चारशे संघ, साठ देशांचे प्रतिस्पर्धी, टेक्नोवेशन चॅलेंज आणि विजेत्या बंगळूरूच्या चौदा वर्षीय पाच विद्यार्थीनी!

0

टेक्नोवेशन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कार्यरत तरूण महिलांसाठी एक जागतिक उद्योजगता कार्यक्रम आहे. याचा हेतू सा-या जगातील मुलींना कोडिंगची माहिती उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्यातील उद्योजकता वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनँशनल एज्यूकेशनव्दारे संचालित “वि टेक” (विमेन इन्हेंसिंग टेक्नॉलॉजी) भारतात उच्चमाध्यमिक परिक्षा उत्तीर्ण होणा-या मुलींसाठी विद्यालयापेक्षा वेगळा कार्यक्रम संचालित करते. जेथे त्यांना मोबाईल ऍप्लीकेशन तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याशिवाय त्यांना टेक्नोवेशनच्या माध्यमातून जागतिक मंचावर सादरीकरण देखील शिकवले जाते.

ही जागतिक स्पर्धा तीन सत्रात आयोजित करण्यात येते. या वर्षी प्राथमिक सत्रात साठ देशांच्या संघाशिवाय चारशे जागतिकस्तरावरील संघानी भाग घेण्यासाठी नोंदणी केली होती. आणि उपांत्यफेरीत पोहोचलेल्या पंचवीस संघापैकी दहा संघ सँन फ्रांन्सिस्को येथे आयोजित जागतिक अंतिम स्पर्धेत पोहोचण्यात यशस्वी झाले. यावर्षी ‘वी टेक’ च्या चार संघापैकी दोन अंतिम सत्रात स्थान मिळवण्यात सफल ठरले. भारतासाठी ही एक मोठीच उपलब्धी ठरली कारण पहिल्यांदाच एखादा भारतीय संघ युरोपिअन आणि ऑस्ट्रेलियाई संघाना मागे टाकत असे करण्यात यशस्वी ठरला होता.

महिमा, नव्यश्री, स्वास्ती, संजना आणि अनुपमा या पाच मुली बंगळूरूच्या न्यू हॉरिझन पब्लिक स्कूलमध्ये नवव्या वर्गातील विद्यार्थिनी आहेत आणि आता केवळ चौदा वर्षांच्या आहेत. त्या स्वत:ला “टिम पेंन्टेचांन्स” संबोधतात.

त्यांनी तयार केलेल्या ऍप्लिकेशनला ‘सेलिस्को’ नाव देण्यात आले आहे आणि त्याबाबत त्यांचे म्हणणे आहे की, “सेलिस्को आपल्या वापरकर्त्यांना एक अशी सुलभ बाजारपेठ उपलब्ध करून देतो जी त्यांना त्यांच्या कच-याला लाभकारी रूप देऊन त्यातून चांगल्या प्रकारे सुटका देखील करण्यास मदत करते. हे सुख्या कच-याच्या उत्पादकांना ग्राहकांना जोडण्यास मंच उपलब्ध करतात. आता वापरकर्ता अन्य वस्तूंप्रमाणेच सुखा कचराही सहजपणाने विकू किंवा खरेदी करू शकतो. तो खरेदीदार म्हणून स्थानिक दुकानदार, रहिवासी इमारती, पार्टी हॉल, यांच्याशिवाय रद्दी कागद इत्यादीच्या खरेदीदारांना आणि फेरवापर करणारांना लक्ष्य करतो.

सेलिस्को भारतासारख्या देशात सुक्या कच-याच्या निपटण्यासाठी एक प्रभावी उपाय मिळवून देण्यासोबतच रद्दी आणि फेरवापर करणाऱ्यांना देखील अंकुश लावतो.”

या मुलींनी हा विषय हाताळला कारण त्यांना जाणवले की, भारतातच नाहीतर सा-या जगात विकसनशील देशांची कच-याचे व्यवस्थापन ही खूप मोठी आणि वर्तमान समस्या आहे. याशिवाय देशाचे पंतप्रधान यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाने देखील त्या प्रेरित झाल्या.

‘युवर स्टोरी’ने देशाचा सन्मान वाढवणा-या या मुलींना त्यांचा सिलीकॉन व्हॅलीच्या अनुभवाबाबत जाणून घेण्याव्यतिरिक्त तंत्रज्ञानाचा त्यांच्यासाठी काय अर्थ आहे आणि याद्वारे येत्या काही वर्षात त्या स्वत:ला कुठे नेऊ इच्छितात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.


महिमा मेंहंदळे

“तंत्रज्ञान एक अद्भूत आणि रोमांचक अनुभव आहे जो सातत्याने प्रगती करतो आहे आणि त्यातून समाजाच्या सा-याच प्रश्नांना सोडविण्यास मदत करताना जगभरात बदल होत आहेत.”

