६० रुपये पगारावर उदरनिर्वाह करणारे राजकुमार गुप्ता बनले करोडोंचे मालिक

 ६० रुपये पगारावर उदरनिर्वाह करणारे राजकुमार गुप्ता बनले करोडोंचे मालिक

Thursday December 03, 2015,

5 min Read

‘’माझ्या कडे काही नाही, काहीच नाही. मी फक्त चांगला उद्यमी आहे ’’. २०० स्क्व्येर फूटच्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या आणि ६० रुपये पगारावर उदरनिर्वाह करणारे राजकुमार गुप्ता, आज प्रसिद्ध रिअल इस्टेट उद्योजक आहे. त्यांची ‘’रंकाचा राजा’’ ही कहाणी सर्वांनाच प्रेरित करणारी आहे ती अंतर आत्मापासून त्यांच्या कठीण परिश्रमाची साक्षी आहे. कमी उत्पन्नाच्या दिवसात पण त्यांची विचारसरणी उच्च होती. आपल्या वाढत्या परिवारासोबत एका छोट्या घरात राहून सुद्धा दुसऱ्यांना मदतीसाठी ते नेहमी तत्पर असायचे. जर आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवण्यास असमर्थ असाल तर या कहाणी मुळे नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळेल.


image


राजकुमार गुप्ता हे मुक्ती ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. १९८४ मध्ये त्यांनी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्यात आवासी अपार्टमेंटचा शुभारंभ केला. आपल्या या आधुनिक वास्तू सेन्सच्या सफलतेने राजकुमार गुप्ता यांनी कोलकत्याच्या हुगळी बेल्ट मध्ये निवासी सोयींच्या इमारतीच्या अधिक मजल्यांची मान्यता मिळविली तेव्हा पासून मुक्ती ग्रुप बंगालमध्ये एन्टरटेनमेंट हबच्या अंतर्गत मल्टीप्लेक्स, आंतरराष्ट्रीय हॉटेल, लाउन्ज, फाईन डायन रेस्टॉरंटच्या जोडीने अतिशय ताकदीने त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले. राजकुमार यांचे नाव इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या यादी मध्ये अभावाने मिळते. सामान्य आणि नम्र व्यक्तिमत्वाच्या गुप्तांनी आपले लक्ष जास्तीत जास्त व्यवसाय आणि संस्थानांवर केंद्रित केले. जगाला तुमच्या कहाणीमुळे प्रेरणा मिळेल या आमच्या वक्तव्याचा मान ठेऊन ते मुलाखतीसाठी तयार झाले. यशाच्या या उच्च शिखरावर असताना त्यांनी अगदी विनम्र भाषेत आमच्याशी संवाद साधला.


image


" माझा जन्म हा पंजाब मधील गरीब परिवारात झाला. अभ्यासासाठी तिथे मला संघर्ष करावा लागला. म्हणून मी कोलकत्याला येऊन पुढचा अभ्यासक्रम पूर्ण केला. १९७८ मध्ये ६० रुपये पगारावर मी एका खाजगी कंपनीत नोकरी सुरु केली. तिथून पुढे मी हिंदुस्तान मोटर्स मध्ये रुजू झालो. जिथे मला थोडी बढती मिळाली. पाच सहा वर्ष तिथे नोकरी केल्यावर मी इथे व्यापाऱ्याचा मूलमंत्र शिकलो. यानंतर मी स्वतः सप्लायचा व्यवसाय सुरु केला.


image


परोपकाराने यशाचा मार्ग

मी २०० स्क्व्येरफूट मध्ये आपल्या परिवारासोबत राहत होतो. आज मी स्वतंत्र झालो. या साठी मी माझ्या आयुष्यातील कठीण परिस्थितीचा आभारी आहे आणि सतत निराधारांना आधार देण्यासाठी झटत राहील, स्वतःची परिस्थिती बिकट असताना अशा विचारांना मित्रांनी निरर्थक ठरविले. स्वतःला नशीबवान समजणाऱ्या गुप्तांनी मित्रांनापण समजावले की गरजवंतसाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे. दानधर्म हे मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे हे विधान खोटे ठरवून त्यांनी निर्मळ मनाने छोट्या मदतकार्यापासून सुरवात केली. मित्रांच्या सहयोगाने स्टेशनवर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय केली आणि देखरेखी साठी एका माणसाची नियुक्ती पण केली. आर्थिक नुकसान सोसून गरिबांसाठी मोफत दवाखान्याची सोय केली. लोकांकडून जुने फर्निचर घेऊन त्याची डाग डूजी करून ते फर्निचर वापरून दवाखान्याची सुरवात केली आणि उद्घाटन हिंदुस्तान मोटर्सचे अध्यक्ष एन. क. बिर्ला यांच्या हस्ते केले.


image


या प्रकारे त्यांच्या समाजसेवेचा स्तर उंचावत गेला तसेच त्यांना प्रामाणिक लोकांची साथ मिळत गेली. माझ्या विचारांना सत्यात परिवर्तीत करायला बरेच मदतीचे हात पुढे आले. मी दवाखाने, अपार्टमेंट, कॉम्प्लेक्सच्या रुपात त्यांच्या समोर प्रोजेक्ट सादर केले अशा प्रकारे माझ्या समाजसेवेला नशिबाची जोड मिळाली .

