छायाचित्रणाच्या छंदातून अव्दितीय, एकमेव महिला कलावती: रोनिका कंधारी !

छायाचित्रणाच्या छंदातून अव्दितीय, एकमेव महिला कलावती:  रोनिका कंधारी !

Wednesday October 28, 2015,

4 min Read

एखाद्या कलाकारात नवे विश्र्व निर्माण करण्याची जिद्द असेल, तर कलात्मकतेला एखाद्या सीमारेषेत बांधून ठेवणे अवघड आहे. मकबूल फिदा हुसैन, किशोर कुमार आणि प्रसून जोशी यांच्या सारख्या बहुआयामी प्रतिभेच्या कलावंतानी आपल्या मुख्य कलांसोबतच इतरही शैलीमध्ये प्रयोग केले आणि यश मिळवले. रोनिका कंधारी देखील अशीच एक कलावती आहेत. ज्यांनी आरामदायी जीवनशैलीच्या विवाहसोहळा छायाचित्रण(लक्झरी लाईफस्टाईल वेडिंग फोटोग्राफी)च्या क्षेत्रात एका दशकापेक्षाजास्त काळ गाजवला आहे आणि मार्गदर्शक बनल्या आहेत.

रोनिका पहिल्या भारतीय महिला आहेत, ज्यांनी या आव्हानात्मक क्षेत्रातही आपला ठसा उमटवून दाखवला आहे. त्या पहिल्या भारतीय महिला आहेत ,ज्यांना सौदी राजघराण्यातील छायाचित्रण करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी सुनील भारती मित्तल (एअरटेल),नारायण मुर्ती(इन्फोसिस),याशिवाय अमृता अरोडा, जेनेलिया आणि रितेश देशमुख यांच्यासह बॉलिवूड कलावंतांचे छायाचित्रण केले आहे.

लग्झरी लाईफस्टाईल वेडिंग फोटोग्राफीशिवाय रोनिका यांनी पंधरापेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. याशिवाय सन २०१२मध्ये ‘चलो ड्रायवर’ नावाच्या एका सिनेमाची निर्मिती देखील केली आहे. त्यांच्या या कामाला आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था, जसे की ‘वोग’, ‘ग्रेजिया’, ‘इंडिया टूडे’, आणि ब्राईड्स यांनी प्रकाशित केले आहे.

image


एक ग्राफिक डिझायनर आणि बॉलिवूड सिने निर्माती, रोनिका यांच्याकडे संवेदनशिलता आणि ज्ञानाचे भांडार आहे, त्यामुळेच त्या आज लोकप्रिय ठरल्या आहेत. रोनिका म्हणतात, ‘या पृथ्वीवर विवाह हा सर्वात सुंदर आयोजनापैकी एक सोहळा आहे, लोक खूश असतात. सारे वातावरण आनंद आणि वेगवेगळ्या भावभावनांनी भारून गेलेले असते.’ त्या मानतात की, प्रत्येक लग्नाची आपली स्वत:ची एक कहाणी असते आणि प्रत्येक लग्नात वेगवेगळ्या प्रकारच्या आश्चर्यांचा आणि नाट्याचा समावेश असतो. परंतू हे सारे त्याचवेळी होऊ शकते, ज्यावेळी हे सारे चांगल्या प्रकारे कँमेरात कैद केल जाईल! कारण एखादा जर क्षण चुकला तर तो पुन्हा मिळू शकत नाही. कारण यात कोणताही रिटेक नसतो.

शिख परिवारातील रोनिका यांनी ‘एपीजे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, त्रिवेणी कला संगम आणि न्यूयॉर्क फिल्म अँकँडमी मधून पदवी मिळवली आहे.

image


पुरूषप्रधान क्षेत्रात महिलेला आपले नाव मिळवण्यात किती अडचणी आहेत?

या पुरूष प्रधान क्षेत्रात (लक्झरी लाईफस्टाईल वेडिंग फोटोग्राफी) एकमेव महिला असल्याने रोनिकाचा प्रवास आव्हानात्मक आणि विस्मयकारक राहिला आहे. त्या सांगतात की, ‘पुरूष छायाचित्रकारांच्या घोळक्यात कोणत्याही प्रकारचा वेगळा अँगल त्या नक्कीच मिळवत असत. हे काम सोपे नक्कीच नव्हते. रात्री उशीरापर्यंत काम करणे, किमती आणि वजनदार कँमेरे आणि लेन्स सोबत आठ ते दहा तास सातत्याने काम करणे, खूपच कठीण गोष्ट असायची.’

