महिला सबलीकरणाच्या दिशेने 'ट्रॅव्हलिस्टा'चे पाऊल

महिला सबलीकरणाच्या दिशेने 'ट्रॅव्हलिस्टा'चे पाऊल

Tuesday May 10, 2016,

5 min Read

ज्या वयात अनेक लोकांना वाटत असते की, प्रत्येक दिवशी फेसबूकवरील स्टेटस अपडेट करणे, ही आपल्या जीवनातील एक महत्वाची जबाबदारी आहे. त्याच वेळेस २५ वर्षीय अक्षुना बक्षी या लिंग समज आणि महिला सबलीकरणाच्या दिशेने काम करत आहेत. प्रत्येक दिवशी घरात किंवा घराबाहेर लाखो महिला छळ, भेदभाव किंवा महिलांबाबतच्या द्वेषाला सामोऱ्या जात आहेत. त्यांचा आवाज बनण्यासाठी अक्षुना यांनी आपला पैसा गुंतवला आहे. दुःखामुळे मेटाकुटीस आलेल्या महिलांमुळे अक्षुना यांच्या उद्योजकतेच्या भावनेला 'SHE' ही स्वयंसेवी संस्था स्थापन करण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यांची ही स्वयंसेवी संस्था दिल्ली एनसीआरमध्ये प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांसाठी काम करते. तसेच त्यांना त्यांच्या प्रत्येक दिवसाच्या लढ्यामध्ये सहकार्य करते. त्या सर्व प्रक्रियेत, प्रेरणादायी संदेश देणाऱ्या सहजसोप्या, संरचित उपक्रमांद्वारे ते अनेक मोठे मुद्दे संवेदनशीलपणे हाताळतात. दिल्लीतील अक्षुना या ट्रॅव्हलिस्टाच्या संस्थापिका असून, त्यांची कंपनी या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ट्रॅव्हेल फिल्म्सद्वारे प्रेरणा देते. याशिवाय हे एक ई-कॉमर्स पोर्टल असून, त्यावर ते दागिने, साहित्य तसेच विविध ठिकाणांवरील वस्तू माफक दरात उपलब्ध करुन देतात. २०१३ साली त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी महिला सबलीकरणाच्या दिशेने आपला प्रवास विस्तारीतपणे उलगडून सांगितला.

image


त्या सांगतात की, 'मी दिल्ली पर्य़टन विभागात गेले होते. मला भारतातील पहिला वहिला ट्रॅव्हल चित्रपट आणि छायाचित्र उत्सव आयोजित करायचा होता. त्यांना माझी ही कल्पना फार आवडली आणि ते किंचित खुशदेखील झाले की एक युवा २३ वर्षीय महिला हा उपक्रम आयोजित करत आहे. जेव्हा मी माझ्या प्रकल्पावर काम करत होते, तेव्हा भ्रष्टाचारी कर्मचारी तसेच शहरातील बड्या शॉपिंग मॉलमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी यांसारख्या अनेकांशी मला व्यवहार करावा लागला. मात्र मी या सर्व आव्हानांना सर्वांना सामोरी गेली. मला अनेक सल्लेदेखील देण्यात आले की, ग्राऊंड लेवलचे काम करण्यासाठी पुरुषांची नियुक्ती करण्यात यावी. मात्र आमची महिलांची टीम होती आणि मला कोणत्याही कामाकरिता त्यात बदल करायचा नव्हता. आम्ही लढा देण्याचे तसेच लोकांचा दृष्टीकोन बदलण्याचे ठरविले.' २५ डिझायनर्सपासून सुरू झालेल्या त्यांच्या या प्रवासात आज दोन हजाराहून जास्त लोक जोडले गेले असून, ते त्यांची उत्पादने नियमितपणे ट्रॅव्हेलिस्टावर टाकत असतात. तसेच वार्षिक सरासरी वाढीचा दर (एन्युअल एव्हरेज ग्रोथ रेट) १०० टक्क्यांहून अधिक असल्याचे कंपनीला जाणवले.

ट्रॅव्हलिस्टा हेदेखील एक प्रस्थापित नाव बनले असून, अक्षुना यांच्या अनुभवाने त्यांना काहीतरी अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी राजी केले होते. 'फेसबूकवर स्टेटस अपडेट करणे आणि सर्व गोष्टींकरिता सरकारला जबाबदार धरणे, या गोष्टींपेक्षा महिला सामोऱ्या जात असणाऱ्या अडचणींविरोधात उभे राहणे आणि त्याकरिता योग्य ती कामे करण्याचे आम्ही ठरविले.' यासाठी त्यांनी विविध क्षेत्रातील महिलांना एका छताखाली आणण्याकरिता गाळ्याची सोय करण्याचे ठरविले आणि ट्रॅव्हेलिस्टाच्या नावाखाली स्त्रीत्व साजरे करण्याचे ठरविले. अशाप्रकारे SHE उत्सवाची सुरुवात झाली. प्रभावी संदेश देणारा एक रंगीबेरंगी कार्यक्रम, अशाप्रकारचा हा उत्सव होता. या उत्सवाचा आकर्षण बिंदू म्हणजे महिला सबलीकरणाबाबतचे दुर्लक्षित विषय जसे की, आर्थिक स्वातंत्र्य, लांच्छने, सौंदर्य़ाबाबतचे पूर्वग्रह, समाजातील अशा अनेक प्रचलित गोष्टी प्रकाशझोतात आणणे आणि 'पुरुष म्हणजे आर्थिक नियोजन नव्हे', या आणि अशा अनेक मार्मिक मथळ्यांद्वारे त्या अधोरेखित करणे. याशिवाय या उत्सवात विविध कार्य़शाळादेखील आयोजित करण्यात येतात तसेच SHEने अनेक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. जवळपास ७० कुशल डिझायनर्स आणि महिला उद्योजकांनी त्यांच्या मागील संस्करणात आपले योगदान दिले होते.

