मुस्लिम समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी प्रयत्नशील संस्था ठरली आहे बंधुभावाचे अद्भूत उदाहरण

मुस्लिम समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी प्रयत्नशील संस्था ठरली आहे बंधुभावाचे अद्भूत उदाहरण

Friday April 29, 2016,

3 min Read

राजस्थानात जोधपूरमध्ये मुसलमान आणि इतर दुर्बल घटकांशी संबंधित लोकांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने १९२९ मध्ये ‘मारवाड मुस्लिम एज्युकेशनल एँड वेलफेअर सोसायटीची’ स्थापना करण्यात आली. या संस्थेचा आणखी एक संकल्प शिक्षणाबरोबर सद्भावना निर्माण करणे हा सुद्धा आहे.

ही संस्था आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करत असतानाच मुलींनाही शिक्षण सुविधा पुरवित आली आहे. या संस्थेने उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना कॉलेजपर्यंत घेऊन येण्याचा विडा उचलला आहे. कोणत्याही समाजात विकासासाठी उच्च शिक्षणच महत्त्वाची भूमिका बजावते आणि हेच लक्षात घेऊन ‘मारवाड मुस्लिम एज्युकेशनल ऍण्ड वेलफेअर सोसायटी’ने मौलाना आझाद युनिव्हर्सिटीची स्थापना केली. सोसायटी प्रायमरी, अपर प्रायमरी आणि सिनीअर सेकंडरी स्कूल (मुले आणि मुलींसाठी) तर चालवतेच आहे, त्याचबरोबर मौलाना आझाद मुस्लिम टीचर्स ट्रेनिंग कॉलेज (बीएड), मौलाना आझाद मुस्लिम महिला टीचर्स ट्रेनिंग कॉलेज (बीएड), माई खदिजा इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस, मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मौलाना अबुल कलाम आझाद आयटीआय आणि मौलाना आझाद मुस्लिम डीएड कॉलेज (बीएसटीसी) ची स्थापना केली आहे.

मारवाड़ मुस्लिम एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी

मारवाड़ मुस्लिम एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी


याचबरोबर कल्याणकारी कामांमध्ये माई खदिजा रुग्णालय, जिथे वाजवी शुल्क घेऊन डिलीवरी आणि सर्व तपासण्यासंबंधित सुविधा उपलब्ध केल्या जातात. मौलाना आझाद युनिव्हर्सिटीच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये सर रतन टाटा ट्रस्ट द्वारा निधी प्राप्त झालेला एम हेल्थ प्रोजेक्ट चालविला जात आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तान, नायजेरिया, केनिया, अमेरिका आणि देश-विदेशातील सामाजिक आरोग्याशी संबंधित लोक शिक्षण घेत आहेत.

मारवाड़ मुस्लिम एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटीचे  मौलाना आजाद यूनिवर्सिटी कॅम्पस

मारवाड़ मुस्लिम एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटीचे  मौलाना आजाद यूनिवर्सिटी कॅम्पस


राजस्थान आणि इतर प्रदेशातील मागास भागातील मदरसा शिक्षकांना इंग्रजी भाषा शिकविणे आणि मदरश्यांच्या आधुनिकीकरणासाठी अमेरिकन दूतावासाच्या सहयोगाने ‘रेलो’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर सोसायटीच्या परिसरात नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलच्या माध्यमातून हजारो लोकांना घरबसल्या डिस्टंस इज्युकेशनने दहावी आणि बारावीचे शिक्षण दिले जात आहे. मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी, काउमी काउन्सिल बराए फरोग उर्दू भाषा (एनसीयूपीएल) आणि इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचे स्टडी सेंटरही चालविले जात आहे.

