भारतीय प्रजासत्ताक दिनी बुर्ज खलिफा तिरंग्याच्या रंगात रंगला!

0

बुर्ज खलिफा, जगातील सर्वात उंच मिनार (टॉवर), जो दुबईत आहे, भारताच्या ६८व्या प्रजासत्ताक दिनी तिरंग्याच्या रंगात रंगून गेला होता.

दोन्ही देशांचे मजबूत राजनैतिक संबध असल्या कारणाने या कृतीने युनायटेड अरब एमिरेट्स आणि भारतीय नागरिकां मधील दृढ ऋणानुबंध दिसून आले आहेत. २५ आणि २६ जानेवारीला तीन वेळा लेड शो करण्यात आला, सायंकाळी ६:१५, ७:१५, आणि ८:१५ वाजता. याशिवाय प्रसिध्द कारंज्यांची आतिषबाजी देखील या देखाव्याची शोभा वाढवित होते.

अधिकृत बुर्ज खलिफा ट्वीटर  हँडलवरुन (ट्वीट) जाहीर करण्यात आले की, “आज रात्री आम्ही भारताच्या प्रजासत्ताक दिना निमित्त लेड शोच्या रोषणाईने भारतीय तिरंगा फ़डकविला.


अबुधाबीचे  युवराज  मोहमद बिन झायद अल न्हायन, हे प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्लीतील कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. याबाबतच्या वृत्ता नुसार भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, त्यांनी आणि युवराजांनी पश्चिम आशिया आणि अरब राष्ट्रांच्या विकासाबात चर्चा केली आहे.