‘जेंव्हा खायला अन्न नव्हते, खिशात पन्नास रुपये होते’ : मन हेलावून टाकणारी एका उद्यमीची कहाणी

‘जेंव्हा खायला अन्न नव्हते, खिशात पन्नास रुपये होते’ : मन हेलावून टाकणारी एका उद्यमीची कहाणी

Saturday October 29, 2016,

3 min Read

ज्यावेळी मी माझे डोळे मिटतो आणि गतकाळाचा विचार करतो त्यावेळी एक प्रसंग माझ्या काळजाचा ठाव घेतो. मी झिरकापूरला माझ्या खोलीत बसलेला होतो आणि खायला पैसे नव्हते. माझ्या खिशात केवळ पन्नास रुपये होते. मी निराश होतो कारण माझ्या राहत्या घराचे भाडे भरायचे होते, जे सप्ताहभरापासून मी घरमालकाना काही बहाणे सांगून टाळत होतो. माझ्या मोबाईलचे आऊटगोईग कॉल्स बंद होते. माझ्या लोकांनी केंव्हाच मला दूर लोटले होते, बहुतांश मला वेडा समजत होते.

त्यांचे खरेच असते जर माझे काही चुकले नसते, खरच मी फार जिद्दी होतो. मला चांगली नोकरी आणि चांगला पगार असताना मला उद्योजकता करण्याची काय गरज होती? मला छान जगता आले असते. आणि तरीही मी असा भुकेला आणि उदास बसलो होतो ज्याच्याजवळ जेवायला पैसा नव्हता. माझ्या जवळचे पन्नास रुपये जेवायला वापरता येत नव्हते कारण मला दुस-या दिवशी सकाळी शाळेच्या समन्वयकांना भेटायला राजपुरा येथे जायचे होते. मी तेथे प्राथमिक स्वरुपाची मोफत कार्यशाळा घेणार होतो आणि मला माहिती होते की ते साधारणपणे आठवडाभरानंतर मला त्याचे पैसे देणार होते. मला लवकर पैसे मिळावे म्हणून काहीतरी कारण समन्वयकांना सांगायचे होते.

image


मी सकाळी सहाचा गजर लावला आणि झोपण्याचा प्रयत्न करत होतो. दुस-या दिवशी मी सकाळी उठलो मला सारे काही ठिक आहे असे वाटत होते, मी तयार होऊन हनुमान चालिसा म्हणत देवाची करुणा भाकत होतो की, आजचा दिवस मला बळ दे, यश दे, बस थांबा जो दोन किमी दूर होता तेथे जाण्यास चालू लागलो अर्थातच काही पैसे वाचणार होते, माझ्यात चालण्याचे त्राण नव्हते पण मनात एकच होते की सारे काही नीट होईल. मला माझ्या आजच्या भेटीवर लक्ष द्यायचे होते. मी बसमध्ये बसलो आणि ३५रुपये दऊन राजापुराचे तिकीट घेतले. १५ रुपये माझ्या खिश्यात शिल्लक होते. शाळा काहीशी गावापासून बाहेर होती आणि माझी अपेक्षा होती की बस मला शाळेच्या दरवाजात सोडेल.

image


लवकरच माझ्या लक्षात आले की बसने वळण घेतले आणि ती वेगळ्याच मार्गाने निघाली. ज्यावेळी मी वाहकाला विचारणा केली त्यांने मला बस थांबवून तेथेच उतरण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शाळेपासून तीन किमी दूर मला उतरावे लागले. अगदी महामार्गावर काय करावे अशा विवंचनेत मी चालायला सुरुवात केली. मी चालू लागलो तेवढ्यात एका मैत्रिणीचा फोन आला (तिला माझ्या आर्थिक स्थिती माहिती होती.) ज्यावेळी मी तिला सत्यस्थिती कथन केली तेंव्हा तितक्याच दु:खी चेह-याने मला मी तरी काय करू असा सवाल केला. मी तिला म्हटले की, शाळेच्या समन्वयकाने मला लवकर पैसे द्यावे ही विनंती मान्य केली तर मार्ग निघेल नाहीतर मला पूर्णत: चंदिगढ पर्यंत चालत परत जावे लागेल, मी पुढे काय होते ते पाहू लागलो. तिने फोनवर रडायला सुरुवात केली आणि मीच तिची समजून घालू लागलो.

एखाद किलोमीटर चालून गेल्यावर मला एक दयाळू माणूस स्कूटर वरून जाताना भेटला त्याने मला लिफ्ट दिली. त्याने मला शाळेच्या इमारती समोर सोडले. शंकर भगवानाचा धावा मनात केला की आता मला सांभाळा आणि मी पुढे सरसावलो.

मी शाळेत पोहोचलो मनात नियोजन सुरू होते. जर शाळेच्या समन्वयकाने मला सप्ताहानंतर पैसे देतो असे सांगितले तर मी त्याला सांगेन की पाकीट घरी विसरल्याने त्याने मला पाचशे रुपये द्यावे असा मी विचार करत होतो. किंवा मी त्याला सांगेन की जवळपास एटीएम नसल्याने आवश्यक पैसे मला काढता आले नाहीत तरी त्याने मला परतीचे गाडी भाडे द्यावे. डोक्यात असा विचारांचा गुंता घेऊन मी त्यांच्या दालनाजवळ वाट पहात बसलो होतो आणि ते आल्या आल्याचे जे बोलले त्याने स्थिती पूर्णत: बदलून गेली.

ते म्हणाले, “ क्षितीजजी फारच छान आपण आलात. कृपया हे २५हजार रुपये ठेवा आम्ही इतकेच जमा करु शकतो”; माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वहात होत्या.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा 

    Share on
    close