सोसायटीतर्फे चालविण्यात येणारी 'गोशाळा'

सोसायटीतर्फे चालविण्यात येणारी 'गोशाळा'


गाईंसाठी गोशाळाही चालविते सोसायटी

मारवाड मुस्लिम एज्युकेशनल ऍण्ड वेलफेअर सोसायटीचे जनरल सेक्रेटरी मोहम्मद अतीक सांगतात, “आमची सोसायटी ३२ शिक्षण संस्था सामाजिक कार्यक्रम राबवित आहे, जिथे सर्व धर्मांचे ८००० हून जास्त विद्यार्थी-विद्यार्थीनी शिकतात आणि ५०० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर आणि अन्य कर्मचारी कार्यरत आहेत. ही संस्था समाजातील सर्व मागास लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. आमचे उद्देश्य आहे आमच्या मुलांना चांगले शिक्षण देणे. जे लोक परिस्थितीमुळे शिकू शकले नाहीत त्यांनाही शिक्षणाशी जोडणे. विशेष करुन मुलींना शिक्षणाबरोबरच काही कौशल्य प्रशिक्षण देणे. सर्वांनी मिळून या धर्मनिरपेक्ष देशाला मजबूत करण्यासाठी सर्व धर्मांच्या लोकांमध्ये एकमेकांविषयी प्रेम आणि बंधुभाव पसरवणे आणि एकमेकाला समजून घेणे, त्यांच्या कठीण परिस्थितीत त्यांना सन्मानपूर्वक मदत करणे.”

गाईच्या सेवेतून अनोखा संदेश

देश आणि समाजात सांप्रदायिक सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्यासाठी संस्थेद्वारे चालविल्या जाणाऱ्या संस्थांमध्ये हिंदू, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मीय विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जातो. एवढेच नाही, सोसायटी समाजाला सकारात्मक संदेश देण्यासाठी निस्वार्थीपणे दूध न देणाऱ्या वृद्ध आणि आजारी गाईंची ‘मारवाड मुस्लिम आदर्श गोशाला’द्वारे सेवा करते. वृद्ध आणि आजारी गाईंसाठी तपासणी सेवा पुरविली जाते, तसेच त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिली जाते. सोसायटीच्या या पुढाकाराने सर्व धर्मांमध्ये सौहार्दाची भावना वाढीस लागली आहे आणि सोसायटीविषयी लोकांना आपुलकी वाटू लागली आहे. तसेच सांप्रदायिक सौहार्दाची भावना कायम राखण्यातही यश प्राप्त झाले आहे.

मारवाड़ मुस्लिम एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटीचे महासचिव मोहम्मद अतीक

मारवाड़ मुस्लिम एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटीचे महासचिव मोहम्मद अतीक


अतीक या गोशाळेविषयी सांगतात, “गोशाळेविषयी हिंदू बांधवांचा सकारात्मक दृष्टीकोन पहायला मिळाला. लोक मुस्लिम समाजाच्या या कौतुकास्पद प्रयत्नाला सलामी देतात आणि वेळोवेळी या असहाय्य आणि आजारी गाईंच्या चाऱ्यासाठी आर्थिक मदतही करत असतात. आम्हाला गाईंची सेवा करुन खूप आनंद आणि संतुष्टता मिळते.”

या संस्थेतून दरवर्षी जवळपास १३०० मुले-मुली बीएड, बीएसटीसी, नर्सिंग, फार्मसी आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षण घेऊन समाजात एक चांगले स्थान प्राप्त करण्यासाठी बाहेर पडतात.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

धर्मापलीकडे जाऊन मुलांच्या शिक्षणाकरिता झटणारी ʻदिपालयʼ

भविष्यातील मोठी क्रांती? सर्वांना मोफत आणि सहजसाध्य शिक्षणासाठी रतन टाटांचे खान अकादमीसोबत योगदान!

मोदींचा मान, ‘अॅप्स’ची खाण, देशाची शान, खरा किंग खान… इम्रानभाई!

लेखक – एस इब्राहिम

अनुवाद – अनुज्ञा निकम

    Share on
    close