औषधविक्रेत्याचा मुलगा ते भारतातील दुस-या क्रमांकाचा श्रीमंत: दिलीप संघवी यांची विलक्षण कहाणी

औषधविक्रेत्याचा मुलगा ते भारतातील दुस-या क्रमांकाचा श्रीमंत: दिलीप संघवी यांची विलक्षण कहाणी

Saturday February 04, 2017,

2 min Read

त्यांचे वडील औषधी पदार्थांच्या वाहतूकीचा व्यवसाय करत होते. वडीलांकडून दहा हजार रुपये उसने घेवून त्यांनी फार्मा कंपनी सुरु केली, ज्यातून ते देशातील दुस-या क्रमांकाचे श्रीमंत गृहस्थ झाले आहेत. ही कथा आहे प्रसिध्द उद्योजक दिलीप संघवी यांची.


Source : Bloomberg

Source : Bloomberg


दिलीप यांचा जन्म मुंबईत झाला, त्यांचे कुटूंब नंतर कोलकाता येथे स्थलांतरीत झाले. त्यावेळी कोलकाता येथे त्यांनी वडिलांच्या घाऊक औषधविक्री व्यवसायाला हातभार लावण्याचे काम सुरु केले. कोलकात विद्यापिठातून वाणिज्य पदवी घेतल्यानंतर त्यांनी एक माणूस नियुक्त करून स्वत:चा व्यवसाय सुरु केला. तेथे ते बाजारात औषधे विकण्याचे काम करत. नंतर ते मुंबईत परतले आणि वापी गुजरात येथे स्वत:चा कारखाना सुरु केला.

स्वत:ची औषध निर्माता कंपनी सुरु करण्याची जाणिव दिलीप यांना वडीलांसोबत काम करतानाच झाली होती. त्यानंतर त्यानी स्वत:चा व्यवसाय आणि बाजारपेठ निर्माण करण्याचे ठरविले. १९८२मध्ये त्यांनी वडिलांकडून उधार पैसे घेतले आणि स्वत:ची सन फार्मास्यूटिकल्स ही कंपनी सुरु केली. त्यांचे गुजरात वापी हे मुख्य केंद्र होते. जेथे त्यांना मित्राकडून काही माल आणि साधने मिळाली.आणखी काही लोकांची मदत घेत त्यानी पाच प्रकारची औषधे तयार करायला सुरुवात केली. १९९४मध्ये कंपनीने कार्यक्षेत्र २४ देशात विस्तारले.

२०११मध्ये, रँनबँक्सीने जागतिक उत्पन्नात दोन दशलक्षचा पल्ला गाठला, हे करणारी ती पहिली भारतीय फार्मा कंपनी होती. सन फार्माने १९८७मध्ये ऑफ्थमॉलॉजीसोबत भागीदारी करत मिलमेट लॅबचा ताबा घेतला. १९८७ मध्ये मिलमेट लॅबचा जागतिक क्रमावारीत १०८वा क्रमांक होता. सध्या या लॅबचा सहावा क्रमांक आहे, आणि ती दिलीप मेटल या नावाने ओळखली जाते. कंपनीने मागील वर्षीच ब्रँण्डेड ऑफथँलमिक व्यवसायाची सुरुवात अमेरिकेत केली आहे.

दिलीप यांना खात्री आहे की, विस्तारीत सन फार्मा युरोपियन आणि अमेरिकन बाजारात पोहोचेल. बाजाराला चालना देण्यासाठी आणि त्यातील आवश्यक ती पकड आणि खोली गाठण्यासाठी रँनबँक्सीच्या विलीनीकरणानंतर वेग आला आहे. २०१२मध्ये सन फार्माने युआरएल फार्मा आणि डियूएसए फार्मास्यूटिकल्सचा ताबा घेतला ही त्यांच्या कारकिर्दीतली मोठी घटना होती. ब्लुमबर्गच्या लाइव डाटा मध्ये प्रकाशित झाल्यानुसार २१.७ दशलक्ष डॉलर्सच्या मूळ किमतीमध्ये देखील सन फार्माच्या मालकीचा ६०.८% भागीदारीवाटा होता. त्यातून कंपनी भारतात पहिल्या तर जगात पाचव्या क्रमांकाची मोठी औषधनिर्माता झाली आहे.

एका मुलाखतीमध्ये दिलीप यांनी चांगल्या उद्योजकाबाबत हे म्हटले आहे की, “ चांगल्या उद्योजकाला इतरांच्या खूप आधीच संधी दिसते. तो त्या संधीसाठी पैश्याची जोखीम आजच घेण्याची काळजी घेतो; तो त्याच्या भोवताली त्यांच्या धेय्याना पूर्ण करणारा संघ निर्माण करतो. ”

झोकून देण्याची वृत्ती, मेहनत आणि संधी शोधून योग्य निर्णय घेण्याची सक्षम दृष्टी असल्यानेच दिलीप संघवी आजच्या यशाचे धनी होवू शकले. (थिंक चेंज इंडिया)