महाराष्ट्रातील एक गाव, जिथे घरे महिलांच्या मालकीची असून १५ वर्षात एकही गुन्हा नोंदविण्यात आला नाही!

महाराष्ट्रातील एक गाव, जिथे घरे महिलांच्या मालकीची असून १५ वर्षात एकही गुन्हा नोंदविण्यात आला नाही!

Tuesday March 28, 2017,

2 min Read

आपण सारे एका चौकटीत किंवा चाकोरीतून जगत असतो. अशाच चाकोरीबद्ध जीवनात आपण नेहमी ऐकत आलो आहोत की ग्रामिण भागातील लोकांचे जीवनमान शहरी लोकांच्या तुलनेच कमी प्रगतीचे असते. मात्र महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील

आनंदवाडी या गावाने हा समज खोटा ठरविला आहे, आणि येथील लोकांची विचारसरणी पाहिल्यावर शहरी लोकांनाच ते स्वत: मागास असल्याचे जाणवेल.


image


आनंदवाडी हे निलंगा तालुक्यातील लहानसे गांव आहे, ज्याची लोकसंख्या केवळ ६३५ इतकी आहे. त्यात १६५ घरे आहेत, आणि ही सारी घरे महिलांच्या नावावर आहेत. गावक-यांना ही कल्पना सूचल्यानंतर हा निर्णय ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला होता. काही गावक-यांनी तर त्याही पुढे जावून घराप्रमाणेच शेती देखील घरातील महिलांच्या नावे करून घेतली आहे. त्यामुळे घरांवरच्या पाट्यांवर आज महिलांची नावे मालक म्हणून त्यांच्या दूरध्वनी क्रमांकासह अभिमानाने झळकताना दिसत आहेत.

ग्रामसभेचे सदस्य ज्ञानोबा चामे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “ जसे आपण देवी लक्ष्मीची प्रत्येक दिवाळीला पूजा करतो, तसे आम्ही आपल्या लक्ष्मींचे ( पत्नी/ मुली) सन्मान करण्याचे ठरविले. महिलांना कुणावर त्यांच्या गरजेसाठी अवलंबून राहावे लागू नये, कारण घर तर त्याच चालवितात. मग ते त्यांच्या मालकीचे नको का? यामुळे पुरुष प्रधान मानसिकतेमधूनही लोकांची सुटका झाली आहे.”

गेल्या पंधरा वर्षांपासून हे गांव गुन्हेगारी मुक्त देखील झाले आहे, आणि तंटामुक्त गांव योजनेत त्याला पुरस्कार देखील मिळाला आहे. या गावाला त्यांचे चांगुलपण इतरांना देखील द्यायचे आहे, त्यामुळे संपूर्ण गांवाने आता अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील अनेकांनी मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव देखील वैद्यकीय अभ्यासाकरीता दान करण्याचे ठरविले आहे. त्यांना गावाच्या आरोग्याचे महत्व देखील कळले आहे. गावाच्या सरपंच भाग्यश्री चामे यांनी सांगितले की, “ गावातील ४१० लोकांनी त्यांचे अवयवदान करण्याची प्रतिज्ञा केली आहे, आता गावातील लोकच एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत, त्यामुळेच तंबाखू सेवन, गुटखा, धुम्रपान आणि दारू यांवर गांवात नियंत्रण आले आहे.” 

आनंदावाडीच्या गावक-यांच्या प्रागतिक विचारांमुळे, आणि प्रत्यक्षातील कृतीमुळे गावातील गुन्ह्यांच्या संख्येत झपाट्याने कमी आली, याचा सा-याच देशवासीयांना अभिमान वाटला पाहिजे.

(थिंक चेंज इंडिया)