‘नोटस्‌जेन’च्या तयार नोटस्‌ने परीक्षा सोप्पी!

‘नोटस्‌जेन’च्या तयार नोटस्‌ने परीक्षा सोप्पी!

Friday November 06, 2015,

4 min Read

महाविद्यालयातले ते फुलपंखी दिवस आजही आठवतात. वर्गमित्रांकडून चांगल्या नोटस्‌ मिळवण्यात त्या मस्त दिवसांतला बराच वेळ वाया जात असे. बिचारा टॉपर. त्याच्यामागे तर सगळेच लागलेले असायचे. एरवी त्याला फारसे कुणी विचारत नसे, पण परीक्षा जवळ आली रे आली, की तो ‘हिरो’ व्हायचा. सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. रिव्हिजनची वेळ येई आणि अशात नेमक्या महत्त्वाच्या नोट्‌स हरवून जात असत. परीक्षचे्या आदल्या दिवसाची रात्र म्हणजे ‘कत्तल की रात’… कुणी विसरू शकतं का ती रात्र. झेरॉक्सवाल्याकडे त्या रात्री लांबलचक रांग लागलेली असे.

नोट्‌स एकमेकांना देणे-घेणे तसे जुनेच आहे. प्रत्येक कॉलज कॅम्पस्‌ची नोटस्‌च्या संदर्भात आपली स्वतंत्र कथा आहे. स्वतंत्र व्यथा आहे. आजकालचा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे. आणि टेक्नॉलॉजी तुमचे जगणे अधिक सुकर करते आहे. सुलभ करते आहे. अशात जर आमच्या मोबाईलमध्ये या सगळ्या नोटस्‌ आम्हाला मिळाल्या तर? जरा विचार करा… टवाळखोर बॅकबेंचर्स जे पैसे झेरॉक्सवर खर्च करतात आणि जो काही कागद वाया घालवतात. कागद वाचतील तर झाडे वाचतील, पण वाचला तो पैसा जर टॉपरच्या खिशात गेला… तर? शेवटी टॉपरच या नोटस्‌ तयार करण्यात आपली सगळी मेहनत खर्ची घालतो. कितीतरी पाने त्याने चाळलेली असतात. समिकरणे धुंडाळलेली असतात. किती कष्ट उपसतो हा टॉपर. जरा विचार करा, की नोटस्‌ची देवाण-घेवाण आता तुमच्या कॉलेजपुरती मर्यादित राहिलेली नाही. तिने कॅम्पस्‌ची सीमा ओलांडलेली आहे आणि आयआयटी, एमआयटी, स्टॅनफोर्ड आणि हॉर्वर्डचे टॉपरही आम्हाला या नोटस्‌ पुरवताहेत. माहिती देताहेत. ज्ञान देताहेत. तर? कसं वाटलं आता? हायसं वाटलं का?

Notesgen हे एक असेच व्यासपीठ आहे. इथं विद्यार्थी, शिक्षक आणि व्यावसायिक नोटस्‌ची देवाण-घेवाण करू शकतात.

image


वेबसाइट आणि मोबाईल ॲअॅपवर (ॲअॅपल आणि अँड्रॉइड) असलेली ‘नोटस्‌जेन’ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, व्यावसायिक आणि एवढेच नव्हे तर शिक्षण संस्थांनाही हस्ताक्षरातील अगर टाइप केलेल्या नोटस्‌, संशोधन साहित्य हे सगळे जगभरात पोहोचविण्याची आणि विकण्याची संधी उपलब्ध करून देते आहे. सद्यस्थितीत नोटस्‌जेनवर इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, मेडिकल सायन्स, लॉ, आर्टस्‌, मॅनेजमेंट, आयएएस, सीए/सीएस सारख्या १४ विद्याशाखांच्या नोटस्‌ शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

नोटस्‌जेनचे मोबाईल ॲअॅप हे ॲअॅपल आणि अॅड्रॉइडवर ३० जून २०१५ पासून विनामूल्य उपलब्ध आहे आणि लवकरच विंडोज्‌, ब्लॅकबेरी आणि टॅबलेटस्‌च्या माध्यमातूनही ते सुरू केले जाणार आहे. नोटस्‌ खरेदी करू इच्छिणारे आपल्या गरजेनुसार ॲअॅप अगर वेबसाइटवर नोटस्‌ सर्च करू शकतात. प्रत्येक कंटेंटच्या तीन पानांचा प्रिव्ह्यू करू शकतात. ग्राहकाला जर नोटस्‌ भावली वा उपयुक्त वाटली तर तो त्यासाठी विक्रेत्याला ठरलेले पैसे देऊन हे कंटेंट म्हणजेच नोटस्‌ आपल्या मोबाईल फोनवर अगर कॉम्प्युटरवर डाउनलोड करू शकतो. नंतर त्या ऑफलाइन देखील उपलब्ध होणार आहेत.

