अंध व्यक्तींच्या वास घेण्याच्या क्षमता डोळस व्यक्तींपेक्षा अधिक चांगल्या आणि तीव्र

मुंबईतील महाविद्यालय दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अत्तर व्यवसायात कारकिर्द करण्यासाठी प्रशिक्षण देत आहे!

अंध व्यक्तींच्या वास घेण्याच्या क्षमता डोळस व्यक्तींपेक्षा अधिक चांगल्या आणि तीव्र

Saturday April 01, 2017,

3 min Read

जगभरात ३९ दशलक्ष लोक दृष्टिहीन आहेत, त्यातील चाळीस टक्के भारतामध्ये आहेत. असे असले तरी त्यातील बहुतांश लोकांना उपचार करता येतील अशा प्रकारच्या विकारांनी ग्रासले आहे. भारतामध्ये सोयी सुविधा नसल्याने त्यांच्यासाठी जगणे अवघड होत आहे. त्यांच्यासाठी योग्य रोजगार संधी मिळणेही दुरापास्त असते. असे असले तरी अशा लोकांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी काही लोक धडपडत असतात हे पाहणे देखील सुखावह असते. असाच एक प्रयास मुंबईतील ‘कॉलेज ऑफ दी फ्रेगरन्स फॉर दि व्हिजूअली इंपेअर्ड’ (सीओव्हीएफआय) ने केला आहे. जेथे ते अंध विद्यार्थ्यांना अत्तर उद्योगात कारकिर्द करण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत.


image


सुमारे पंचविस विद्यार्थी तरबेज झाले असून त्यांना अत्तर उद्योगात रोजगार मिळाला आहे, गेल्या चार वर्षापासून ते दर्जा रक्षणाच्या आणि मुल्यांकनाच्या क्षेत्रात काम करतात. त्यांना वेगवेगळ्या अत्तर निर्मिती संस्थामध्ये पाठविण्यात आले आहे, ज्या मुंबई रायगड आणि पुण्यात आहेत.

ही सारी सुरूवात त्यावेळी झाली ज्यावेळी सीपीएल अरोमाज या एका अत्तर कंपनीने सर्वेक्षण केले, ज्यांचे मुख्यालय युके मध्ये आहे. या पाहणीत भारतातील पन्नास अंध उमेदवारांना त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेची परिक्षा घेण्यात आली. त्यात असे दिसून आले की ज्या लोकांना दृष्टीदोष असतात त्यांच्या वास घेण्याच्या क्षमता दृष्टी असलेल्या लोकांपेक्षा अधिक चांगल्या आणि तीव्र असतात. ही त्यांच्यासाठी नव्या दिशा आणि प्रवासाची सुरूवात होती. सीपीएल अरोमाच्या कार्यकारी संचालिका शितल देसाई, म्हणाल्या की, “ २५० उमेदवारांच्या आमच्या पाहणीतून दिसून आले की, दृष्टिहिन लोकांना वासांचे ज्ञान अधिक असते, त्यांच्यावर लक्ष दिल्यास त्यांना ना ऊमेद केले नाही आणि भेदभाव केला नाहीतर ते चांगल्या पध्दतीने हे काम करू शकतात”.

रेणूका थेरगावकर, व्ही जी वझे महाविद्यालयाच्या कॉस्मॉटॉलॉजी आणि पर्फ्यूमरी विभागाच्या प्रमुख यांना नंतर शितल यांनी संपर्क केला. ज्यांनी अंध उमेदवारांना प्राथमिक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केला. रेणूका यानी याबाबत सांगितले की, “ ज्यावेळी सुगंधाचे मुल्यांकन करायचे असते त्यावेळी, ज्यांना रंग आणि पॅकेजींगचे देखील काम करता येत नाही अशा अंधअंपगांच्या कौशल्याचा वापर करता येवू शकतो”.

ज्या उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी अर्ज केले त्यांची प्रवेश परिक्षा घेण्यात आली त्यात त्यांना साधारण प्रकारचे वास ओळखता येतात का ते पाहण्यात आले. जेंव्हा त्यांना ते शक्य झाले तेंव्हा त्यांना वर्षभराचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात त्यांना संवादकला शिक्षण, अन्न (चव) परिक्षण आणि मानस शास्त्र यांचा अभ्यास शिकवण्यात आला यासोबतच त्यांना वेगवेगळे सुगंध घेण्याच्या आणि ते ओळखून लक्षात ठेवण्याच्या कला शिकवण्यात आल्या. त्यांना एक सॉफ्टवेअर प्रशिक्षणही देण्यात आले ज्याला जेएडब्ल्यूएस (जॉब ऍक्सेस विथ स्पिच) म्हटले जाते, ज्यात संगणक आणि इमेल बाबत प्राथमिक शिक्षण दिले जाते.

चंचल या संस्थेतील एक विद्यार्थीनी, म्हणाल्या की, “ येथे वेगवेगळ्या प्रकारचे अंध लोक आहेत, येथे मला सन्मानपूर्वक वागणूक मिळते. माझ्या इतर अंध मित्रांपेक्षा मला चांगल्या प्रकारचा रोजगार मिळाला आहे. ‘इस जॉब से खुद का स्टेटस बन गया है’ (या रोजगाराने मला स्वत:ची वेगळी ओळख मिळाली आहे.)

काही काळ आणि पुन्हा, त्यांना अशा संस्था शोधण्यात समस्या आल्या, ज्या अंध व्यक्तीना रोजगार देण्यास तयार नाहीत. असे असले तरी या उपक्रमातून मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे की, अंध व्यक्तीना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कौशल्यावर आधारीत रोजगार मिळाला पाहिजे. अपेक्षा करूया येणा-या काही वर्षात, या संकल्पनेवर अनेक संस्था सुरू होतील, आणि या संकल्पनेतून अधिक लोक प्रेरणा घेवून काम करण्यासाठी पुढे येतील.