विशिष्ट हेतूने दहा हजार किमी देशभरातून चालवत येणा-या ‘बाईकिंग क्विन्स’चे पंतप्रधानानी केले कौतूक!

0

त्यांना अस्वस्थ करणा-या सामाजिक मुद्यावर ज्यावेळी गुजरात मधील या बाईकिंग क्विन्सनी दहा हजार किमीचा पल्ला पूर्ण केला त्यावेळी त्याचे कौतूक करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:हून आले. ४५ दिवसांत त्यानी १५ राज्ये पूर्ण केली. त्यांचा हेतू होता 'बेटी बचाव बेटी पढाव' आणि 'स्वच्छ भारत' सारख्या मोहीमेसाठी जागृती करण्याचा!


या गटात पन्नास पेक्षा जास्त अशा महिला आहेत ज्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातून आल्या आहेत त्यात सनदी अधिकारी आहेत, गृहिणी, डॉक्टर्स, अभियंता, आणि विद्यार्थीनी देखील आहेत. जरी त्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आल्या असल्या, वेगवेगळा लढा देत आल्या असल्या तरी त्यांना एकत्र करणारे वेड किंवा ध्येय आहे बाईकिंगचे आणि त्याचा वापर काहीतरी भले करण्यासाठीच्या प्रांजळ इच्छा. एका मुलाखती दरम्यान त्यांच्यापैकी एक रायडर नॅन्सी पाटीवाल्ला म्हणाल्या की, “ सरकारने अनेक योजना सुरू केल्या ज्यांचा परिणाम देखील काही प्रमाणात शहरी भागात झाला मात्र ग्रामिण भागात तो हवा तसा होताना दिसत नाही.” त्यांना शिक्षणाचा उपयोग ग्रामिण भागात महिला सक्षमीकरणासाठी व्हावा असे वाटते.


नॅन्सी यांच्या प्रमाणेच या समूहातल्या प्रत्येक महिलेला समाजातील कोणत्या तरी मुद्यावर काम करायचे आहे, ज्यात त्यांना स्वत:ला स्वारस्य आहे आणि त्यासाठी त्या पूर्ण निर्धार आणि उत्साहाने भारतभर प्रवासाला निघाल्या आहेत.

बाईकिंग हा नेहमी पुरूषांशी संबंधित  विषय राहिला आहे आणि या माध्यमातून या महिलांनी ही परंपरा खंडीत केली आहे. या निमित्ताने त्यांना देशाच्या दुर्गमभागातील लोकांपर्यंत पोहोचता आले जे प्रवासाच्या अन्य साधनांनी कदाचित शक्य झाले नसते.

त्यांच्या दहा हजार किमीच्या प्रवासाच्या अंती त्यांनी १५ऑगस्टला लडाखच्या खारदुंगला मध्ये भारताचा तिरंगा फडकविला. हे ध्वज फडकविणे देशातील सर्वात उंचावर असलेल्या मोटरवाहन जावू शकेल अशा रस्त्यावरचे ध्वजवंदन होते त्यातून स्त्री-पुरूष समानतेचा संदेश देखील त्यांनी दिला आहे.

हे असे कार्य आहे जे त्यांनी सुरू केले आहे ते महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी, लैंगिक समानतेसाठी त्यांना समान शिक्षणाचा हक्क आणि इतर गोष्टी मिळाव्या यासाठीचे पाऊल आहे.