मेडस्केपइंडियाचे छोटा भिम आणि छोटे डॉक्टर्स; जे तुम्हाला वैद्यकीय मदत करुन बरे करतात !

मेडस्केपइंडियाचे छोटा भिम आणि छोटे डॉक्टर्स; जे तुम्हाला वैद्यकीय मदत करुन बरे करतात !

Wednesday February 08, 2017,

3 min Read

वर्गात खोड्या करणा-या मुलाला जसे वर्गाचा मॉनिटर केले जाते, त्यामुळे त्याला किंवा तिला जबाबदारीचे भान येते. अगदी तशीच संकल्पना घेवून ‘मेडस्केप इंडिया’ने ‘जंक फूड’ युवा पिढीला त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी मिनी डॉक्टर्स म्हणून तयार केले आहे.

या मिनी डॉक्टर्सना आरोग्यपूर्ण जीवनशैली कशी असावी? यासाठी काय प्रथमोपचार करावे? याचे प्रशिक्षण देऊन तयार केले जात आहे. कार्डिओ पुल्मोनरी रेस्क्यूसिकेशन (सीपीआर) या कार्यक्रमांतर्गत या मुलांना रक्तस्त्राव, किंवा हाड मोडणे अशा प्रसंगी काय प्रथमोपचार करावे याचे प्रशिक्षण दिले जाते, जेणे करून आणिबाणीच्या वेळी काय करावे याचे त्यांना भान येते आणि त्यांच्या या अभियानासाठी यथायोग्य प्रतिक मिळाले आहे ‘छोटा भिम’! त्यामुळे आता छोटाभिम आणि लहान डॉक्टर्स जनजागृती करत आहेत आणि ह्रदयविकाराच्या धक्क्याबाबत जागृती अभियानात सहभागी झाले आहेत, ज्या आजाराने भारतात प्रत्येक ३३ सेकंदाला एका माणसाचे जीवन संकटात सापडते.


image


जरी लहान मुलांना या अभियानात सामावून घेण्यात आले असले तरी त्याचे संयुक्तिक कारण देखील आहे. जी मुले किमान वीस जणांना आपल्या शाळेच्या माध्यमातून या अभियानात सामावून घेतील त्यांना लिटील डॉक्टर हा किताब आणि प्रमाणपत्र दिले जाते. अर्थातच शाळांना देखील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याबाबत प्रशस्ती दिली जाते. आणि त्या वीस जणांना देखील या राष्ट्रीय अभियानात सहभागी झाल्याबद्दल लिटिल डॉक्टर प्रमाणपत्र दिले जाते.


image


याबाबत सर्वात महत्वाचे असते की, जे मूल यासाठी आरोग्यदृष्ट्या योग्य असेल (फिट) त्यालाच आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रचार करण्यासाठी निवडले जाते. त्यात आरोग्यपूर्ण आहार आणि व्यायाम करणा-या बालकांची निवड केली जाते. त्यामुळे लठ्ठपणा, किंवा वाढत्या वयात होणा-या आजारांची शक्यता नसलेल्या मुलांची निवड केली जाते. या शिवाय त्यांचे कुटूंबिय, समाज, शाळा, लहान मुलांच्या संगोपनाच्या सुविधा, वैद्यकीय सुविधांची उपलब्धता, या सा-या पार्शवभुमीचाही विचार केला जातो.

छोटा भीम आणि लिटील डॉक्टर्स व्यवस्थापकीय टीम

छोटा भीम आणि लिटील डॉक्टर्स व्यवस्थापकीय टीम


एका आकडेवारी नुसार, आठव्या वयापर्यंतच्या सुमारे ९६ टक्के विद्यार्थी दूरचित्रवाणी पाहतात, ९० टक्के संगणक वापरतात,८१ टक्केच खेळ खेळतात, आणि ६१ टक्के मुलं अॅप्सच्या माध्यमातून वेगवेगळे गेम्स खेळत असतात. यात त्यांचे किमान दररोज वीस ते पंचविस मिनिटे वाया जातात. लहान मुलांच्या लठ्ठपणाच्या अभ्यासात असे दिसले आहे की, ४१ दशलक्ष मुले लठ्ठ झाली आहेत किंवा वयापेक्षा त्यांचे वजन जास्त आहे. लहानपणात योग्य आहार मिळाला नाहीतर हा आजार बळावू शकतो. काही मुलांना योग्य आहार मिळत नाही, त्यांच्यात दीर्घकालीन किंवा तात्कालीन रोगांची किंवा आरोग्याच्या तक्रारीची शक्यता असते. अशा मुलांना आहार न मिळणे किंवा चुकीचा आहार मिळणे धोकादायक असते. त्यातून लठ्ठपणा, मेंदूचा विकास न झाल्याने मठ्ठपणा, भावनिक आजार, किंवा अभ्यास मागे पडण्याची शक्यता निर्माण होते.


image


मेडिस्पेस इंडियाच्या डॉ. सुनिता दुबे म्हणाल्या की, “ अनेक वर्ष अनेक डॉक्टरांसोबत काम केल्यांनतर आमच्या लक्षात आले आहे की यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. ज्यात आरोग्यपूर्ण सवयी लहान वयात तयार करण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यामुळे आम्ही फिट इंडिया अभियान सुरु केले. या अभियानात सहभागी झालेल्या मुलांनी केवळ फिट आणि आरोग्यपूर्ण व्हायचे नाही तर, जीवनरक्षक बाबींची माहिती घेवून प्रथमोपचार शिकावे आणि जीवनरक्षकाच्या भूमिकेत काम करावे आणि देशाचे काम करावे हे अभिप्रेत आहे. यासाठी आम्ही सीएसआरच्या माध्यमातून, सरकार किंवा कार्पोरेटसच्या माध्यमातून सहकार्याच्या प्रतिक्षेत आहोत. जे फिटइंडिया अभियानाला चालना देवू शकतात”.


image


मेडस्केप इंडिया आर्यन मेडिकल ऍण्ड ऐज्युकेशनल ट्रस्ट ही ना नफा सेवाभावी संस्था आहे, जे आरोग्य आणि महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात काम करतात.