चमू असा असावा ज्याच्या सोबत आयुष्यभर काम करता यावे

चमू असा असावा ज्याच्या सोबत आयुष्यभर काम करता यावे

Saturday September 03, 2016,

2 min Read


जर तुमच्या जीवनात केवळ दहा दिवस शिल्लक राहिले असतील तर तुम्ही हे दिवस त्या लोकांसोबत घालवण्याची इच्छा ठेवाल का ज्याच्या सोबत राहणे तु्म्हाला आवडत नाही.’ हा प्रश्न आहे फ्लिपकार्टचे मुख्य स्टाफर निकेत देसाई यांचे. सरासरी भारतीयांचे जीवनामान २४,५६४.५ दिवसांचे असते. त्यात ते दहाहजार दिवस काम करून घालवितात. निकेत म्हणतात की, ‘काय काम करता आणि कोणाच्या सोबत करता या महत्वाच्या गोष्टी आहेत. तुमच्याजवळ दहा हजार दिवस आहेत आणि काय करायचे ते तुम्ही ठरवायचे आहे.’

image


वैविध्य हीच कुंजी आहे

निकेत यांनी त्यांचे स्टार्टअप पंच्डचे उदाहरण दिले. त्यांनी सांगितले की सन २००८-०९मध्ये सिलीकॉन व्हॅलीतून सुरू केलेल्या या स्टार्टअपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र काम करत होते. ते सांगतात की, ‘एक चांगली चमू ती असते ज्यातील सदस्य परस्परपूरक असतात. पंच्डमध्ये आम्ही तीन संचालक होतो. त्यातील प्रत्येकाची अव्दितीय क्षमता होती ज्याचा उपयोग स्टार्टअपला झाला.’ पंच्डला नंतर गुगलने अधिग्रहीत केले. त्यावेळी गुगलचा वॉलेट प्रकल्प सुरू होता. सन २०१३मध्ये पंच्डने काम बंद केले, पण निकेत यांना त्याचे अजिबात दु:ख नाही कारण या स्टार्टअपमध्ये त्यांना एक अशी टीम मिळाली होती की, त्यांच्याशी मैत्री आजही कायम आहे.

विशिष्ट संच बनवा

निकेत म्हणतात, ‘ आपण एक वैशिष्ट्यपूर्ण संच बनविला पाहिजे. तो संच हवेतर जग बदलणारा नसेल परंतू त्याबाबत अंदाज लावणारा असेल.’ त्यांनी संचालकांमध्ये जबरद्स्त संचालनक्षमता असण्यावर जोर दिला. त्यांचा विश्वास आहे की, कोणत्याही संचाला तयार करण्यापूर्वी हा महत्वाचा प्रश्न विचारला गेला पाहिजे की, ‘काहीही झाले तरी या लोकांसोबत आपण दहा हजार दिवस काम करू शकता का?’ निकेत चांगल्या संचाच्या उदाहरणासाठी गुगलचे नांव घेतात. ही कंपनी सुरू करणाऱ्यांचा संच १७ वर्ष एकत्र आहे.

सामान्य ते असामान्य

निकेत सांगतात की, ‘ अशाच लोकांची निवड करा ज्यांची तुम्हाला माहिती आहे की ते महान कार्य करु शकतात. कारण प्रत्येकाची सुरुवात सामान्य माणसांसारखीच असते मात्र त्याचे अनुभव त्याला असामान्य व्यक्ती बनवितात.’ त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना संस्थापकांना आवाहन केले की, त्यांनी तातडीने ठरविले पाहिजे की, त्यांना दहा हजार दिवस कुणासोबत काम करायचे आहे?