रोनिका यांना मोठी संधी त्यावेळी मिळाली ज्यावेळी ओसवाल ग्रुपचे कार्यकारी व्यवस्थापक आदिश ओसवाल यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना काम करण्याची संधी दिली. त्यांच्या ग्राहकांमध्ये अल् सऊद (सौदी अरबचा राजपरिवार),प्रफुल्ल पटेल, विलासराव देशमुख,सज्जन जिंदल,(जिंदल स्टिल),सुनिल भारती मित्तल (एअरटेल),वेणू श्रीनिवासन् (टिवीएस),अतुल पुंज(पुंज लॉइड),आणि मुंजाळ(हिरो होंडा)सारख्या बड्या नावांचा समावेश आहे.

रोनिका इतक्या कलात्मक कशा राहतात?

रोनिका त्यांच्या बरोबरीच्या छायाचित्रकारांच्या तुलनेत यामुळे वेगळ्या ठरतात,कारण त्या स्वत: समाधानी नसतात जोवर त्यांच्या छायाचित्रांना एक खास, अनोखा अँगल मिळत नाही ज्यामुळे ते छायाचित्र इतरांपेक्षा वेगळ्याप्रकारचे सुंदर छायाचित्र ठरेल. त्या म्हणतात की, ‘वेगवेगळ्या कोनातून छायाचित्रणाचा प्रयत्न करते,(त्यासाठी त्यांना भिंतीच्या आत घुसावे लागले किंवा हवेत लटकावे लागले तरी),यामुळे मी अशी छायाचित्रे काढू शकते ज्यामध्ये मी भारताच्या सर्वोत्तम छायाचित्रकाराच्या यादीत समाविष्ट होऊ शकले आहे.

रोनिका यांना हे सगळे करण्याची प्रेरणा वेगेवेगळ्या देशाचा प्रवास करणे, नविन फँशनचा वापर, सर्वोत्तम वास्तुकला आणि विभिन्न कलेच्या शैलीचा वापर केल्याने मिळते.

कलेत तंत्रज्ञानाचे महत्व

रोनिका यांचे म्हणणे आहे की, ‘पापणी मिटण्याच्या क्षणार्धात व्हावे इतके तंत्रात बदल होत आहेत. अशात वेळेवर दर्जेदार उत्पादन देण्यासाठी खूपच मेहनत करावी लागते. जर कोणी एखाद्या नव्या आणि अत्याधुनिक उपकरण आणि निर्मीतीपश्चात तंत्रज्ञानाबाबत माहितगार असेल तर, तो आपली कला आणि कामाला वेगळे परिमाण मिळवून देऊ शकतो. येणारा काळ डिजीटल आणि समुह संपर्क माध्यमांचा (सोशल मिडिया)आहे.

पुढचा प्रवास

रोनिका यांनी आपल्या जीवनाचे पान उलटले आहे, त्यामुळेच त्यांची कलात्मकतेची दुनिया समोर आली आहे. ते एक अत्याधुनिक स्टुडिओ आणि कलादालन होते जेथे सर्वोत्तम छायाचित्रणाचे नमूने ठेवले होते. रोनिका यांनी सांगितले की, ‘ही मोठी जागा माझ्या त्या व्यापक विचारांसाठी आहे जिथे छायाचित्रणाला घराच्या अंतर्गत सजावटीसाठी वापरले जाईल.

हौशी कलाकार आणि व्यावसायिकांसाठी शिकवण

रोनिका सांगतात, ‘प्रत्येक छायाचित्रकाराची आपली एक स्टाईल असायला हवी. इतरांच्या छायाचित्रणाने प्रेरित होणे चांगली गोष्ट आहे, परंतु त्याने इतरांच्या छायाचित्रात हरवून जाता कामा नये, त्याच्या पध्दतीत वाहून जाता कामा नये.’ त्या छायाचित्रकारांना आवाहन करतात की, त्यांनी खूप अभ्यास करावा आणि आपल्या स्वत:च्या कल्पना तसेच दूरदृष्टीता यांचा विकास करावा. त्या म्हणतात, ‘तुम्ही जेवढे कष्ट कराल तितकेच भाग्यवान ठराल, कारण मेहनतीचे काम नेहमीच फायद्याचे असते.’

त्या पुढे सांगतात की, ‘कलात्मकता आणि व्यावसायिकता दोन्ही एकाच खांबाची दोन टोके आहेत. परंतु स्पर्धा जिंकण्यासाठी दोन्हीत आपण पारंगत असले पाहिजे. तुम्ही स्वत:चा रस्ता स्वत: तयार केला पाहिजे. पुढाकार घ्या आणि इतरांना तुमच्या मागे येऊ द्या.’