नोटस्‌ आणि अन्य साहित्य वाजवी किंमतीत उपलब्ध आहे. विक्रेते साधारणपणे त्यासाठी ५० ते २५० रुपये आकारतात. इथे मात्र ग्राहकाला NCash चा फायदा मिळतो. एनकॅश ही एक डिजिटल करंसी सिस्टिम आहे. तुम्ही जेव्हा नोटस्‌जेनवर रजिस्ट्रेशन करता, आपल्या नोटस् त्यात टाकतात अगर त्यातल्या नोटस्‌ विकत घेता तेव्हा प्रत्येक व्यवहारात तुम्हाला एनकॅश प्राप्त होते. नोटस्‌जेन नोटस्‌ तयार करणाऱ्याला, शिक्षण साहित्य तयार करणाऱ्याला मनाप्रमाणे ते शेअर करण्याचे आणि विकण्याचे हक्क प्रदान करते. नोटस्‌ तयार करणारे बहुतांशी विद्यार्थीच असतात. थोडक्यात विक्रेते आणि ग्राहक दोघांनाही एकमेकांच्या गरजा चांगल्या प्रकारे माहितअसतात.

मानक यांच्या कल्पनेतून नोटस्‌जेन जन्माला आली. नंतर काही जुने मित्रही या उपक्रमात सहभागी झाले. मानक यांनी आपल्या आवडीबरहुकूम काम करण्यासाठी मोठमोठ्या संधी धुडकावून लावल्या. अनेक प्रस्ताव नाकारले. ज्यादिवशी तुम्ही साचेबद्ध विचार करणे सोडता, त्यादिवशीच तुम्ही काहीतरी नवा विचार सुरू केलेला असतो, यावर मानक यांचा विश्वास आहे. हाच त्यांच्या कंपनीचा आणि कार्यसंस्कृतीचा मूलमंत्रही आहे. मानक सांगतात, ‘‘अशा अनेक इनोव्हेटिव्ह फिचर्सवर नोटस्‌जेनचे काम चाललेले आहे. मानक कार्निगी मेलन विद्यापीठाचे (Carnegie Mellon University ) विद्यार्थी आहेत. इथे त्यांनी ई-बिझनेस टेक्नॉलॉजी या विद्याशाखेत एमएस केले. नोटस्‌जेन त्यांच्या इंजिनिअरिंगच्या दिवसात सुरू झालेला दुसरा उपक्रम आहे.

मानक यांच्याशिवाय या उपक्रमात रोमन खान आणि अंकुर शर्मा यांच्यासारख्यांचे मजबूत नेतृत्व आहे. रोमन खान तांत्रिक जबाबदारी सांभाळतात. अंकुश शर्मा कार्यान्वयनासह प्रॉडक्ट डेव्हलपमेंटची जबाबदारीही कौशल्याने पार पाडतात.

image


जानेवारी २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या नोटस्‌जेन ॲअॅपचे ५० हजारांहून अधिक युजर्स आहेत. यावर १० हजारांहून अधिक नोटस्‌ आहेत आणि नोटस्‌ खरेदी-विक्रीचे हजारांहून अधिक व्यवहार या क्षणापर्यंत पार पडलेले आहेत. भारतातून सुरू झालेल्या या उपक्रमाने जगभरातील २० हून जास्त देशांमध्ये धडक मारलेली आहे. नोटस्‌जेनला ‘सीएल एज्युकेट’सारख्या शिक्षणातील विविध तज्ज्ञ संस्थांचे पाठबळ आहे. ‘सीएल एज्युकेट’ने या उपक्रमात मोठी गुंतवणूकही केलेली आहे. शिक्षण उद्योगातील दिग्गज जसे सत्या (करियर लाँचरचे सीईओ), अरविंद झा (परीक्षा लॅब्सचे सीईओ) आणि राजीव सराफ (लेप्टन सॉफ्टवेअरचे सीईओ) यांनी मिळून नोटस्‌जेनमध्ये ५० हजार डॉलरची गुंतवणूक केलेली आहे.

नोटस्‌जेन या पुढाकाराबद्दल सत्या म्हणतात, ‘‘एखाद्या विद्यार्थ्याला एमआयटी, आयआयटी, आयआयएम अगर स्टेनफोर्डसारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांतील टॉपर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नोटस्‌ प्राप्त होऊ शकत असतील, तर त्याहून चांगली गोष्ट काय असू शकते?’’

नोटस्‌जेनला मिळणारा प्रतिसादही उत्साहवर्धक आहे. शैक्षणिक साहित्याच्या क्षेत्रात आघाडीची कंपनी बनण्यासाठी नोटस्‌जेनने कंबर कसलेली आहे. आवश्यकतेनुसार अधिकाधिक गुंतवणूक प्राप्त करण्याच्या दिशेनेही नोटस्‌जेनच्या कामाला वेग आलेला आहे.

२०१४-१५ मध्ये भारतातल्या शैक्षणिक बाजारात जवळपास ६ हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज आहे. २०१७ पर्यंत बाजार ४० अब्ज डॉलरला भिडलेला असेल. दुसरीकडे भारतात ऑनलाइन शैक्षणिक साहित्याचा बाजारही वेगाने फोफावत आहे. पुढेही तो असाच फोफावत राहील. दोन कारणे या मागे आहेत. एक म्हणजे भारताची निम्मी लोकसंख्या २५ वर्षांहून कमी वयाची आहे. दुसरे म्हणजे मोबाईलचा प्रसार झपाट्याने होतो आहे.