मुक्ती एयरवेज – एक भंगलेले स्वप्न

मला माझ्या आयुष्यात कधीच प्रसिद्धी नको होती. पण रिअल इस्टेटच्या क्षेत्रात जेव्हा आकर्षक प्रस्ताव येत होते तेव्हा काही तरी मोठे करण्याची जिद्द होती. त्या वेळेस एशिया मध्ये एयरलाईन सेक्टरची सुरवात होत होती आणी मला त्याचा एक भाग बनायचे होते. म्हणून मी नव्या योजनेसह एयर लाईनची सुरवात केली.

निर्णय घेणे सोपे नव्हते. पण एरोप्लेनच्या संदर्भातील माहिती खूपच कमी होती. मला कळले की प्लेन एयरपोर्ट वरून उड्डाण करतात , म्हणून मी तडक ऑफिस मध्ये गेलो आणि सांगितले की,’’ मला एयर लाईन सुरु करायची आहे.’’ हे एकूण पूर्ण स्टाफ स्तब्ध उभा राहिला. १९९४ मध्ये बंगाल मध्ये सुरु करण्याचा निर्णय हा चुकीचा होता. पण मी माझ्या मताशी ठाम राहिलो. तांत्रिक अडचणींवर हुशार अधिकारी, इंजिनियर व विशेषतज्ञांच्या मदतीने मात करून एक टीम बनविली.


image


१ जानेवारी १९९५ मध्ये मी रिपोर्ट सादर केला. त्याच दरम्यान एयर लाईनने पण रिपोर्ट सादर केला . उड्डाण मंत्रालयाच्या द्वारे माझ्या रिपोर्टला स्वीकृती मिळाली व त्यांचा रिपोर्ट नामंजूर झाला.

आपल्या लाइसेन्ससाठी मी दिल्लीला रवाना झालो. तिथे चपराशा पासून उड्डाण मंत्री गुलाम अली अय्यर यांच्या भेटी घेतल्या. जेव्हा मी संयुक्त सचिव श्री. मिश्रा यांना भेटलो तेव्हा माझा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. तांत्रिक प्रशिक्षण आणि इतर मापदंड नसलेल्या प्रस्तावाला लाइसेन्स न देण्याबद्दल मला कळविले. मी सांगितले,’’ की माझ्याकडे यातले काहीच नाही पण मी एक चांगला उद्योगपती आहे.’’ यासाठी मी दुसऱ्यांची मदत घेऊन फाईनान्स आयोजित करू शकतो.’’ माझ्या प्रामाणिक विधानावर प्रभावित होऊन त्यांनी माझे लाइसेन्स मंजूर केले.

आंतरराष्ट्रीय एयरलाईन व निर्माण कंपन्यांबरोबर देवाण घेवाण व चर्चासत्राचे आयोजन केले, तो देशातला एक वेगळाच किस्सा होता. सुरुवातीला आम्हा भारतीयांना युरोपीयांचा पूर्वग्रह दुषित सहन करावा लागला. त्यांनी आम्हाला गांभीर्याने घेतले नाही. पण जेव्हा त्यांनी आमच्या व्यवसायाला समजून घेतले, तेव्हा गोष्टी सहज सोप्प्या झाल्या. पण एयरलाईनची जेव्हा सुरवात होणार होती तेव्हाच हर्षद मेहता घोटाळ्याने राष्ट्राला एक धक्का बसला. नव्या उदारवादी अर्थ व्यवस्थेत खळबळ माजली. निवेशकांनी या जोखीमेच्या व्यवसायाला हाताळण्यास नकार दिला आणि मुक्ती एअरवेज उड्डाणाआधीच दुर्घटनाग्रस्त झाली.

सफलता आणि निराशा

एयरलाईन च्या असफलतेमुळे मी खचून गेलो. माझ्या आयुष्यातील महत्वपूर्ण वर्ष मी पणाला लावले आणि ते स्वप्न माझ्यापासून दूर झाले. धक्का तेव्हा बसला जेव्हा ते स्वप्न भंग पावले. पाठीमागे वळून बघितल्यावर कळले की सफलतेने आपण आनंदित होतो पण अपयशाने आपण धडा शिकतो. एक दिवस मुक्ती एअरवेज ही संकल्पना निश्चित सत्यात परावर्तित होईल. तो पर्यंत मिळवलेल्या यशात मी समाधानी आहे.

आयुष्यात ध्येय बाळगणाऱ्यासाठी संदेश

आयुष्यात यशस्वी होणे निश्चितच कौतुकास्पद असते, मात्र फक्त स्वत:पुरताच विचार करून तुम्ही यशस्वी वाटचाल करू शकत नाही म्हणून एखाद्या मोठ्या प्रतिमेचा एखादा छोटासा भाग बनून स्वतःला पहा आणि तेच काम करा जे तुम्हाला महत्वाचे वाटते, त्यामध्ये स्वतःला झोकून द्या आणि मग बघा आयुष्य तुम्हाला हव्या असलेल्या वळणावर कसे घेऊन जाते ते.

लेखक : रत्न नोटीयाल

अनुवाद : किरण ठाकरे