सँन फ्रान्सिस्को येथे आम्ही पंच आणि दर्शकांसमोर आपले विचार मांडण्याशिवाय आमच्या ऍप्लिकेशनच्या विषयवस्तू आणि परिणाम दाखवणा-या भित्तीपत्रांचे प्रदर्शन केले.

हे सारे आम्हा सर्वांसाठी अभिनव आणि अद्भूत अनुभव होते. यातून आम्हाला सांघिक काम करणे शिकण्याबरोबरच हे देखील जाणण्यास मदत झाली की, एक संघ म्हणून आम्ही आमच्यातील क्षमतांचा चांगल्याप्रकारे कसा उपयोग करून घेऊ शकतो. आम्ही जगभरातून आलेल्या लोकांना भेटण्याव्यतिरिक्त ट्विटर आणि ऍमेझॉन सारख्या तंत्रज्ञानातील कंपन्याना भेट देण्यात देखील यशस्वी झालो. आम्ही फारच छान कार्यशाळा आणि सुंदर कार्यक्रमाचा भाग झालो”

संजना वसंथ

संजना विज्ञान, गणित आणि संगणक ऍप्लिकेशनची विद्यार्थीनी आहे. “ तंत्रज्ञान आपल्या स्वप्नांना लवकर साकारण्यात मदत करणारा मंच आहे. हा एक छान अनुभव होता. त्यातून मला अवघड प्रसंगातूनही बाहेर पडण्याचे शिक्षण देण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात माझी कारकीर्द करण्याच्या संकल्पाला बळकट करण्यास मदत झाली. त्याशिवाय आम्ही जगाच्या कानाकोप-यातून आलेल्या अनेक लोकांशी भेटीगाठी बरोबरच आपल्या पालकांपासून दूर राहणेही अनुभवले. आता मी स्वत:ला एका नामांकित महाविद्यालयाची विद्यार्थीनी म्हणून पाहते जेथे मी संगणकविज्ञानाची पदविका मिळवते आहे आणि हे मोठे निर्णय घेते आहे की मला सेलिस्कोला पुढे न्यायचे आहे की नाही”

नव्यश्री बी

नव्यश्रीने संगणक आणि विज्ञान विषय घेतले आहेत.

तंत्रज्ञान आमच्या जीवनाचे अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहे. आपण सारे कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यावर अवलंबून आहोत. तंत्रज्ञानच आमचे भवितव्य आहे आणि तथाकथित अशक्य शक्य करण्यासाठी पुढे गेले पाहिजे.”

“ आम्ही सँनफ्रान्सिस्कोला केवळ आमच्या ऍप्लिकेशनच्या मुख्यविचार ‘जीवन’ला पुढे घेऊन जाण्यासाठी गेलो होतो. आणि आम्ही व्यावसायिक तंत्रज्ञ तसेच पंचाच्या समक्ष तसे करण्यात यश मिळवले की हे ऍप्लिकेशन सर्वात छान आहे आणि त्यासाठी आमच्या ऍपला दहा हजार डॉलर्सची प्रांरभिक गुंतवणूक देखील प्राप्त झाली आहे. हा अनुभव माझ्यासाठी व्यापाराच्या दुनियेची झलक दाखवण्यासाठी महत्वाचा होता, मी खूप काही नवे शिकताना खूप मजाही केली.”

“आमच्या समोर अनेक तणावाचेही प्रसंग आले पण शेवटी आम्ही नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यश मिळवले. मी या ऍपला यापुढच्या काळात आणखी विकसित करू इच्छिते, परंतू तसे करताना माझ्या अभ्यासाकडे मला दुर्लक्ष होऊ दयायचे नाही. मला महाविद्यालयात जायचे आहे, मात्र अद्याप विषय निवडता आले नाहीत.”

स्वास्ती राव

गणित आणि संगणक तिचे आवडीचे विषय आहेत.

तंत्रज्ञान माझ्यासाठी खूपच महत्वाचे आहे, कारण यात कोणतेही नेमके उत्तर नसते. आजमितीस बाजारात उतरवण्यात आलेल्या मॉडेलमध्ये येत्या तीन महिन्यात सुधारणा केल्या जातील आणि तरीही तयार होणा-या उत्पादनाला अंतिम म्हणता येणार नाही. अशावेळी तुम्हाला उत्पादनाला काळासोबतच यथायोग्य बनविण्यावर देखील काम करत राहिले पाहिजे. त्यासाठी त्यात नवीन आणि रोमांचक खुबी आणि अधिक प्रभावी मूल्यनिर्धारण पध्दती तसेच व्यापारी मॉडेल वापरावे लागेल. माझ्या मते तंत्रज्ञानाला यासाठीही पसंत करते कारण की, यात तुम्हाला आवडीच्या कामातून पैसेही मिळवता येतात.”

