळवण्याच्या दृष्टीनं त्यांचं नियोजन सुरु आहे. त्यांना नुकतंच १५ दशलक्ष डॉलर्सचा निधी मिळाला आहे. ग्राफिक डिझायनर्सची ही संख्या गाठली जाऊ शकते. आम्ही कॅनव्हास डॉट इनच्या सुरुवातीपासूनच याच दिशेनं काम करत आहोत, असं रॉय सांगतात.

ड्रीबल आणि बेहान्ससारखे इतर जागतिक स्तरावरील स्पर्धकही स्थानिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आता भारतीय बाजारपेठेत शिरण्याच्या प्रयत्नात आहेत. २००६ पासून बेहान्सने समूह निर्मितीमध्ये सहभाग घेण्यास सुरूवात केली आहे . प्रकल्प आणि पोर्टफोलिओवर ते विशेषत: लक्ष केंद्रित करीत आहेत. ड्रीबल हा एक छोटा पण कार्यक्षम लोकांचा एक समूह आहे. त्यांनी अमेरिकेतील नोकरीच्या क्षेत्रात प्रवेश केलाय आणि त्याचा त्यांना फायदाही झालाय. डीझायनर्सना त्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन करुन त्याबद्दल माहिती देण्याची संधी मिळवून देण्याकडे ड्रीबलचं लक्ष असतं.

नुकतंच या क्षेत्रात बनानाबंडी आणि क्युपिकसारख्या फर्म्स काही वेगळ्या संकल्पना घेऊन उतरल्या आहेत. बनानाबंडी ही विविध डिझायनर्ससाठी ऑनलाईन बाजारपेठ आहे. डिझायनर्सना सहभागी होता येतील अशा स्पर्धांचे आयोजन करण्याचं काम ते करतात. क्युपिक ही कलाकारांना त्यांच्या कलाकृती भारत आणि परदेशात प्रदर्शित करुन त्यांची विक्री करण्यास मदत करते. या क्षेत्रात त्यांनी नुकताच प्रवेश केला आहे.

इतर स्पर्धकांच्या तुलनेत कॅनव्हास डॉट इनची एक समूह म्हणून हळूहळू पण सतत प्रगती होते आहे. पोर्टफोलिओ तयार करणे, कलाकारांचा शोध घेणे, त्यांच्या कलाकृतींची विक्री करणे, काम मिळवून देणे आणि ऑफलाइन प्रदर्शन आणि कार्यक्रम आयोजित करण्याचं कामही ही कंपनी करते.

स्थानिक पातळीवरही कॅनव्हास डॉट. इन ही उत्पादनं आणि कामं यात अग्रेसर आहे. कला आणि डीझाईनवर लक्ष केंद्रीत करण्याबरोबर कॅनव्हास डॉट. इनने वाढती स्पर्धा असलेल्या कामं मिळवण्याच्या क्षेत्रातही प्रवेश केलाय. आता चांगला जम असला तरी आम्हाला पूर्ण निधी मिळालेला नाही आणि आणखी निधीच्या शोधात असल्याचं रॉय सांगतात. सध्या ९ जणांची टीम आहे. समूहला आणखी बळकट करण्यासाठी उत्पादन वाढीकरीता जास्तीत जास्त प्रयत्न करत असल्याचं रॉय सांगतात. त्याचबरोबर जास्तीत वर्कशॉप आणि प्रदर्शनं आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही रॉय स्पष्ट करतात.

कला आणि डिझाईनच्या क्षेत्रातील Canvs.in हे क स्टार्टअप आहे.

अधिक माहितीसाठी http://www.canvs.in/ वर क्लिक करा.

लेखक – सुशील रेड्डी

अनुवाद – सचिन जोशी