कॉलेजमधील सुवर्णक्षणाला जोपासण्यासाठी ऑनलाइन ‘ईयरबुक’ zaffingo.com

कॉलेजमधील सुवर्णक्षणाला जोपासण्यासाठी ऑनलाइन ‘ईयरबुक’ zaffingo.com

Wednesday January 13, 2016,

3 min Read

शाळेतील दिवस हळुवार संपून कॉलेजमध्ये जाण्याची एक आंतरिक ओढ आणि कॉलेज पासआऊट करताना तिथल्या रंजक व रोमहर्षक आठवणी या कुणासाठी पण आयुष्यभराचा एक खजिना असतो. प्रत्येक व्यक्ती ही कॉलेज मधील व्यतीत केलेल्या सुंदर दिवसांचा काळ आणि तिथल्या आठवणी गोळा करण्यासाठी आसुसलेला असतो व कॉलेजच्या शेवटच्या टप्प्यावर या ऊहापोहा मध्ये असतो की या क्षणाला कसे आपल्या जवळ कैद करून ठेवता येईल.


image


आजची युवा पिढी सोशल मिडिया आणि अत्याधुनिक उपकरणांनी परिपूर्ण आहे. या सुवर्णक्षणाला जोपासण्यासाठी त्यांना एका व्यासपीठाची गरज आहे जे आयआयटी गुहाटीच्या काही बुद्धिमान विद्यार्थ्यांनी प्रदान केले आहे. यावर्षीच्या व्हॅलेनटाइन डे च्या दिवशी आपल्या आठवणींना सजवण्यासाठी एक ऑनलाइन ‘ईयरबुक’ तयार करून ते छापून सदैव जोपासून ठेवण्यासाठी आयआयटी गुहाटीच्या या बुद्धीमानांनी zaffingo.com च्या नावाने एका वेबसाईटची निर्मिती केली आहे जिथे या साईट वर आपल्या कॉलेजच्या दिवसातील आठवणींना एका पुस्तकाच्या रुपात मूर्त रूप देण्यात आले आहे.

या वेबसाईटचे सह-संपादक आणि सीईओ शिखर सक्सेना सांगतात की, ‘हे ईयरबुक फक्त काही पानांचे पुस्तक नाही तर हा सुंदर आठवणींचा एक पुष्पगुच्छ आहे जो आपले संपूर्ण आयुष्य सुगंधी करेल’.

इंटरनेटवर या वेबसाईटच्या आगमनाने थोड्याच कालावधीत पूर्ण देशातील तरुणांमध्ये एक लोकाप्रियतेचे शिखर गाठले आहे. या वेबसाईट वर तुम्ही तुमच्या मित्रांना आमंत्रित करून तुमच्या कॉलेजच्या दिवसांच्या आपल्या आठवणी स्वतःच्या शब्दात मांडून एका सुंदर क्षणाला बंदिस्त करण्याची मोकळीक देतात. तुमचे मित्र या वेबसाईट वर फोटो अपलोड करून त्याचे एडीटिंग अतिशय सोप्या पद्धतीने ऑनलाईन करू शकतात. या पद्धतीने ईयरबुक तयार करून आठवणींना सजवण्याचे काम सोपेच नाहीतर मनोरंजक पण आहे.


image


zaffingo.com च्या कल्पनेला साकार करण्यासाठी आयआयटी गुहाटी मधून पदवी घेणारे दोन विद्यार्थी लोकांडे आणि शिखर सक्सेना यांचे मोलाचे योगदान आहे. या वेबसाईटचे सह-संस्थापक आणि सीईओ शिखर सांगतात की हे ईयरबुक फक्त एक पुस्तक नसून सुंदर आठवणींची एक माळ आहे. कॉलेज किंवा अभ्यासातील क्षण हा कुणाच्याही आयुष्यात परतून येत नाही आणि या आठवणींना बंदिस्त करण्यासाठी zaffingo.com हे एक सशक्त माध्यम ठरले आहे.

याशिवाय शिखर सांगतात की आपल्या देशात अजूनही याप्रकारे ईयरबुक तयार करण्याची परंपरा नाही पण जसजसे तरुण पिढीला या वेबसाईट बद्दल कळले तशी त्यांची रुची पण हळूहळू वाढायला लागली. तसेच ते सांगतात की अजूनपर्यंत ईयरबुक बनविण्यासाठी आपण इतर देशांपेक्षा बरेच मागे होतो. आपण पुस्तकांमध्ये लिहून व फोटो चिटकवून आपल्या आठवणी जोपासून ठेवायचो. शिखर सांगतात की प्रारंभी त्यांच्या टीमला या कामाला साकारण्यासाठी बरीच उठाठेव करावी लागली कारण डाटा गोळा करून त्याला ईयरबुकच्या रुपात साकार करणे हे सगळ्यात मोठे आव्हान होते. पण या विद्यार्थ्यांनी या कामाला एक आव्हान समजून ईयरबुक तयार करण्याच्या कामाला अजून मनोरंजक बनविले आहे.

कॉलेज व अन्य कुणाच्याही आर्थिक मदतीशिवाय या वेबसाईटच्या निर्मितीचा खर्च हा या लोकांनी स्वतः केला. विद्यार्थीदशेतून स्वतःला बाहेर काढून एका निश्चित स्थानापर्यंत नेण्याची त्यांची भविष्यातील योजना आहे. ईयरबुक नंतर त्यांचा पुढचा टप्पा आहे ‘टीमबुक’ च्या स्वप्नाला साकार करण्याचा आहे ज्यात क्लब किंवा मोठ्या कंपनीमध्ये आयोजित होणाऱ्या आठवणीतील क्षणाला डिजिटल अल्बमच्या रुपात सादर करणे ते सुद्धा घरी बसून ऑनलाइन.

या पूर्ण प्रक्रियेमध्ये सगळ्यात मनोरंजक म्हणजे ईयरबुकला तयार करण्याचे काम घरी बसून इंटरनेटद्वारे तुम्ही करू शकता. zaffingo.com वर जावून ईयरबुक तयार केल्यानंतर आपल्याकडे पर्याय राहतो की तुम्ही याला प्रिंट करू शकता किंवा संगणकासाठी त्याची एक सॉफ्टकॉपी घेऊ शकता.

लेखक : निशांत गोयल

अनुवाद :किरण ठाकरे