“टेक्नोवेशनचा अनुभव मला आणि माझ्या संघाला आणखी जवळ येण्यासाठी कारक झाला. आता आम्ही एकमेकींच्या प्रतिभा आणि क्षमतांना अधिक चांगल्या पध्दतीने जाणतो आणि सोबत काम करताना अधिक विश्वास ठेवतो. आता आम्ही समजून गेलो आहोत की, “वास्तवात दोन टोके एकापेक्षा चांगली असतात.” याशिवाय मी नवीन आणि रोमांचक माहिती मिळवण्याच्या बाबतीत अधिक आश्चर्यचकीत राहते, आणि या सा-या गोष्टी आहेत ज्या मी माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच जाणू किंवा शिकू शकले असते.

टेक्नोवेशनच्याआधी मी व्यापार योजना आणि सेल्स पिच ही नावे सुध्दा ऐकली नव्हती. पण आता मला पहिल्यापेक्षा जास्त माहिती मिळाली आहे.

येत्या पांच वर्षात स्वत:ला चांगल्या गुणांनी आणि शिष्यवृत्तीसह पदवीधारक केल्यानंतर किमान आपल्या कंपनीची व्यवस्थापकीय संचालिका बनू शकते अशी अपेक्षा करते. याशिवाय मी सेलिस्कोच्या सध्याच्या स्वरुपाला अधिक चांगले बनवून लवकरच त्याला पूर्ण विकसित पाहू इच्छिते, जो व्यावसायिक बाजारात प्रवेश केल्यावर पंधरा दिवसात दहा हजारांपेक्षा जास्त वापरकर्त्यांना आधार ठरेल.

जगभरात सिलीकॉन व्हॅलीच्या नावाने प्रसिध्द सँन फ्रांन्सिस्कोमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. लोक ऍमेझॉन आणि ट्विटरसारख्या इमारतींबाहेर सेल्फी घेण्यासाठी रांगेत उभे राहण्यास तयार होतात, आणि मला वाटते की मी खूप भाग्यवान ठरले की या मोठ्या संस्थाच्या कामकाजाची वास्तविक स्वरुपातील माहिती मिळाली आणि हो तिथे मी माझा सेल्फी देखील घेतला!

याशिवाय आम्ही ब्राझील, मेक्सिको, नायजेरिया इत्यादी दुस-या देशातून येणा-या स्पर्धकांबाबत जाणण्यास आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली.याशिवाय आम्ही त्याबाबत देखील जाणून घेतले ज्याला आम्ही भविष्यात डोकावणे म्हणतो.

याशिवाय वॉल स्ट्रिट जर्नलने आमची मुलाखत देखील घेतली जी निकालाच्या घोषणेच्या दुस-या दिवशी टेक आणि व्यापार या भागात छापण्यात आली, खरेतर त्यांनी निकालांच्या आधीच ती घेतली होती.”

अनुपमा एन नायर

अनुपमाचे आवडीचे विषय संगणक आणि विज्ञान आहेत.

सँन फ्रान्सिस्को खरच एक अद्भूत जागा होती.

हा सारा शिकवणारा अनुभव होता. आम्ही त्या सा-या गोष्टी शिकण्यात यश मिळवले जे लोक महाविद्यालयात शिकतात. जसे की विचार कसे मांडावे, उत्पादन कसे विकावे, कोडिंग कसे करावे, व्यापाराचे नियोजन कसे करतात, याशिवाय बरेच काही शिकायला मिळाले. याशिवाय मी काही नवीन मित्र बनविण्यात देखील यशस्वी झाले आणि काही प्रमाणात दुस-या संघासोबत नेटवर्किंग देखील केले. येत्या पाच वर्षात स्वत:ला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान आणि संगणकाच्या क्षेत्रात महाविद्यालयात काहीतरी करू इच्छिते.

माझ्यासाठी तंत्रज्ञान नाविन्याचा विषय आहे. हे असे माध्यम आहे ज्याच्याद्वारे आपण प्रत्यक्षात आपले विचार आपल्याला हव्या त्या पध्दतीने व्यक्त करू शकतो. आपण बनविलेल्या उत्पादनाला काम करताना पाहणे आणि इतरांवर त्याचा सकारात्मक प्रभाव वास्तवात चांगला वाटतो. तंत्रज्ञान माझ्यासारख्या व्यक्तीचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वात उपयुक्त मंच आहे.

लेखक : निशांत गोयल

अनुवाद : किशोर आपटे.