आता सुंदर मी होणार... एका क्लिकवर !!

आता सुंदर मी होणार...  एका क्लिकवर !!

Saturday October 24, 2015,

2 min Read

आजचं जग हे मागणी तसा पुरवठ्याचं (ऑन डिमांडचं) आहे. प्रत्येक सेवा तुम्हाला ऑनलाईन मिळतेय. ग्रोसरीपासून ते बेकरी प्रोडक्टपर्यंत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते सेवा पुरवणाऱ्यांपर्यंत सर्वकाही ऑन डिमांड उपलब्ध आहेत. ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात ही प्रथा सुरु झालेय. जास्तीत जास्त मागणी लक्षात घेता 'गेटलुक' सारख्या कंपन्यांनी हळूहळू या क्षेत्रात आपले पाय रोवायला सुरुवात केली. 'गेटलुक' ही सलोन आणि ब्युटी प्रोफेशनल्स यांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन देतं. ब्युटी क्षेत्रातल्या दोन्ही बाजूला म्हणजे सलोन तसंच ब्युटी प्रोफेशनल्स आणि ग्राहक यांना एकत्र भेटवून देण्याचं काम गेटलुक करतेय. महिलांच्या सौदर्यविषयक मागणी लक्षात घेऊन त्यांना हवा असलेल ब्युटीशियन योग्य त्या वेळी मिळवून देणं गेटलुकचं मुख्य काम आहे.

image


गेटलुक ही आयआयटी खरगपूरमधून शिकून बाहेर पडलेले गौरव महेश्वरी, रोनक सारडा आणि वत्सला कोठारी यांची कल्पना होती. ब्युटी मार्केट खुप मोठं आहे. खासकरुन महिलांसाठी या ब्युटीशियन्सना शोधून काढणं, शोधल्यानंतर मग त्यांच्या सलोनमध्ये जाणं, तिथं हवं तसं तयार होँणं हे खुप वेळकाढूपणाचं होतं. यामुळं ही सेवा ऑन डिमांड देता येईल का? याचा विचार सुरु झाला. गौरव महेश्वरी आणि रोनक सारडा या दोघांना रिसर्चची पार्श्वभूमी होती. वत्सला माध्यम क्षेत्रात होती. या तिघांनी अगोदर या ऑन डिमांड सेवेची मागणी किती असेल याचं अंदाजपत्रक बनवलं. यात आधीपासून असलेल्या कंपन्यांचा बारकाईनं अभ्यास करण्यात आला. त्यानंतर या क्षेत्रात असलेली मोठी संधी लक्षात घेऊन गेटलुकची स्थापना करण्यात आली.

image


गौरव महेश्वरी यांचा दावा आहे की, दोन तासात आपल्याला हवा असलेला ब्युटीशियन आपल्या घऱी पोचतो. पण हे ब्युटीशियन आणि सलोन एकाच व्यासपीठावर आणणं तितकं सोपं नव्हतं. मुंबईतल्या अनेक ब्युटीशियन्स आणि सलोन मालकांना या ऑन डिमांड सेवेची माहिती देण्यात आली. अगदी खासगी संबंधांवर आधारीत असलेल्या त्यांच्या सेवेला नवा आयाम गेटलुकच्या माध्यमातून मिळू शकेल असा विश्वास त्यांना देण्यात आला. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्याच्याकडे सध्या सहा हजार पेक्षा जास्त क्लाईंटबेस आहे. महिन्याला ८०० ते ९०० अपॉईन्टमेन्ट कंपनीतर्फे करण्यात येतात. एक अपॉईन्टमेन्ट ही किमान १७५० रुपयांची असते.

image


गेटलुकबरोबर आपण एन्ड्रॉईट एप किंवा वेबसाईटवरुन आपल्याला हवी असलेली ब्युटीशियन बुक करु शकता. या सर्व ब्युटीशियन्सची अगोदर योग्य ती पडताळणी करण्यात येतेय. सुरक्षा आणि हमी साठी त्यांना गेटलुकचं ओळखपत्र देऊन त्यांना प्रमाणित करण्यात येतं हे विशेष. सध्या मुंबई आणि बंगळूरु इथे सुरु असलेली ही सेवा पुणे, जयपूर आणि अहमदाबादसारख्या शहरात लवकरच विस्तारण्यात येणार आहे. शिवाय आता पुरुषांसाठी ब्युटी सेवा सुरु करण्याचा मानस आहे. ब्युटी सर्विस क्षेत्रं अब्जावधींचं आहे. सरासरी एक महिला महिन्याला दोन हजार रुपयांपर्यंत आपल्या सौदर्यांवर खर्च करतात. हे लक्षात घेऊन गेटलुकचा विस्तार लवकरच जास्त फायद्याचा ठरणार असल्याचं गौरव सांगतात.