SHEचा स्वयंसेवी संस्था बनण्यापर्यंतचा प्रवास

या उत्सवाच्या यशाने त्यांचे बरेच कौतुक तर झाले याशिवाय त्यांना एक धोरण आखण्यास प्रोत्साहनदेखील मिळाले. 'आमची संकल्पना आवडल्याने अनेक महिलांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आमच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आम्ही स्वयंसेवी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ज्यात आम्ही काही अभिनव कल्पनांचा वापर करणार होतो. व्याख्याने, कार्यशाळा यांचे आयोजन करण्याऐवजी आम्ही प्रत्येक मुद्द्याच्या मुळाशी जाऊन तिचे निराकरण करण्याचे ठरविले.' SHE ही स्वयंसेवी संस्था २०१४ साली पुनर्नोंदणीकृत करण्यात आली. जिचे ध्येय महिलांची मजबूत फळी तयार करण्याचे होते. 'आमच्या नव्या प्रकल्पानुसार आम्हाला दिल्लीतील सुरक्षेच्या मुद्द्याकडे वैयक्तिक तसेच थेट उपक्रमांद्वारे लक्ष वेधायचे होते.' त्यामुळे SHE संस्थेने Krav Maga India यांसारख्या संस्थांसोबत १८ महिला सुरक्षा मोहिमा तसेच कार्यशाळा राबवल्या. यात अधिक भर म्हणून SHE या स्वयंसेवी संस्थेने जॉनी रॉकेट्स या रेस्टॉरंट फ्रॅन्चायझी आणि बांधकाम व्यवसायातील विकासक डीएलएफ यांच्यासोबत संबंध निर्माण करताना त्यांनी जेजे कॉलनी या वस्तीतील मुलींकरिता शैक्षणिक कॅम्पचे आयोजन केले. त्या लहान मुलींना काही आनंदाचे क्षण उपलब्ध करुन देताना त्यांच्याकरिता सणासुदीच्या दिवशी टी पार्टी आणि पार्ट्यांचे आयोजन करतात. ही स्वयंसेवी संस्था जवळपास ५० गरीब मुलांचा दिवाळी तसेच ख्रिसमसचा सण आनंदात जावा, याकरिता हॅपिनेस सहल आणि दुर्गभ्रमंतीचे आयोजन करते. गेल्या दिवाळीत SHE या संस्थेने वस्तीत राहणाऱ्या २० मुलींना शाळेची दप्तरे, चित्रकलेची पुस्तके आणि रंगांचे वितरण केले.

image


असे असले तरी, एक आव्हान त्यांच्यासमोर होते ते म्हणजे सातत्याने संघटनेला व्यस्त ठेवण्याकरिता कोणत्या अभिनव उपक्रमांचे आयोजन करावे. 'आम्हाला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. आम्हाला वस्त्यांमधील नेत्यांचा विश्वास जिंकून घ्यावा लागत असे. आम्हाला अनेकदा त्या मुलांच्या पालकांना आमिषे दाखवावी लागत असत. जसे की, कार्यशाळा झाल्यानंतर आम्ही त्यांना मॅकडॉनल्डमध्ये मोफत खायला देऊ तसेच त्यांना विविध भेटवस्तू देऊ. आम्हाला एका गोष्टीचा मोठा धक्का बसला, ती म्हणजे अनेक महिलांना स्वतःच्या हक्काकरिता लढायचे नव्हते आणि समाजाने त्यांच्याकरिता आखून दिलेल्या चौकटीत राहणे, त्यांना योग्य वाटत होते.' अक्षुना आणि त्यांच्या टीमने सातत्याने योग्य दिशेने प्रयत्न केले. सुरुवातीच्या प्रवासात त्यांनी लिंग समज हा त्यांचा मुख्य मुद्दा बनवला होता. मात्र कालांतराने त्यांनी लिंग समानता, पुरुष अपत्याची जबाबदारी, लहानपणापासूनच मुलींना आदराने वागविणे, यांसारख्या विषयांवर त्यांनी काम सुरू केले होते. त्यांच्या स्थानिक शैक्षणिक सत्रातूनच या गोष्टी त्यांच्यासमोर आल्या होत्या, ज्यांवर त्यांनी काम सुरू केले होते. हा एक मोठा प्रवास आहे. मात्र दरम्यानच्या काळात SHE उत्सव, त्यांचा साक्षांकित प्रकल्प प्रत्येक वर्षी जोमाने वाढत आहे. तिसऱ्या वर्षात ते २० हजार पाऊलखुणांचे साक्षीदार आहेत.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

७५वा दिवस: अजूनही ते माझ्या काळ्या त्वचेकडे तिरस्काराच्या, संशयाच्या नजरेनंच पाहतात...

कशाप्रकारे एक महिला झाली ‘बिजनेस वूमन’? मीरा गुजर यांच्या यशाची दुर्मिळ कथा !

आई होऊ पाहणाऱ्या उद्योजिकांमध्ये स्वतःच्या उदाहरणाने आत्मविश्वास जागवणाऱ्या सुमी गंभीर

लेखक – बिंजल शाह

अनुवाद – रंजिता परब

    Share on
    close